बेलूर गाव होयसळ राजांची पहिली राजधानी होती. यागची नदीच्या काठावर वसलेली ही नगरी पूर्वी वेलापूर म्हणूनही ओळखले जायची. विष्णुवर्धन राजाच्या राजवटीत हळेबिडूची स्थापना झाल्यावर याचे महत्त्वही दुसरी राजधानी म्हणून १४व्या शतकापर्यंत अबाधित होते. ‘पृथ्वीवरील विष्णुस्थळ’ असा किंवा दक्षिण काशी असाही बेलूरचा उल्लेख व्हायचा. बेलूर हे चन्नकेशव (विष्णू) मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याला विजयनारायण मंदिर असेही संबोधले जाते. उत्तर आणि दक्षिण भारताच्या मंदिर शैलीचा येथे संगम झाला आहे. होयसळ राजवटीच्या ३०० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भव्य देवस्थानांची स्थापना केली होती.
बेलूरवरही दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने इ. स. १३२६मध्ये हल्ले केले. त्यानंतर विजयनगरचा संस्थापक राजा हरिहरने याचा जीर्णोद्धार केला.
होयसाळ कलात्मकतेच्या उत्कृष्ट उदाहरणांपैकी, बेलूरच्या चेन्नकेशव आणि केशव मंदिरांना भेट देणे हा एक अनुभव आहे जो एखाद्याला पूर्वीच्या काळातील साम्राज्याच्या वैभव आणि कलात्मक संस्कृतीचा साक्षीदार होण्यासाठी आवश्यक आहे. 11व्या शतकातील एक सुरुवातीची राजधानी, होयसलांनी बेलूरचा इतका आदर केला, ज्याला वेलूर किंवा वेळापुरी असेही म्हटले जात असे, की त्याला अनेकदा पार्थिव वैकुंठ (विष्णूचे निवासस्थान) आणि दक्षिण वाराणसी असे संबोधले जात असे.आणि संपूर्ण शहर बांधण्यासाठी सुमारे 190 वर्षे लागली. Halebidu सह, ही शहरे होयसाला साम्राज्याच्या भव्यतेची एक पेरिस्कोपिक झलक देतात जी तुम्हाला ट्रान्ससारख्या वेळेच्या प्रवासात घेऊन जातील. वर उल्लेखिलेल्या बेलूरची मंदिरे, होयसलेश्वर मंदिर आणि हळेबिडू येथील जैन मंदिरांसह, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे म्हणून सीमांकन केले आहे.
बेलूर येथील मंदिरांची उभारणी करताना मजबुतीसाठी वापरलेले स्थापत्य अभियांत्रिकी तंत्र म्हणजे त्या वेळच्या बांधकाम शैलीचा आदर्श नमुना आहे. घडीव दगडांवर दगड रचून खांब आणि आडव्या तुळया जोडताना इंटरलॉक, तसेच पिन आणि सॉकेट सिस्टीम यांचा सुरेख वापर त्यासाठी करण्यात आला आहे. शिल्प कोरलेल्या भिंती आणि छत असे बेमालूमपणे जोडण्यात आले आहे, की याचे सांधे कसे जोडले आहेत, याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे हजार वर्षे झाली तरी ही बांधकामे भक्कमपणे टिकून आहेत.
चन्नकेशव मंदिराची माहिती:-
मंदिरात जाताना एखादी पॉवरफुल बॅटरी (विजेरी) जवळ ठेवावी. कोणत्याही पर्यटनस्थळी जाताना शासकीय परवानाधारक मार्गदर्शक (गाइड) असल्याशिवाय जाऊ नये. त्याशिवाय तेथील बारकावे समजत नाहीत.
चन्नकेशव (चेन्नाकेशवा, चन्नाकेशव) हे श्री विष्णूला समर्पित असे मंदिर आहे. केशव म्हणजेच विष्णू, चेन्नाकेशवा म्हणजे देखणा केशव. या मंदिराचे बांधकाम नरम सोपस्टोनच्या (क्लोरायटिक स्किस्ट नावाचा मऊ दगड) साह्याने करण्यात आले आहे. हस्तिदंत आणि चंदनाच्या कोरीव कामाच्या हाताळणीची परंपरा या मंदिराच्या शिल्पकलेतून प्रतिबिंबित होते.
येथे सुमारे ११८ शिलालेख सापडले असून, काही ताम्रपटही आहेत. या मंदिराचे काम तीन पिढ्यांतील शिल्पकार करत होते असे शिलालेखावरून दिसून येते. त्यावरून त्यातील काही कलाकारांचीही ओळख होते. रुवारीमल्लितम्मा (मल्ल्याण्णा) या शिल्पकाराने सुमारे ४० मूर्तींची निर्मिती केली आहे. दासोजी व त्याचा मुलगा चवण्णा यांचाही यात मोठा सहभाग होता. मदनिकांची शिल्पे करण्याचे श्रेय चवण्णा यांच्याकडे जाते.
मल्लितम्मा व दासोजी यांनी मुख्यत्वे प्राणी आणि पक्षी यांची शिल्पे केली. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मोहिनीशिल्प. तसेच गजसुरवध, जय विजय, शिलबालिका आणि अनेक मुद्रांमधील नर्तिका यांची शिल्पेही वेधक आहेत. गोपुरे, गाभारा, सभागृह, त्याचे छत व खांब अतिशय देखणे आहेत. हळेबिडूपासून आठ किलोमीटर अंतरावर चिकमंगळूर रस्त्यावर वेळवंडी येथेही अप्रतिम नारायण मंदिर आहे.
कधी जाल:-
येथे राहण्याची व्यवस्था चांगली आहे. कर्नाटकातील इतर ठिकाणांच्या तुलनेत येथील हॉटेलचे दर माफक आहेत. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी.
कसे जाल:-
रेल्वे सेवा:-
भारतातील सर्व मोठ्या शहरांतून हसन पर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहेत.बंगळूरू, हुबळी,पुणे-मुंबई येथून हसनपर्यंत रेल्वेसेवा आहे.
बेलूर हे ठिकाण हसन रेल्वे स्टेशनपासून ३५ किलोमीटर व बेंगळुरूपासून २०० किलोमीटर अंतरावर आहे. चिकमंगळूरपासून ते २२ किलोमीटरवर आहे.
विमान सेवा:-
बंगळूर विमानतळ
रस्ता सेवा:-
हसन ३२ किलोमीटर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा