google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : थेक्कडी | Thekkadi

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

थेक्कडी | Thekkadi

 थेक्कडी, मुन्नार पासुन ३ तासांवर (९२किमी) आहे. जातान वाटेत परत चहाचे मळे, धबधबे, धरण असे बरेच काही लागते.



थेक्कडी मध्ये पेरीयार अभयारण्य, मसाल्यांच्या बागा, मसाले व केरळी मसाज प्रसिद्ध आहे. दुपारी जेवण आटोपुन मसाल्यांची बाग पहायला बाहेर पडलो. अशा बागा खास पर्यटकांसाठी तयार केलेल्या असतात. एकाच बागेत लवंगा, दालचिनी, वेलदोडे, काळी-मिरी, तमालपत्र, कोको, व्हॅनिला असे बरेच काही पहायला मिळते. 



थेक्कडी मधील प्रेक्षणीय स्थळे माहिती:-


पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि टाइगर रिजर्व 


भारतातील सर्वश्रेष्ठ वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जाते.पेरियार नेशनल पार्क आणि पेरियार टाइगर रिजर्व थेक्कडी मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. 



पार्क मध्ये प्राकृतिक वातावरणात  आशियाई हत्ती, जंगली म्हैस, सांबर हरिण, जंगली डुक्कर, वाघ, जंगली खारुताई, इत्यादी वन्यजीव पाहायला मिळतात.या अभयारण्यात एक समृद्ध जैव विविधता आढळते.सकाळी 6 ते संध्याकळ 6 पर्यंत सुरू असते.


येथील सुंदर कृत्रिम पेरियार तलाव या जागेची सुंदरता अजूनच वाढवतात.जंगली हत्तींची झुंड नेहमीच या तलावात खेळताना दिसून येते.


या ठिकाणी नाव किंवा तराफा घेऊन जवळून वन्यजीव पाहता येतात. या ठिकाणी ट्रेकिंग करु शकता.


वन विभाग वन माध्यमातून हत्तींची सवारी प्रदान करते.



 पैराडाइसियल गिवी:


गिवी थेक्कडी जवळील एक छोट गावं आहे.जे केरळ येथील काही प्रसिद्ध प्रमुख पर्यावरण पर्यटन स्थळांपैकी एक आहे.थेक्कडी पासून एक तास अंतरावर गवी केरल वन विकास निगम यांनी सुरू केले आहे.



ऊंच पर्वत आणि हिरवेगार गालिचे असलेले घाट यांचे सुंदर दृश्य पाहून मन प्रसन्न होते. उष्णकटिबंधीय वने, गवताची मैदाने, आश्चर्यजनक धबधबे, वेलची चे मळे मनाला मोहवून टाकतात. 



पक्षांच्या 260 हून अधिक प्रजाती येथे पाहायला मिळतात.हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.पक्षी प्रेमींसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. येथे आपण ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. त्यासाठी आवश्यक ते साहित्य येथे भाड्याने ऊपलब्ध आहे.



 मसालेदार कुमीली:



केरल ची मसाला राजधानी म्हणुन कुमिली हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सुंदर वृक्षराई आणि तलाव यानी परिपूर्ण आहे.थेक्कडी मध्ये भेट देण्यासाठी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.






मंगलादेवी मंदिर


जर आपण एप्रिल किंवा मे या कालावधीत भेट देण्यासाठी इथे गेला तर येथील प्रसिद्ध मंगलादेवी मंदिराला अवश्य भेट दया. ९ शतकात बांधलेले हे मंदिर घनदाट जंगलात मधोमध उभे आहे.



येथील लोक चित्री पौराणमी उत्सव वेळीच या ठिकाणी जातात.चित्इराई वा चैत्र पौर्णिमा होय. येथे बाजार मध्ये मसाले स्थानिक हस्तशिल्प जरुर खरेदी करा.



 कुरसुमुला:


हे ठिकाण साहसी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे  हायकिंग, ट्रेकिंग, करू शकता. साहसी खेळ आणि क्रीडा साठी लोकप्रिय आहे.



येथून पेरियार वन्यजीव अभयारण्य आणि कुमिली ची आश्चर्यजनक दृश्य पाहु शकता. हे ठिकाण फोटोग्राफर लोकांसाठी स्वर्ग आहे.



 चेल्लोकोविल:


जर आपण शांत आणि दगदगी पासून लांब ठिकाणी फिरायला जायचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी योग्य आहे.

चेल्लोकोविल एक शांत , सुंदर, रमणीय, स्वच्छ असे स्थळ आहे.



येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच स्पाइस टूर आणि आयुर्वेदिक बागाची यात्रा करू शकता. येथील पर्यटस्थळांना भेट देण्यासाठी सर्वात योग्य कालावधी सप्टेंबर ते मे आहे.




बंदीपेरियर:


थेक्कडी आणि जवळील छोट्या छोट्या गावां समूह म्हणजे बंदीपेरियर होय.येथुन जवळच पेरियार नदी वाहते. 



बंदीपेरियर हे थेक्कडी मध्ये भेट देण्यासाठी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

चहा,कॉफी ,काळी मिरी, याच्या बागा येथे पाहता येतात. 


येथे खूप मोठया प्रमाणात चहाचे कारखाने आहेत. येथून तुम्ही चहा, कॉफी, मसाले खरेदी करू शकता.



 वंदमानुडू:


थेक्कडी -मुन्नार राजमार्ग स्थित या छोट्या शहराला प्राकृतिक सुंदरते साठी ओळखले जाते.


येथील पोस्ट ऑफिस हे 1892 मध्ये  ब्रिटिशांनी सुरू केले जे आजतागायत चालू आहे.हे पोस्ट ऑफिस भारतातील  ब्रिटिश निर्मित प्रथम  पोस्ट ऑफिस पैकी एक आहे.त्यामूळे या ठिकाणाला ऐतिहािकदृष्ट्या महत्त्व आहे.


वंदनमू गाव हे त्रावणकोर राजांचे प्रशासन कार्यालय होते.

हे ठिकाण वेलची बागेसाठी खूप प्रसिद्ध आहे.



 पुल्लूमेडु:


पुल्ममेडू हे थेक्कडी मधील सुंदर हिल स्टेशन पैकी एक आहे. पुल्ममेडू चा अर्थ हिरव्या गवताच मैदान होय. जेव्हा आपण येथे भेट देतो तेव्हा हे नाव किती सार्थ आहे याचा अंदाज येतो.




येथे भेट देण्यासाठी सर्वात योग्य कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर असतो. या काळात येथील वातावरण शांत आणि प्रसन्न असते


हे ठिकाण सुंदर अश्या हिरव्या पर्वतानी नटलेले आहे. येथे विविध प्रकारच्या फुलांच्या प्रजाती पाहता येतात. यातील थोड्याफार ठिकाणी पूर्व परवानगी घेऊन आपण भेट देऊ शकता.


येथे भेट देण्यासाठी थेक्कडी मधील वन्यजीव संरक्षण अधिकारी किंवा वल्कादवे मधील रेंज ऑफिसर यांची अनुमति घ्यावी लागते. 



रमाक्कलमेडू:


एक शांत, प्रसन्न, सुंदर असे स्थळ म्हणजे रमाक्कलमेडू.

येथील अख्यायिका नुसार राम सीतेला शोधत येथे आले होते. हे हिल स्टेशन समुद्र सपाटी पासून 3500 फूट उंचीवर आहे.



या पर्वतावर कुरवान आणि कुरथी यांची विशाल मूर्ति असून हे एक प्रमुख पर्यटक आकर्षण आहे.यांनी इडुक्की धरण बांधण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यामूळे त्यांना ऐतिहासिक महत्व आहे.


येथे खूप मोठया प्रमाणात पायी चालत जाण्यासाठी लांबच लांब असे ट्रेल्स आहेत.पावसाळ्यात येथे भेट देऊ नये.



 पीरमुडेु:


त्रावणकोर राजांचे उन्हाळी निवासस्थान आहे पीरमुडेु थेक्कडी मध्ये भेट देण्यासाठी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.शांत वातावरण आणि प्राचीन  काळातील सुंदरता येथे अनुभवता येते.


पेरूमुडू ट्रेकिंग, पैराग्लाइडिंग, सायक्लिंग, घोडेस्वारी साठी एक आदर्श ठिकाण आहे.




कॉफी, चहा, काळी मिरी, वेलची  यांचे सुंदर बागा येथे पाहता येतात.छोटे छोटे धबधबे, सुंदर अश्या हिरव्या पर्वतरांगा यांनी परिपूर्ण असे प्राकृतिक अनुपम आकर्षण आहे.


पीरमुडेु येथील वातावरण उन्हाळ्यात सुध्दा तापमान 10 से 15 डिग्री सेल्सियस असते. त्यामूळे हे एक सुंदर असे स्थळ म्हणून ओळखले जाते. 




कधी जाल:-
येथे भेट देण्यासाठी सर्वात योग्य कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर.

कसे जाल:-

विमान सेवा:-
जवळील विमानतळ मदुराई आहे. जे 136 km अंतरावर आहे. कोची हे 190 km आहे.

रेल्वे सेवा:-
कोट्टायम हे जवळील रेल्वे स्टेशन 114km अंतरावर आहे. त्रिवेंद्रम रेल्वे स्टेशन वरून व्हाया कोट्टायम ही जाता येते.

रस्ता सेवा:-
कोची,कोट्टायम,कोट्टमंगलम,मुन्नार, त्रिवेंद्रम येथुन, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुटतात. टॅक्सी सुविधा, खाजगी वाहन सुविधा उपलब्ध आहेत.



हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

अस्वीकरण (Disclaimer ): 


आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आम्हाला मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...