दक्षिण भारतातील कश्मीर” असे ज्या पर्यटन स्थळाचे वर्णन केले जाते स्थळ म्हणजे “मुन्नार” होय.
मुन्नार हे दक्षिण भारतातील केरळ राज्यातील एक सुंदर असे हिल स्टेशन आहे.चहा च्या बागांमुळे प्रसिध्द असलेले हे हिल स्टेशन दरवर्षी लाखो पर्यटकांचे स्वागत करते.
केरळमधील थंड हवेचे ठिकाण म्हणून मुन्नार प्रसिद्ध आहे. मुन्नार डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी पोहोचल्यानंतर कमालीची थंडी जाणवते.मुन्नार हे अनेकदा हनिमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आल्यानंतर छान थंडीचा आनंद घ्यावा.
मुन्नार चा अर्थ होतो तीन नद्यांचा परिसर,या परिसरातून मधुरपूजहा,नल्लाथंन्नी व कुण्दाली या नद्या वाहतात.हजारो वर्षांपासून मुन्नार च्या परिसरात ‘मल्यारायण’आणि ‘मुत्थुवन’ या जनजातींचे वास्तव्य होते.
मुन्नारचा समावेश होतो.नुकतेच ‘बेस्ट प्लेस फॉर रोमान्स’ हा पुरस्कार देऊन मुन्नार या पर्यटन स्थळाचा गौरव करण्यात आला आहे.
मुन्नार मधील पर्यटन स्थळांची माहिती :-
ऐराविकुलम नेशनल पार्क
केरळ राज्यातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ऐराविकुलम नेशनल पार्क ओळखले जाते.मुन्नार पासून १५ कि.मी.अंतरावर असणारे हे अभयारण्य ९७ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे.
हे राष्ट्रीय अभयारण्य प्रामुख्याने लुप्त होत चाललेल्या निलगिरी तहर या प्राण्यासाठी ओळखले जाते.
सांभार,गवा,हत्ती,बिबट्या,लांडगा इत्यादी वन्यप्राणी व १२८ प्रकारचे पक्षी या अभयारण्यात आढळतात.
अनामुडी ट्रेकिंग पॉइंट
दक्षिण भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर अनामुडी उंची २६९५मी आहे. ऐराविकुलम अभयारण्यात येते. या शिखराचा वरील भाग हत्तीच्या डोक्याच्या आकाराचा दिसतो.
याला हत्तीचा माथा असे ही म्हटले जाते.वन विभागाची परवानगी घेऊन या शिखरावर ट्रेकिंग करता येते.या शिखराच्या माथ्यावरून परिसराचे दिसणारे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसते.ट्रेकिंग ची आवड असलेले लोक या शिखरावर जरूर ट्रेकिंग करतात.
पल्लीवासल
मुन्नार पासून १८ कि.मी.अंतरावर असलेल्या पल्लीवासल येथील पुनर्जनी ट्रेंडीशनल विलेज खूप प्रसिध्द आहे.हे विलेज सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओळखले जाते.केरळ राज्याचे सांस्कृतिक कार्यक्रम येथे सादर केले जातात.तसेच या ठिकाणी १५० मीटर लांबीची नैसर्गिक गुहा देखील आहे. पल्लीवासल जवळ धरण बांधण्यात आले असून इथे केरळ राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र उभारण्यात आले आहे.मुन्नार पर्यटनाला आलेले पर्यटक पल्लीवासल ला जरूर भेट देतात.
इको पॉइंट
मुन्नार पासून १५ कि.मी.च्या अंतरावर समुद्रसपाटीपासून ६०० फुट उंचीवर इको पॉइंट हे प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे.कुंडला तलावाच्या कडेला असलेल्या या ठिकाणी गर्द हिरवी झाडी व काही वेळा दाट धुके पाहायला मिळते.
इको पॉइंट ची रचना अशी आहे की,इथे मोठ्याने आवाज काढला असता त्याचे प्रतिध्वनी ऐकू येतात.या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे इथे दर बारा वर्षांनी नीलकुंजरी नावाची फुले उमलतात.त्यावेळी संपूर्ण परिसर निळ्या शालू मध्ये नटलेला पाहायला मिळतो.इको पॉइंटच्या आसपास अनेक लहानमोठ्या टेकड्या आहेत.येथे ट्रेकिंग चा आनंद घेऊ शकता.
कुंडला धरण
मुन्नार पासून २७ कि.मी.अंतरावर असलेला कुंडला धरण परिसर खूपच नयनरम्य आहे.
हा आशिया खंडातील पहिला कमानदार आर्च डॅम आहे.हे धरण पाहण्यासाठी आवर्जून लोक कुंडला धरण परिसराला भेट देतात.या धरणाच्या जलाशयात बोटिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मत्तूपेट्टी
मत्तूपेट्टी ची समुद्र सपाटीपासून उंची १७०० मीटर इतकी आहे.इथल्या धरण व तलावाच्या परिसरात अनेक पर्यटक पिकनिक साठी येतात.
शांत व निसर्गरम्य वातावरण असलेल्या मत्तूपेट्टी धरण परिसरात बोटिंग व मासेमारी करता येते.अनेक चहाच्या बागा आहेत.फोटोग्राफीसाठी हे एक आदर्श स्थळ आहे.
टाटा टी म्युझियम
मुन्नार ला पर्यटनाला येणारे पर्यटक टाटा टी म्युझियम ला जरूर भेट देतात.मुन्नारच्या नल्लाथन्नी भागात चहा संग्रहालय असून इथे चहा च्या लागवडी पासून कपामधील वाफाळत्या चहा पर्यत चहाचा संपूर्ण प्रवास अनुभवता येतो.
सकाळी १० वाजता व दुपारी २ वाजता चहाच्या संपूर्ण माहितीचे शो सादर केले जातात.हर्बल टी तसेच चहाचे अनेक प्रकार इथे टेस्ट करण्याची सोय आहे.
**अजिबात चुकवू नका**
कलारीपायातु
ही केरळ ची प्राचीन युद्धकला असून मुन्नार मधील कलारी क्षेत्र या मंदिरात दररोज सायंकाळी ५.०० ते ६.०० व ६.०० ते ७.०० या वेळेत या युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवले जाते.
काय खरेदी कराल:-
मसाले:-
केरळ हे मसाल्याच्या पदार्थांसाठी ओळखले जाते.मुन्नार ला Spice library of India म्हणूनही ओळखले जाते.मुन्नार ला अतिशय उत्तम दर्जाचे मसाले मिळतात.वेलची,लवंग,मिरे,दालचिनी असे सर्व प्रकारचे मसाले दर्जेदार व रास्त भावात मुन्नार येथे खरेदी करू शकता.
चहा:-
मुन्नारची ओळख चहा च्या हिरव्यागार बागा म्हणून आहे.मुन्नारचा चहा भारतातील सर्वात उत्तम चहा म्हणून ओळखला जातो. चहा चे अनेक प्रकार टेस्ट करू शकता व विकत घेऊ शकता.
चॉकलेट :-
मुन्नार मध्ये उत्तम दर्जाची चॉकलेट तयार होतात.अनेक प्रकारची व चवीची चॉकलेट विकत घेऊ शकता
आयुर्वेदिक तेल :-
मुन्नार मध्ये अनेक प्रकारची आयुर्वेदिक तेले मिळतात.ज्यांचा उपयोग मालिश व सांधेदुखी,सूज कमी करणे इत्यादींसाठी होतो.
कुठे राहाल:-
मुन्नार मध्ये लो- बजेट पासून हाय-बजेट पर्यंत सर्व प्रकारची हॉटेल्स,रिसोर्ट व होम स्टे उपलब्ध आहेत.
विमान सेवा:-
सर्वात जवळचा विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ असून मुन्नार पासून ११० कि.मी. अंतरावर आहे.
मुंबई,पुणे,नागपूर,दिल्ली सह देशातील सर्व प्रमुख शहरातून कोचीन साठी नियमित विमानसेवा उपलब्ध असते.
रेल्वे सेवा:-
मुन्नार येथे रेल्वेस्टेशन नाही.मुन्नार साठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन एर्नाकुलम (१३० कि.मी.)हे असून देशाच्या सर्व प्रमुख शहरांशी लोहमार्गाने जोडले गेले आहे.
कोइम्बतुर (१५६ कि.मी.) हे रेल्वे स्टेशन सुद्धा मुन्नार साठी जवळचे आहे.
रस्ता सेवा:-
केरळ व तामिळनाडू मधील अनेक शहरातून मुन्नार साठी राज्य परिवहन मंडळाच्या सध्या,निमआराम व वातानुकुलित बसेस सुटतात.
कोचीन मधून मुन्नार साठी बसेस उपलब्ध असतात.म्हैसूर,उटी, कन्याकुमारी,मदुराई या ठिकाणहून मुन्नार साठी बसेस मिळतात.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आम्हाला मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा