google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : पद्मनाभ मंदीर | Padamanabham Temple

माझी ब्लॉग सूची

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

पद्मनाभ मंदीर | Padamanabham Temple

केरळात असंख्य मंदीरे आहेत, त्यांची कारागिरी त्यांची निर्मीती त्या मंदीरांना एक सन्मान मिळवणारी आहे, तसेच प्रत्येक मंदीराची आपली एक कहाणी देखील आहे. 


तिरूवनंतपुरम येथील पद्मनाभ मंदीर देखील एक असेच मंदीर आहे, लाखो भाविक या मंदीराला बघण्याकरता दरवर्षी आकर्षीत होतात. भारतातील सगळयात जुन्या मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे आणि विशेष म्हणजे सर्वात श्रीमंत मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे.


पद्मनाभ मंदीर इतिहास:-

पद्मनाभस्वामी मंदीरात ब्रम्ह पुराण, मत्स्य पुराण, वराह पुराण, स्कन्द पुराण, वायु पुराण, भागवत पुराण आणि महाभारताचा उल्लेख सापडतो. इतिहासकार याला स्वर्ण मंदीर म्हणतात. अद्भुत आणि अविश्वसनीय संपत्तीकरता हे मंदीर नेहमीच चर्चेत असतं.


इ.स ९ मधील तामीळ साहित्य आणि कविता तसेच संतक वी नाम्माल्वर यांच्या नुसार मंदीरातील तसेच शहरात सोन्याच्या भिंती आहेत.

ही ठिकाण मंदीर, आसपासचा परिसर पाहुन स्वर्गात आल्याचा भास होतो. इसवी सन ६ आणि ९ मधल्या तामिळ साहित्य आणि सिध्दांतात आढळलेल्या उल्लेखाप्रमाणे हे मंदीर प्रमुख १०८ मंदीरांपैकी एक आहे.


पद्मनाभ मंदीरासंबंधीत रंजक गोष्टी:-

शाही मुकुट :-

भगवान विष्णु इथले प्रमुख देव आहेत तसेच पद्मनाभस्वामी मंदीराचे आणि त्रवंकोरे चे शासक सुध्दा. हा मुगुट इ.स १८ मधल्या त्रवंकोरे राजा चा आहे आणि शाही परिवारातील सदस्य त्यांच्या वतीने राज्यकारभार करतायेत. हा मुकुट नेहमी त्रवंकोरे मंदीरात सुरक्षित असतो.


मंदिराची शैली :-

या मंदीराचे निर्माण संमिश्र आहे द्रविड आणि केरळ शैली यात आपल्याला बघायला मिळते. आपण व्यवस्थित बघितल्यास आपल्या लक्षात येतं की केरळातील कुठलेही मंदीर याइतके मोठे नाही बऱ्याचशा मंदीराचे छत उतरते आहे यांच्या बऱ्याच आख्यायिका देखील ऐकायला मिळतात. 


या भागातील बरेच मंदीरं पद्मनाभ मंदीराच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या द्रविड शैली पासुन प्रभावित झालेले बघायला मिळतात. बरेच मंदीर जवळच्या तामिळनाडु राज्या पासुनही प्रभावीत आहेत.


मंदिराची संपत्ती:-

बऱ्याच काळापासुन मंदीरात नृत्य चालत आले आहे, यामुळे कुणाच्या ही मदतीशिवाय मंदीराची संपत्ती दुसऱ्या कुणापेक्षाही सगळयात जास्त आहे. २०११ साली या मंदीरातील तळघर उघडण्यात आले तेव्हां इतके धन सापडले की हे मंदीर जगातील सगळयात श्रीमंत मंदीर बनले. या आधी मुगल खजाना जो सापडला होता तो ९० बिलीयन डॉलर हा सगळयात जास्त होता.


लक्षा दिपम उत्सव :-

लक्षा दिपम उत्सव हा उत्सव दर सहा वर्षांनी मंदीरात साजरा होतो हा या मंदीराचा सगळयात मोठा उत्सव असतो. या उत्सवात मंदीरात हजारो लाखे दिवे लावले जातात. 


हा उत्सव मकर संक्रांतीला साजरा होतो. अन्न धान्य खुप असल्याचे संकेत हा उत्सव देतो या दिवशी पद्मनाभ नरसिंह आणि कृष्णाच्या प्रतिमांना खुप सजवुन विशाल 


पद्मनाभ मंदिर :- 

मंदिराचे बांधकाम केरळ व द्रविडीयन पद्धतीचे आहे. मंदिरात शिल्पकला व भिंतीवरील चित्रे उत्कृष्ठ व प्रसिध्द आहे .येथे विष्णूची मूर्ती आहे व ती अनंत नावाच्या नागावर लवंडून बसलेली आहे.


श्री पद्मनाभ मंदिराची वास्तूरचना केरळीय व द्रविडी शैली चे मिश्रण आहे.या मंदिराच्या पुनर्बांधणी च्या वेळी काही खास बाबी ध्यानात ठेवल्या गेल्या.भव्य आकार असला तरी या मंदिराचे शिल्पसौंदर्य नकळतही कमी होत नाही.

या मंदिराचे गोपुरम द्रविडी शैलीमधील आहे.सात मजली गोपुरम ३० मीटर उंचीचे आहे.गोपुरम वर सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते.

या मंदिराच्या आतील भिंतीवर अनेक भित्तीचित्रे काढलेली आहेत,ज्यामध्ये भगवान विष्णुंची झोपलेली अवस्था,नरसिंहा,गणपती व गजांत लक्ष्मी अशा प्रतिमा पाहायला मिळतात.

या मंदिराचा ध्वजस्तंभ ८० फुट उंचीचा असून सुवर्णलेपित आहे.मंदिरामध्ये बाली पिडा मंडपम आणि मुख मंडपम हे दोन सभामंडप आहेत.

मंदिरात विजेचे दिवे लावत नाही,फक्त तुपाचे किंवा तेलाचेच दिवे लावले जातात.

मंदिर बरेच तास बंद असते व प्रेक्षकांची रांग असते.हे लक्षात ठेवूनच दर्शनाला कधी यायचे ते ठरवावे लागते. 


श्री पद्मनाभ मूर्ती:-

श्री पद्मनाभ मूर्ती मंदिराचे गर्भगृह हे दगडी उंचवट्यावर स्थापित आहे.या गर्भगृहात श्री पद्मनाभ यांची १८ फुट लांबीची झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे.


या मूर्तीचे तीन दरवाजातून दर्शन घेता येते,पहिल्या दरवाजातून मुख व छाती पर्यंतचा भाग दिसतो.

दुसऱ्या दरवाजातून पोट,कंबर व हात दिसतात तर तिसऱ्या दरवाजातून पद्मनाभांच्या चरणांचे दर्शन घेता येते.

पद्मनाभांची मूर्ती तयार करण्यासाठी १२००८ शाळीग्राम दगड वापरण्यात आले जे नेपाळ मधील गंडकी नदीतून आणण्यात आले होते.

**या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश मिळतो.पुरुषांनी धोतर घालून व स्त्रियांनी साडी व पोलके घालूनच प्रवेश केला पाहिजे असा कडक नियम आहे.**

**सकाळची पूजा व दर्शनाची वेळ:

सकाळी ०३.३० ते ४.४५ (निर्माल्य दर्शनम)

सकाळी ०६.३० ते ०७.०० पर्यंत

सकाळी ०८.०० ते १०.०० पर्यंत

सकाळी १०.३० ते ११.१० पर्यंत

दुपारी ११.४५ ते १२.०० पर्यंत


**सायंकाळची पूजा व दर्शनाची वेळ:

सायंकाळी ०५.०० ते ०६.१५ पर्यंत

सायंकाळी ०६.४५ ते ०७.२० पर्यंत


कुटीरमालिका : - (पुथेन मालिका हे दुसरे नाव) राजवाड्यातील वस्तूसंग्रहालय हे महाराजा स्वामी बलराम वर्मा ह्या त्रावणकोरच्या राजाने उभारलेले वस्तूसंग्रहालय आहे .हा राजा प्रसिध्द कवी ,गायक,समाजसुधारक व राजकारणी होता . वस्तूसंग्रहालयात पेंटींग्ज व राजघराण्यातील अनेकामौली वस्तू संग्रहित केलेल्या आहेत . हे स्थळ पद्मनाभ मंदिराच्या जवळच आहे .हे संग्रहालय सकाळी ८.३० ते १२.३० व दुपारी ३.३० ते ५.३० पर्यंत उघडे असते .


श्री चित्रा आर्ट :- 

ही नेपियर म्युझियमच्या जवळच आहे. येथे राजा रविवर्मा रंगीत,स्वेटलोवा व निकोलस रोएचित यांनी काढलेली रंगीत चित्रे ,राजपूत,मोंगल व तंजावर शैलीची चित्रे तसेच चीन,जपान, तिबेट,बाली येथील रंगीत चित्रे आहेत .


नेपियर म्युझियम :- १९ व्या शतकात बांधलेले इंडो-सारेसेनिक या स्थापत्यकलेचे हे स्थळ नैसर्गिक थंड हवेचे ठिकाण आहे येथे रंगीत चित्रे ,ब्राँझच्या मूर्ती, तसेच इ ऐतिहासिक व महत्त्वाच्या वस्तू ,मंदिराचा रथ व हस्तिदंत वस्तू आहेत .


कधी जाल:-

ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी योग्य आहे.


कसे जाल:-

विमान सेवा:-

तिरुवनंतपुरम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देश-विदेशातील सर्व प्रमुख शहरातून तिरुवनंतपुरम साठी नियमित विमानसेवा सुरु असते.विमानतळावरून मंदिरासाठी कॅब, रिक्षा किंवा बसेस सहज मिळतात.


रेल्वे सेवा:-

तिरुवनंतपुरम येथे रेल्वे स्टेशन असून ते देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे सेवेने जोडले गेले आहे.हे रेल्वे स्टेशन मंदिरापासून फक्त ६०० मीटर अंतरावर आहे.


रस्ता सेवा:-

तिरुवनंतपुरम हे शहर नजीकच्या राज्यातील प्रमुख शहरांशी रस्तामार्गाने जोडले गेले आहे.कोची,कन्याकुमारी,चेन्नई,बंगुलुरू इत्यादी शहरातून त्रिवेंद्रम साठी बससेवा सुरु असते.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आम्हाला मेल करु शकते किंवा  प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...