केरळ राज्य आपल्या अमर्याद निसर्गसौंदर्य,बैकवाटर,लहान-मोठे तलाव,कॉफीच्या बागा,हत्तींचे कळप,थंड हवेची ठिकाणे या व अशा बर्याच वैशिष्ठ्यांमुळे दरवर्षी लाखो पर्यटकांना आपल्याकडे आकर्षून घेते.
थिरूवनंतपुरम ही केरळ ची राजधानी असून थिरूवनंतपुरम,कोची,कोझिकोड,कोल्लम,थ्रिसूर,कन्नूर,अल्लेप्पी,कोटायम,पल्लकड,मल्लपुरम ही काही महत्त्वाची शहरे आहेत.
‘देवभूमी’ अशी ओळख असलेल्या केरळ मध्ये आपल्याला समृद्ध जैव-विविधते बरोबरच सांस्कृतिक ठेवा जपलेला पाहायला मिळतो.
त्रिवेन्द्रम किंवा तिरुवनंतपुरम
ही केरळ ची राजधानी असून पर्यटना साठी अत्यंत सुंदर शहर आहे.प्रसिध्द असे पद्मनाभस्वामी मंदिर या शहरात असून आपल्या अमर्याद संपत्ती मुळे देशभरात प्रसिद्ध आहे.
भगवान विष्णूचे देशातील पुरातन मंदिर असल्यामुळे अनेक भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात.
पद्मनाभ स्वामी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला दुपारी १२ च्या आत जावे लागेल,कारण दुपारी १२ नंतर मंदिर दर्शनासाठी बंद होते.त्रिवेन्द्रम मध्ये नेपियर संग्रहालय,समुद्र किनारा व शहरातील ब्रिटीश वास्तुकलेच्या इमारती पाहण्यासारख्या आहेत.
अल्लेप्पी
येथे आपण अथांग बैकवाटर, हिरवीगार भात शेती व नारळाच्या बागा यांचा आनंद घेऊ शकता.अल्लेप्पी ला पूर्वेकडील व्हेनिस असे ही म्हटले जाते.दोन्ही बाजूला नारळाच्या बागा,भात शेती असलेल्या कालव्यातून सतत ये-जा करणाऱ्या लहान-मोठ्या बोटी.
या बोटीतून केलेले नौकानयन स्मृती मध्ये राहते.हाउस बोटीत राहण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो.
दर वर्षी येथे बोटींची शर्यत होते,ती पाहण्यासाठी लाखो लोक अल्लेप्पी ला हजेरी लावतात.
मुन्नार
केरळ मधील मुन्नार या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल तुम्ही ऐकले असेल किंवा चित्रपटातून मुन्नार चे निसर्ग सौंदर्य पाहिले असेल.
उंच डोंगरावर असलेले मुन्नार हे हनिमून डेस्टीनेशन म्हणून ओळखले जाते.
उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येतात.
इको पॅाईंट,अत्तुकडी धबधबा,मुट्टीपुट्टी तलाव,पोथामेडू पॅाईंट. टी म्यूझियम ही काही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.
कोचीन
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले कोची हे शहर कोचीन या नावानेही ओळखले जाते.पोर्तुगीजांच्या राजवटी पासून कोची हे प्रसिध्द असे बंदर आहे.आजही इथून आयात-निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो.
खरेदीसाठी कोची प्रसिद्ध असून कपडे,शोभेच्या वस्तू,दागदागिने यांची खरेदी पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात.
कोची मध्ये कोची किल्ला, कला संग्रहालय,चेराई बीच ही काही पाहण्यासाठी असलेली ठिकाणे आहेत.विशेषतः चायना फिशिंग नेट ने केलेली मासेमारी पाहण्यासाठी पर्यटक कोची ला आवर्जून भेट देतात.
वर्कला बीच
केरळ मधील सर्वात सुंदर बीच आहे वर्कला बीच.या समुद्रकिनार्यावरून सूर्यास्ता चे दृश्य अप्रतिम दिसते.इथे जल क्रीडा करू शकता.
वर्कला मध्ये जनार्दन स्वामी मंदिर,विष्णू मंदिर,शिवगिरी मठ इत्यादी पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.
पेरियार नेशनल पार्क
हे ठिकाण पर्यावरण प्रेमी पर्यटकांसाठी असून भेट दिलीच पाहिजे असे ठिकाण आहे.९२५ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य प्रामुख्याने वाघ आणि हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.
या अभयारण्यात वाघ आणि हत्तींसह ३५ प्रकारचे वन्यप्राणी,मलबार-ग्रे-हॉर्नबिल सह २६६ प्रकारचे पक्षी,किंग कोब्रा सह ४५ प्रकारचे सरीसृप व १६० प्रकारचे कीटक व फुलपाखरे पाहायला मिळतात.
या अभयारण्यात असलेल्या मुल्लापेरीयार धरणात सकाळच्या वेळी बांबू च्या तराफ्यावर बसून काठावरील विविध वन्यजीवांना जवळून पाहता येते हा अविस्मरणीय अनुभव येथे घेता येतो.
पेरियार अभयारण्या जवळच कॉफी व मसाल्याच्या बागा असुन येथुन कॉफी व मसाल्याची खरेदी करू शकता.
पलक्कड
रमणीय वातावरण व शांत बैक वाटर्स साठी प्रसिध्द आहे.पला नावाच्या झाडांमुळे या ठिकाणाला पलक्कड हे नाव पडले.
भातशेती साठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाला केरळी जीवन व संस्कृती जवळून पाहण्यासाठी अनेक पर्यटक हजेरी लावतात.
इथे हाउस बोटीत राहण्याचा,केरळीय मसाज व स्थानिक भोजनाचा आनंद घेऊ शकता.
कोझिकोड
हे कालिकत या नावाने ही ओळखले जाते. सन १४९८ साली वास्को-द-गामा याने भारतात पहिले पाऊल कप्पद या ठिकाणी ठेवले,तिथे छोटे स्मारक बांधण्यात आले आहे.
केरळ राज्य शासनाच्या वतीने संचालित केले जाणारे वस्तू संग्रहालय शहराच्या पूर्वेस टेकडीवर असून प्राचीन कला व संस्कृतीची झलक या संग्रहालयात पाहायला मिळते.
कोझिकोड बीच शहराच्या जवळच असून मावळतीच्या सूर्यास्त पाहण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे.या बीच जवळच मत्स्यालय असून सागरी जीवांचे अदभूत विश्व पाहायला मिळते.
कुमारकोम
हे केरळ मधील एक प्रसिध्द पर्यटन स्थळ असून हे वेम्बनाड सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.नैसर्गिक सौंदर्याने नटलेले वेम्बनाड शांत व रमणीय ठिकाण आहे.
या सरोवरात नौकानयनाची सोय असून वन्यजीव व पक्षी निरीक्षण करण्यासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.या ठिकाणी मसाज स्पा ची देखील सोय आहे.
पूवर
हे केरळ मधील पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या स्थळांपैकी प्रमुख स्थळ आहे.समुद्र,नदी,तलाव या तिन्ही प्रकारामध्ये नौकानयन करता येते.
शांत व रमणीय ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी पूवर हे उत्तम ठिकाण आहे.सोनेरी रेती असलेल्या बीच वर डुंब ण्याची मजा घेऊ शकता,नदीमध्ये लहान बोटीतून फेरफटका मारू शकता किंवा तलावात हाउस बोटीवर राहू शकता.
या तलावाच्या किनारी असलेल्या तंबू किंवा रिसोर्ट मध्ये मुक्काम करून इथल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता.
कोवलम
थिरूवनंतपुरम पासून १६ कि.मी.अंतरावर असलेले कोवलम हा आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त समुद्र किनारा आहे.एक मेकांना लागून तीन बीच इथे पाहायला मिळतात.
सायंकाळच्या वेळी या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची लगबग सुरु होते.समुद्रस्नान,सूर्यस्नान,नौकानयन,मसाज,सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचा आस्वाद इथे घेता येतो.
त्रिशूर
त्रिशूर ला केरळची सांस्कृतिक राजधानी म्हणतात.धार्मिक उत्सवासाठी त्रिशूर ओळखले जाते.एप्रिल-मे मध्ये साजरा केला जाणारा त्रिशूर पूरम उत्सव केरळ मधील प्रमुख उत्सव आहे.
सजवलेले हत्ती,पताका-पालख्या व वाद्यांच्या गजरात साजरा केला जाणारा हा उत्सव डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.हजारो देशी-विदेशी पर्यटक या सोहळ्याला हजेरी लावतात.
यावेळी दोनशे पेक्षा जास्त कलाकार पारंपारिक वाद्यांचे वादन करून आपली कला सादर करतात.त्रिशूर मध्ये मंदिरे,पुरातत्व संग्रहालय व अथिरापल्ली धबधबा ही अन्य पर्यटन स्थळे आहेत.
कधी जाल:-
पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात चांगला सीजन असतो ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात वातावरण स्वच्छ व आल्हाददायक असते.
जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाचा असला तरी अनेक पर्यटक वर्षा सहलीसाठी केरळला भेट देतात.
कसे जाल:-
विमान सेवा:-
केरळ मधील कोची,थिरूवनंतपुरमव,कोझिकोड हे तीन प्रमुख विमानतळ असून कोची व थिरूवनंतपुरम या दोन्ही विमानतळा वरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित आहे.
कोझिकोड या विमानतळावरून देशांतर्गत व आखाती देशांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे.
रेल्वे सेवा:-
थिरूवनंतपुरम,एर्नाकुलम,कोल्लम,कोझिकोड ही प्रमुख रेल्वे स्टेशन असून देशातील मुंबई,दिल्ली,कोलकाता,चेन्नई या प्रमुख शहरांशी लोहमार्गाने जोडले गेले आहेत.
राजधानी,दुरोन्तो,मेल एक्सप्रेस अशा जलद व आरामदायी रेल्वे केरळ ला जाण्यासाठी उपलब्ध असतात.केरळ मध्ये इतर २०० रेल्वे स्टेशन असून राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सहजतेने करता येतो.
रस्ता सेवा:-
केरळ मध्ये रस्त्यांचे जाळे उत्तम आहे.कर्नाटक,तामिळनाडू व गोवा या राज्यातून केरळ साठी राज्य परिवहन मंडळाच्या आरामबस व खासगी वोल्वो बस नियमित सुटतात.
जल सेवा:-
आंतरराष्ट्रीय क्रुझ बोटी केरळ मधील कोची या बंदरावर काही काळ थांबा घेतात.अरबी समुदात असलेल्या लक्षद्वीप या बेटांवर पर्यटनाला जाण्यासाठी कोची इथून बोटीने जाता येते.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आम्हाला थेट मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा