भारताचा एक केंद्रशासित प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेले अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला जनु ‘पाचूची बेटे’ म्हटले जाते.
अंदमान हा शब्द मलय भाषेतील “हन्दुमान” या शब्दावरून घेतला आहे मलय भाषेत हनुमानाला हन्दुमान असं म्हटलं जातं. तर निकोबार या शब्दाचा मलय भाषेतील अर्थ “नग्न लोकांची जमीन” असा होतो.
अंदमान निकोबार बेट समूह 572 लहान-मोठ्या बेटांचा बनला आहे. यापैकी काही बेटावरच मानवी वस्ती आहे बंगालच्या खाडीच्या दक्षिण दिशेला असलेल्या अंदमान-निकोबार द्वीप समूहाची राजधानी पोर्ट ब्लेअर ही आहे.
अंदमान निकोबार बेटावर ठीक-ठिकाणी घनदाट झाडी, जीव सृष्टीचे वैविध्य तसेच अनोखे समुद्री जीवन पाहिल्यानंतर साक्षात स्वर्गातील बाग म्हणजेच “गार्डन ऑफ ईडन” या नावाने अंदमानला ओळखले जाते हे अनुभवता येते.
अंदमान निकोबार या बेटांना भेट देणारे पर्यटक खास करून समुद्रातील जीवन आणि विविध जलक्रीडा यांची आवड असणारे असतात. या बेटावर करण्यात येणाऱ्या जलक्रीडा जगातील अत्यंत चांगल्या दर्जाच्या जलक्रीडा पैकी एक आहेत.
ही बेटे सतराव्या शतकापर्यंत मराठा शासकांच्या ताब्यात होती त्यानंतर इंग्रजांनी या बेटावर आपला कब्जा केला. अंदमान व निकोबार बेटावर मोती, शंख शिंपले यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
अंदमान निकोबार द्वीपसमूह इतिहास:-
या बेटावर असणारी मानवी वस्ती केव्हापासून आहे याबद्दल ठोस माहिती उपलब्ध होत नाही. इतिहासातील दाखल्यांच्या अनुसार १७८९ मध्ये इंग्रजांनी अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली.
इंग्रजांनी या बेट समूहावर भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना शिक्षा करण्यासाठी ठेवण्यास सुरुवात केली. या ‘काळे पाणी’ किंवा ‘काळ्यापाण्याची शिक्षा’ असेही म्हटले जाते प्रसिद्ध असा सेल्युलर जेल याठिकाणी उभारण्यात आला.
अंदमान निकोबार बेट रंजक माहिती:-
१) अंदमान निकोबार बेट समूहापैकी काही बेटांवर राहणारे मूळनिवासी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांशी अजिबात मिसळत नाहीत. या ठिकाणी प्रामुख्याने जारवा ही आदिम जनजाति आढळते ज्यांची संख्या कमी असून ते इतर लोकांशी अजिबात मिसळत नाहीत.
२) अंदमान निकोबार बेटांवरील या प्राचीन जनजाती बद्दल संपूर्ण जगभरामध्ये कुतूहल आहे. परंतु या बेटांपैकी अशी काही बेटे आहेत जिथे सामान्य माणूस पोहचू शकत नाही या एकूण 570 बेटांपैकी फक्त 36 बेटांना पर्यटक किंवा सामान्य लोक भेट देऊ शकतात. इतर बेटांवर जाण्यासाठी खास अशी परवानगी घ्यावी लागते.जी सामान्य पर्यटकांना मिळत नाही.
३) अंदमान निकोबार बेट समूहावर समुद्री कासव सर्वात जास्त संख्येने आढळतात जगातील सर्वात मोठी कासवे याच ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांचे नाव Dermocheleys Coriacea आहे ही कासवे आकाराने खूप मोठी असतात.
४) जगातील सर्वात लहान कासव मानले जाणारे ऑलिव्ह रिडले हे कासव अंदमान निकोबार बेट समूहावर सहज पाहता येते.
५) भारतीय वीस रुपयाच्या नोटेवर जो जंगलाचा भाग दाखवलेला आहे तो अंदमान बेट समुहा चाच एक भाग आहे. जो माऊंट हेरिटेज या नावाने ओळखला जातो माऊंट हेरीटेज हे अंदमान निकोबार बेट समूहातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे.
६) अंदमान निकोबार द्वीपसमूह वर व्यवसायिक मासेमारी निषिद्ध आहे या ठिकाणी मासे आपल्या जीवनातील पूर्ण कालखंड पूर्ण करू शकतात.
७) अंदमान निकोबार बेट समूहाला ‘हॅप्पी आयलंड’ असंही मानलं जातं, कारण येथे मोठ्या संख्येने फुलपाखरे पाहायला मिळतात. विभिन्न आकाराची व रंगसंगती असणारी फुलपाखरे आसपासच्या बेटांवरून याठिकाणी येतात जी खूपच आकर्षक दिसतात.
८) अंदमान निकोबार बेट समूहावर पहिली वसाहत बनवणारा युरोपीय नागरिक डेन्मार्क या देशाचा होता. जो १७५५ मध्ये अंदमान या ठिकाणी पोहोचला. त्यानंतर सतराशे एकोणनव्वद मध्ये इंग्रज पहिल्यांदा अंदमान या ठिकाणी पोहोचले व त्यांनी या बेटांवर आपल्या वसाहती आणि नौसेनेचा चा तळ तयार केला.
९) हॅवलॉक आणि नील ही दोन बेटे अंदमान मधील सर्वात प्रसिद्ध बेटे आहेत या दोन बेटांची नावे ईस्ट इंडिया कंपनी मधील दोन अधिकारी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहेत.
१०) अंदमान निकोबार बेट समूहासाठी सर्वात जवळची भूमी इंडोनेशिया आणि म्यानमार या देशांची आहे. इंडोनेशिया अंदमान पासून एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर भारताची सीमा अंदमान पासून आठशे किलोमीटर अंतरावर आहे.
११) अंदमान आणि निकोबार बेट समूहावर मानव कित्येक हजारो वर्षापासून राहात आलेला आहे निकोबार बेट समूहावर राहणारी निकोबारी तसेच जारवा या जमातींचा अनुवंशिक सांस्कृतिक आणि भाषेसंबंधी चा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, या जमाती तीन हजार ते सात हजार वर्ष अगोदर मध्य अश्युगापासून राहत असावेत. शासकीय दस्ता-ऐवजांवरून सारे येथे राहणारे लोक 2200 वर्षापासून राहत असावेत अशी माहिती उपलब्ध होते.
१२)जगातील सर्वात प्राचीन मानव याच ठिकाणी राहत असून अजूनही ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहतात. आधुनिक युगाचा कसलाही संपर्क त्यांच्याशी आलेला नाही.
१४)हॅवलॉक या बेटावर असणारा राधानगर बीच आशिया खंडातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा मानला जातो.
राधानगर बीच
या बेटावर नितळ निळ्या पाण्याच्या समुद्रकिनारी शांत वातावरण आणि रोमांचित करणाऱ्या जलक्रीडा अनुभवण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक या बेटाला भेट देतात.
राधानगर बीच ला चॉईस टाईम मॅक्झिन तसेच अनेक माध्यमांनी आशिया खंडातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा म्हणून घोषित केले आहे.
हॅवलॉक बेट
अंदमान बेट समूहातील हैवलॉक हे बेट स्कुबा डायविंग साठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाचे स्कुबा डायविंग केले जाते जे प्रशिक्षित तज्ञांच्या मार्फत केले जाते.
ज्या पर्यटकांना स्कुबा डायविंग ची आवड आहे व ज्यांना स्कुबा डायविंग मध्ये अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे ती लोक या बेटाला जरूर भेट देतात व स्कुबा डायविंग करून पाण्याखालील जीवन अनुभवतात.
बाराटांग बेट
पोर्ट ब्लेअर पासून बाराटांग हे बेट शंभर किलोमीटर अंतरावर आहे हे बेट प्लांटेशन साठी प्रसिद्ध असून नैसर्गिक रित्या तयार झालेल्या मंग्रोव च्या बोगद्यातून बोटिंग करण्याची मजा या ठिकाणी घेता येते.
या ठिकाणी असलेल्या खाडीमध्ये चुनखडीच्या गुहा आहेत जिथे जाण्यासाठी सोबत टोर्च घेणे आवश्यक असते. खडकाचे विविध आकार या गुहांमध्ये पाहता येतात.
सेल्युलर जेल
अंदमान निकोबार बेट समूहांना भेट देणारा पर्यटक खास करून भारतीय पर्यटक सेल्युलर जेल ला भेट देतात.हे अनुभवन खूप उत्सुकतापूर्ण असतं. ब्रिटीश राजवटीमध्ये भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना आणि वीर जवानांना तुरुंगात ठेवण्यासाठी अंदमान या बेटावर सेल्युलर जेलची उभारणी १८९७ साली करण्यात आली.
या तुरुंगात ६९४ कोठड्या होत्या. या कोठड्यांच्या या भिंतीवर आजही स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहिलेली पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी असलेल्या संग्रहालयात अनेक चित्रे पाहता येतात. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी सहन केलेली अत्याचारही पाहता येतात.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानी सैनिकांनी सेल्युलर जेलचा काही हिस्सा नष्ट केला परंतु आजही या ठिकाणी आल्यानंतर आपल्या पूर्वजांनी व त्यांनी केलेल्या त्यागाची, बलिदानाची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
भेट देण्यासाठी वेळ:-
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत .
सायंकाळी सात वाजता या ठिकाणी Light and Sound show सादर केला जातो.
त्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाची व सोसलेल्या अत्याचाराची चित्रफित पाहता येते.
माउंट शेरेटन
ज्या पर्यटकांना ट्रेकिंगची आवड असते व जे पर्यटक नैसर्गिक वातावरणातील विविध वनस्पतींचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी माऊंट शेरेटन ही पर्वणी मानली जाते.
या ठिकाणी अनेक ट्रेकिंग मार्ग असून सोळा किलोमीटर अंतरापर्यंत ट्रेकिंग याठिकाणी केले जाऊ शकते. या मार्गावर अनेक देशी-विदेशी वनस्पती तसेच वन्यजीव पाहण्याची संधी पर्यटकांना प्राप्त होते.
राजीव गांधी वॉटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स
अंदमानला आलेले पर्यटक विविध जलक्रीडा अर्थात वॉटर स्पोर्ट चा आनंद घेतात. बनाना राईड, पॅरासेलिंग, कयाकिंग, बोट पेड्डलींग, स्पीड बोट इत्यादी जलक्रीडा आनंद राजीव गांधी वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी घेता येतो. या ठिकाणी प्रत्येक जलक्रीडा यासाठी वेगवेगळी फी असून त्याची सुरुवात तीनशे रुपयापासून होऊन पाच हजार रुपयां पर्यंत जाते.
महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क
281 चौरस किलोमीटर क्षेत्रांमध्ये पसरलेल्या महात्मा गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी जवळ जवळ पंधरा लहान मोठी बेटे असून या बेटांची सहल करण्याचा आनंद पर्यटक घेऊ शकतात.
या ठिकाणी स्नॉर्कलिंग ग्लास बॉटम बोट राईड, स्कुबा डायविंगचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. इथले नितळ निळे पाणी पाण्यातील जल जीवांचे स्पष्ट दृश्य पाहु शकता.
दिगलीपूर
निसर्गसौंदर्याची आवड असणारे पर्यटक अंदमान येथील दिग्लीपुर या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.
दिग्लीपुर या ठिकाणी अंदमान द्वीपसमूहातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे या अभयारण्यात मगर, सरपटणारे जीव तसेच नैसर्गिक गुहा पाहण्यास मिळतात.
रास आयलँड
रास आयलेंड ला पूर्वेकडील पॅरिस या नावानेही ओळखले जाते. असे म्हटले जाते की 1941 साली आलेल्या भूकंपाने आणि जपानने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी केलेल्या आक्रमणा ने आयलँड उध्वस्त झाले होते.
आजही या ठिकाणी ब्रिटिशांनी बांधलेली अनेक वास्तुशिल्पे पाहायला मिळतात. ज्यामध्ये प्राचीन इमारती तसेच वसाहतीसाठी बनवलेल्या इमारती व इत्यादी बाबी पाहू शकतो. हे बेट अंदमान मधील पाचूचे बेट म्हणून ओळखले जाते.
अंदमान आणि निकोबार बेटांची निर्मिती :-
भारतीय प्लेट आणि बर्मा मायनर प्लेट यांच्या आपसातील टकरीमुळे अंदमान आणि निकोबार बेट समूहाची निर्मिती झाली अंदमान आणि निकोबार बेट समूह म्यानमारच्या आराकान प्रांताचा दक्षिण बाजूकडील विस्तार म्हणून ओळखला जातो.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह :-
अंदमान आणि निकोबार येथे एकूण 572 बेटे असून त्यांचे क्षेत्रफळ 8 हजार 249 चौरस किलोमीटर इतका मानलं जातं. या बेटांपैकी फक्त 38 बेटावर मानवी वस्ती असून त्यापैकी काही बेटावर अडीच हजार वर्षांपूर्वीच्या आदिम जनजाति वास्तव्याला आहेत जिथे सामान्य पर्यटक जाऊ शकत नाहीत.
अंदमान निकोबार बेटे प्रसिद्ध :-
अंदमान निकोबार बेटे ही भारतीय स्वातंत्र्याच्या काळातील काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी तसेच मोत्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत . येथे नैसर्गिकरित्या उत्पादित होणार्या फळे आणि भाजीपाला साठी प्रसिद्ध आहेत.
भाषा :-
अंदमान निकोबार बेट समूहावर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा बंगाली ही असून त्यानंतर हिंदी तमिळ तेलुगू आणि मल्याळम यांचा समावेश होतो अंदमान बेट समूहावर हिंदी भाषा दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाते.
भेट देण्यासाठी कालावधी :-
- नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी अंदमान निकोबार बेटांचा सहलीसाठी सर्वात उत्तम मानला जातो. या काळात इथले वातावरण अत्यंत अल्हाददायक असते.
- एप्रिल ते जुलै या काळात तापमान 24 अंश सेल्सिअस या काळात सर्व जलक्रीडा यांचा आनंद घेऊ शकता.
- जुलै ते सप्टेंबर या काळात इतके तापमान 22 ते 35 अंश सेल्सिअस राहते.या काळात मानसून आगमनामुळे जलक्रीडा बंद असतात.
- ऑक्टोबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान असल्यास सहल सुखद होते.
- ऑक्टोबर ते मे हा अंदमान येथील वार्षिक पर्यटन उत्सवाचा कालावधी आहे .
- पावसाळ्यानंतर या ठिकाणी स्नॉर्कलिंग व स्कुबा डायविंग इत्यादी जलक्रीडा करण्यासाठी लाखो पर्यटक भेट देतात.
- अंदमान निकोबार बेटांचे ट्रॉपिकल क्लाइमेट असल्यामुळे इथल्या तापमानामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये चढ-उतार आढळतो.
- या बेटावर वर्षभर हवेमध्ये 80 टक्के आर्द्रता असते. नोव्हेंबर ते मध्ये डिसेंबर पर्यंत या ठिकाणी काहीवेळा दुपारी पाऊस पडतो.
कसे जाल:-
अंदमान निकोबार बेट समूह समुद्रात असल्याने या बेटांवर जाण्यासाठी बस किंवा ट्रेन या सेवांचा लाभ घेता येत नाही.
अंदमान आणि निकोबार या बेटांवर जाण्यासाठी फक्त विमान सेवा आणि जहाज सेवा यांचाच वापर केला जाऊ शकतो.
विमान सेवा:-
महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरातून अंदमान येथील पोर्ट ब्लेअर या विमानतळासाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहेत.
मुंबई दिल्ली अहमदाबाद बेंगलोर कोलकत्ता चेन्नई या शहरावरून अंदमान साठी नियमित विमान सेवा उपलब्ध असते.
अंदमानला जाण्यासाठी फक्त डोमेस्टिक विमानसेवा उपलब्ध असते.
परदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी:-
विदेशातून येणारे पर्यटक सर्वप्रथम भारतातील कोणत्या शहरात येऊन तिथून अंदमान साठी विमानसेवा घेऊ शकतात.
जल सेवा/ जहाज सेवा:-
ज्या पर्यटकांकडे वेळेची मर्यादा नाही व ज्यांना समुद्रातून जहाजाने प्रवास करणे आवडते ते पर्यटक अंदमान साठी जहाजाचा पर्याय घेऊ शकतात.
चेन्नई कोलकत्ता व विशाखापटनम येथून अंदमान साठी जहाज सेवा उपलब्ध असते प्रत्येक महिन्यातून दोन ते तीन वेळा अंदमान येथे जातात.
** महत्वाचे :-
अंदमानला जाते वेळी पुढील साहित्य सोबत असावे:-
- गॉगल
- टोपी
- सुती कपडे
- शॉर्ट
- चप्पल
- आरामदायक बूट
- नाईट ड्रेस
- रेनकोट इत्यादी
आवर्जून करा:-
- स्नॉर्कलिंग,
- स्कुबा डायविंग,
- सी वाकिंग,
- कयाकिंग,
- समुद्र किनाऱ्यावरील सफर निर्मनुष्य बेटांवरील ज्वालामुखी निरीक्षण,
- पॅरासेलिंग इत्यादी.
हे चुकवू नका:-
- सेल्युलर जेल येथील लाईट अँड साऊंड शो,
- रॉस आयलँड येथील काचेच्या बोटीतील नौकानयन,
- किनार्या वरून दिसणारा अद्भुत सूर्यास्त,
- हॅवलॉक बेटांवरील स्कुबा डायविंग,
- राधानगर बीच वरील हत्ती व उंटाच्या वरून केलेली सफर
- समुद्रस्नान,
- निल बेटावरील नैसर्गिक पूल व समुद्राच्या तळावरून केले जाणारे सी वाकिंग.
हनीमून साठी अंदमान निकोबार :-
हनिमून पॅकेज मध्य या स्थळांची जरूर निवड करा. हॅवलॉक बेटावरील दोन रात्रींचा मुक्काम नील बेटावरील एक रात्र आणि पोर्टब्लेअर वरील तीन रात्रीचा मुक्काम जर समाविष्ट करा.
अंदमान पर्यटनासाठी येणारा खर्च :-
अंदमान पर्यटनासाठी येणारा खर्च निवडलेल्या सोयीसुविधांवर उपलब्ध असतो.
साधारण चार रात्रीं चे पॅकेज नऊ हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांत पर्यंत येते. स्कुबा डायविंग, स्नॉर्कलिंग, इत्यादी विमानाने पर्यटन केले तर जास्त खर्च येतो तर जहाजाने पर्यटन केले तर कमी खर्च येईल.
इंटरनेट व टेलिफोन सेवा :
अंदमान येथे एअरटेल, बीएसएनएल, वोडाफोन या इंटरनेट सेवा व कॉलिंग ची सुविधा आहेत. एअरटेल वोडाफोनआणि बीएसएनएल इंटरनेट साठी ३जी सेवा देतात. संपूर्ण द्वीप समूहावर बी. एस. एन. एल. या कंपनीची सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आम्हाला थेट मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा