google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : मिनाक्षी मंदिर | Minakshi Temple Madurai

माझी ब्लॉग सूची

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

मिनाक्षी मंदिर | Minakshi Temple Madurai

भारतातील तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुराई हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते.तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.


मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरेला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगऱ्याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स  अशा नावांनीही ओळखले जाते.


मीनाक्षी मंदिर 

भगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मीनाक्षी) यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते.


मदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला हे खास आकर्षण आहे.

 

प्रमुख उत्सव:-

मीनाक्षी "थिरू कल्याणम" उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव स्त्री प्रधान असुन खूप मोठ्या संख्येने लोकं येतात. फ्लोट आणि रथ उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा उत्सव महिनाभर चालतो. याशिवाय येथे नवरात्री उत्सव तसेच महाशिवरात्री साजरी केली जाते.



भेट देताना लक्षात ठेवण्याच्या सूचना:-

  • धूम्रपान, तंबाखू, गुटखा , मद्य यावर बंदी आहे.
  • महत्वाचे प्रार्थना स्थळ असल्याने योग्य ते शिष्टाचार पाळावेत
  • येथे भेट देण्यासाठी येथील पारंपरिक पद्धतीने पोशाख परिधान करून मंदिरात प्रवेश करा.
  • आपल्या सामानाची योग्य ती काळजी घ्यावी.


इतर प्रेक्षणीय स्थळे:-

कुडल अळगर/कोवील

मदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू "अळगर"(अर्थ:सुंदरसा) ह्या नावाने ओळखले जातात. 


सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते.


तिरुमलै नायक्कर महाल/ नायक महाल

 हा भारताच्या मदुरै शहरातील राजवाडा आहे. हा राजवाडा १६३६मध्ये मदुरैच्या नायक वंशाच्या तिरुमलै नायक याने बांधून घेतला. हा महाल राजपूत-द्रविड शैलीचा असून मीनाक्षी मंदिरापासून २ किमी अंतरावर आहे.


२०१९च्या सुमारास शाबूत असलेली वास्तू राजाचा मुख्य महाल होता तर मूळ राजवाडा याच्या चौपट विस्ताराचा होता. अठराव्या शतकात याची मोडतोड करण्यात आली होती.


मरिअम्मन टेप्पा कुलम

हे मंदिर भगवान विघ्नेश्वर यांना समर्पित आहे. मीनाक्षी मंदिर पासून ५ किमी अंतरावर असुन या मंदिरात प्रचंड मोठी टाकी आढळते. तमिळनाडू राज्यातील ही प्रचंड मोठी टाकी आहे. 


आख्यायिका सांगितली जाते की येथील मूर्ती याच टाकी मधून मिळालेली आहे. तेव्हापासून या ठिकाणाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.


टेप्पा कुलम चा अर्थ मंदिर तलाव आहे. हा तलाव वैलेई नदीला जोडला गेला आहे. या तलावात गणेश मंदिर व मंडप बाग आहे.


पाजमुधिर मंदिर

अझर कोईल या टेकडीवर वसलेले हे मंदिर भगवान सुब्रमणियम स्वामीं स्मृती प्रितयर्थ बांधले गेले आहे. या मंदिराचे बांधकाम लाकूड आणि संगमरवर दगडात कोरलेल्या अनेक कलाकृती वास्तु शिल्पे यांनी बनवलेले आहेत. येथे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पुर्ण होतात अशी श्रद्धा आहे.


तिरुपुर कुंडम मुरुगन मंदिर

हे मंदिर पवित्र तीर्थ क्षेत्र म्हणुन ओळखले जाते. पृथ्वी मातेला समर्पित आहे. 


या ठिकाणाला दक्षिण भारताचा हिमालय पर्वत म्हणून ओळखले जाते. हे मंदिर लग्न करण्यासाठी प्रसिद्ध आहे.


भगवान सुब्रमनियम यांचा विवासोहळा येथे पार पडला होता. तेव्हापासून हे मंदिर लग्न करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आसपास शहरातील तसेच उपनगरातील ९०% विवाह सोहळे याच मंदिरात पार पडतात.


मेघ मलाई हिल

हिरव्यागार वनश्री निसर्गाने नटलेले सुंदर असे स्थळ आहे. सुमारे 1500 मी उंचीवर असलेल्या या ठिकाणाला खूप लोक भेट देतात. 


निसर्गाच्या सान्निध्यात असून जंगलाने वेढलेला मधोमध असलेल्या या ठिकाणी वेलची, दालचिनी, काळी मिरी यांची शेती पाहता येते. हा संपुर्ण भाग या मसाल्याच्या सुगंधाने सदैव दरवळत असतो. येथील भेट ही अविस्मरणीय अनुभव आहे.


पुधू मंडपम

मदुराईतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे. मीनाक्षी मंदिर पूर्वेस स्थित आहे. हा मंडप साधारण 1628 ते 1635 या काळात बांधले गेले होते.हे भगवान सुंदरेश आणि देवी मीनाक्षी यांचे उन्हाळी निवासस्थान आहे. सुमारे 25फूट उंचीच्या या मंदिरात 124 खांब आहेत.


वसंत उत्सव हा येथील प्रमुख उत्सव असून या मंदिरात वैशाखी वसंत उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.


चिथिराई उत्सव

चिथिराई उत्सव येथील सर्वात मोठा उत्सव आहे.हा उत्सव महिनाभर चालतो. देवी मीनाक्षी राज्याभिषेक सोहळा आणि विवाह सोहळा यात समाविष्ट आहेत.

प्रामुख्याने हा उत्सव म्हणजे या परिसरातील सर्व देवांचे पुनर्मिलन आहे. हा उत्सव पाहण्यासाठी संपुर्ण जगभरातून लाखों पर्यटक या मंदिराला भेट देतात.


अदिसयम वॉटर पार्क

हे मदुरै ह्या शहरापासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या पार्वै ह्या गावात वसलेले एक मनोरंजनाचे ठिकाण/ऍम्युझमेंट पार्क आहे.हे ठिकाण मदुरै-दिंडुक्कल ह्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर असल्याने एक मोठे पर्यटन केंद्र म्हणुन विकसीत होत आहे.एकूण ४० एकराच्या प्रशस्त जागेत वसलेल्या ह्या उद्यानात अनेक प्रकारचे खेळ आणि इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.ह्यात एकूण ४० खेळ व २० पाण्यातील सफरींचा समावेश आहे.अदिसयम वॉटर पार्क हे त्याच्या पाण्यातील राईड्स साठी प्रसिद्ध आहे,त्यात अनेक कृत्रिम धबधबे,तलाव आणि कालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे.


काय खरेदी करतील:-

कांस्य शिल्पे, लाकडी, दगडी कोरीव शिल्पे, हातमाग कापड, हाताने बनवलेले रेशमी वस्त्र जरूर खरेदी करा.


कधी जाल:-

धार्मिक स्थळ असल्याने संपूर्ण वर्षभरात कधीही भेट देऊ शकता. तरीही ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम आहे.

कसे जाल:-

विमान सेवा:-

मदुराई शहरापासून जवळच १०किमी अंतरावर विमानतळ आहे. सर्व प्रमुख शहरातून नियमित उड्डाण सेवा उपलब्ध आहेत.

 रेल्वे सेवा:-

मदुराई- तिरुचिरापल्ली- दिंडीगुल ही क्विलोन लाईन असुन दक्षिण रेल्वेचे महत्वाच जंक्शन आहे. संपुर्ण भारतातील सर्व प्रमुख शहरातून नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. त्यामूळे वर्षभर कधीही भेट देऊ शकता.

 रस्ता सेवा:-

महत्वाच धार्मिक स्थळ असल्याने सर्व महत्त्वाच्या शहरातून नियमित बस सेवा टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत. येथे प्रमुख पाच बस स्थानक आहेत. तसेच NH 44 येथुन जातो. त्यामूळे नियमित बस सेवा सुविधा उपलब्ध आहेत.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आम्हाला थेट मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...