google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : कोइंबतूर | Coimatore

माझी ब्लॉग सूची

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

कोइंबतूर | Coimatore

 कोइंबतूर हे तामिनाडूमधील सर्वात महत्वाचे शहर आहे. कोइंबतूर शहराला दक्षिण भारताचे Manchester म्हटले जाते. याला कोवाई असेही म्हणतात. हे शहर नोयिल नदीच्या काठी वसलेले आहे. कोइंबतूर मध्ये खुप सुंदर पर्यटन स्थळे आहेत त्यामूळे हे शहर खुप प्रसिद्ध आहे.




मारुधमालाई

हे मंदिर दक्षिण घाटाच्या माथ्यावर 500 फूट उंचीवर आहे.


 मुरुगा स्वामी यांना समर्पित आहे. येथे अनेक प्रकारच्या प्रसिद्ध असणाऱ्या औषधी वनस्पती आढळतात. त्यामूळे या ठिकाणाला महत्व प्राप्त झाले आहे.


पेरुर पतेश्वर


हे मंदिर अरिल्मुगु पतेश्वर म्हणूनही ओळखले जाते. भगवान नटराज यांना समर्पित आहे. येथे चित्रे,अनेक प्रकारच्या सुन्दर कलाकृती, वास्तु शिल्पे कोरलेली आहेत. हे मंदिर कोइंबतूर सर्वात मधील लोकप्रिय मंदिर आहे.


वेलिंघिरी हिल मंदिर

6000फुट उंचीवर आहे. भगवान शंकराला समर्पित आहे. येथे खुप मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. 


हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. येथे पर्यटक ट्रेकिंग हायकिंगचा अनुभव घेऊ शकतात. या मंदिराला अनन्य साधारण महत्व आहे.


कोविल कुरतालम फॉल्स


हा धबधबा सिरुवणीच्या निसर्गरम्य जंगलात आहे. संपुर्ण कोइंबतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटक येतात. शिवाय जवळच सिरुवणी धरण आहे. येथेही भेट देऊ शकता.


अविनाशी लिंगेश्वर मंदिर

अविनाशी शहरात स्थित आहे. हे मंदिर NH 47 जवळ आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.


 15 व्या शतकात बांधलेले हे मंदिर प्रसिद्ध शैव मंदीर पैकी एक आहे.


 श्री अय्यप्पन मंदिर

अय्यापा स्वामींना समर्पित आहे. कोइंबतूर मधील लोकप्रिय मंदिर आहे.


सबरीमाला ची प्रतिकृती मानली जाते.सबरीमाला मंदिर प्रमाणे सर्व पुजा केली जाते. त्यामूळे या मंदिराला दुसरे सबरीमाला मंदिर मानतात.



 या मंदिराची रचना आणि वास्तुकला एकसारखीच आहे.कोइंबतूरमधील सर्वात महत्वाचे आणि सुंदर असे स्थळ.


मंकी वॉटर फॉल्स

सदाहरित जंगले आणि सुंदर निसर्ग याने नटलेल्या मंकी वॉटर फॉल्स हा पर्यटकासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.


 येथे माकडांची संख्या अधिक आहे. शिवाय या धबधब्यातून पडणारे  पाण्यातून माकडांचा आवाज ऐकू येतो. हे एक मोठे वैशिष्ट्य आहे.


ईशा योग केंद्र

भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणं म्हणजे ईशा योग केंद्र. संपुर्ण जगभरातून पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी या केंद्राची स्थापना केली आहे. येथे योग,अध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी खुप मोठ्या संख्येने येतात.


येथे विशाल अशी भगवान शंकराची मूर्ती आहे.हे अध्यात्मिक केंद्र खुप प्रसिद्ध आहे.

या केंद्रात निवासाच्या विविध सुविधा तसेच विविध कालावधीचे योग कार्यक्रम उपलब्ध असून याचा वापर आपण करून घेऊ शकता. कार्यक्रमात सहभागी होणार्‍या व्यक्ती तसेच पाहुणे या दोघांसाठी त्यांच्या निवासाचा एक भाग म्हणून सात्विक भोजन दिले जाते. ईशा योग केंद्र आपल्याला अधिक आरोग्यदायी जीवनशैलीकडे घेऊन जाण्यासाठी, स्व-पूर्ततेची उच्च पातळी गाठण्यासाठी तसेच स्वतःची संपूर्ण क्षमता जाणून घेण्यासाठी सहायक वातावरण उपलब्ध करून देते.येथे महाशिवरात्री मोठ्या प्रमाणत साजरी केली जाते.


कधी जाल:-

येथे भेट देण्यासाठी योग्य काळ सप्टेंबर ते मार्च.


कसे जाल:-

विमान सेवा:-

कोइंबतूर विमानतळ शहरापासून ११किमी अंतरावर आहे. भारतातील सर्व प्रमुख शहरातून विमानसेवा ऊपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुविधा दुबई, सिंगापूर, सौदी अरेबिया, शारजा येथून उपलब्ध आहेत.


रेल्वे सेवा:-

कोइंबतूर हे मुख्य रेल्वे जंक्शन असून संपुर्ण भारतातून रेल्वे सेवा उपलब्ध आहेत.


रस्ता सेवा:-

त्रिवेंद्रम, कोचीन, कन्या कुमारी, बंगलोर, मदुराई, येथून नियमित बस सेवा उपलब्ध आहेत.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...