पश्चिम घाटावर पसरलेले जैव-विविधतेने भरलेले 2132 चौ.किमीवर पसरलेले हे क्षेत्र, वायनाड हे केरळचे असे एक रम्य स्थळ आहे ज्याने आपला निसर्ग जपून ठेवला आहे. या भूमीतील कड्याकपारांमध्ये लपले आहेत सर्वात प्राचीन आदिवासी, नागरी वाऱ्यांपासून अनभिज्ञ असलेले.
केरळमधील पहिला इतिहासपूर्व लेख एडक्कलच्या पायथ्याशी आणि अंबुकुथिमलाच्या भोवती मिळाला जो पुरावा आहे की येथील संस्कृतीची मूळे मध्यपाषाण काळापर्यंत जातात.
विलक्षण सुंदर असा हा प्रदेश आपल्या उप-उष्णकटिबंधीय गवताची पठारे, रम्य हिल स्टेशन, विस्तीर्ण मसाल्याची लागवड, घनदाट जंगले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. वन्यप्रदेश, इतिहास आणि संस्कृती यांचे मीलन असे वायनाड भव्य दक्खन पठाराच्या दक्षिण टोकाला वसले आहे.
वायनाड मधील प्रेक्षणीय स्थळे माहिती:-
चेंब्रा शिखर
वायनाडच्या दक्षिण भागातील मेप्पाडी जवळ साधारण 2100 मीटर उंचावर उन्नत असे चेंब्रा शिखर आहे. हे त्या भागातील सर्वात ऊत्तुंग असे गिरीशिखर असून या शिखारावर चढण्यासाठी आपले शारीरिक कौशल्य पणाला लावावे लागते.
या चेंब्रा शिखरावर चढणे हा एक चित्तथरारक अनुभव आहे. या शिखराच्या एकेका थांब्यावर पोहोचतो, तसे वायनाडचे विस्तृत सौंदर्य पाहावयास मिळते आणि हे दृष्य शिखरावर पोहोचताच अधिक व्यापक होते. या शिखरावर चढणे आणि परत खाली येणे यासाठी संपूर्ण एक दिवस लागतो. ज्यांना शिखरावर शिबिर करून रहावयाचे असेल त्यांना तर हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.
ज्यांना येथे शिबिर करून थांबायचे असेल त्यांना वायनाड येथील कलपेट्टा येथून ’जिल्हा पर्यटन विकास परिषद” अर्थात डिस्ट्रिक्ट टूरिझम प्रमोशन काउन्सिल यांची संमती घ्यावी लागते.
नीलिमला
नीलिमला हे वायनाड मधील दक्षिण-पूर्व भागात असून कलपेट्टा आणि सुलतान बाथरी या दोन्ही ठिकाणांहून तेथे जाता येते. ट्रेकिंगसाठी विविध मार्गांचे पर्याय उपलब्ध करुन देणारे नीलिमला हे ट्रेकरर्स डिलाईट अर्थात ट्रेकिंग करणार्यांठचे आनंदाचे ठिकाण ठरते.
नीलिमलाच्या शिखरावरील दृष्य हे अत्यंत विहंगम आणि लुभावणारे असून जवळच असलेला मीनमुट्टी धबधबा आणि त्याच्या आसपासचा दरीचं खोल दृश्य इथं पाहावयास मिळतं.
मीनमुट्टी
नीलिमलापासून जवळच अत्यंत भव्य असा मीनमुट्टी धबधबा आहे. ऊटी आणि वायनाड यांना जोडणार्यास मुख्य रस्त्यावरून पुढे 2किमी ट्रेकिंग मार्गावरून येथे पोहोचता येते.
वायनाड जिल्यातील हा सर्वात मोठा धबधबा आहे.साधारण 300 मीटर उंचीवरून तीन अवस्थांमध्ये पाणी खाली टाकणारा हा धबधबा खरोखर उत्सुकतेत भर घालतो.
छेतालयम
वायनाडमधील पर्यटकांना आकर्षित करणारा आणखी एक धबधबा म्हणजे छेतालयम धबधबा.वायनाडच्या उत्तर भागातील सुलतान बाथरीच्या अगदी जवळच हा धबधबा आहे.
मीनेमुट्टीच्या तुलनेत हा धबधबा छोटा आहे. परंतु हा धबधबा आणि त्याच्या लगतचा परिसर हा ट्रेकिंग करणार्यां साठी आणि पक्षी निरिक्षकांसाटी आदर्श आहे.
पक्षीपाथालम
ब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या अत्यंत घनदाट अशा जंगलात साधारण 1700 मीटर पेक्षा अधिक उंचावर पक्षीपाथालम वसलेले आहे. या भागात प्रामुख्याने मोठे खडक आढळतात ,पैकी काही तर खरोखरच प्रचंड महाकाय आहेत.
येथील खोलवर असणार्या गुहा ह्या मोठ्या प्रमाणात असलेले विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच्या विशिष्ट प्रजाती यांचे आश्रयस्थान आहे.
पक्षीपाथालम हे मानंतवाडीच्या जवळ असून तीरूनेल्लीपासून सुरू होणार्याा जंगलातून 7 किमीअंतर ट्रेकिंगद्वारे पार केल्यानंतर या भागात पोहोचता येते. पक्षीपाथालम येथे पोहोचण्यासाठी ( DFO- उत्तर वायनाड) घन –जंगल अधिकारी, उत्तर वायनाड यांची अनुमती घ्यावी लागते.
बनसुरा सागर धरण
बनसुरा सागर येथे असणार्या धरणाची गणना भारतातील सर्वात मोठा मातीचा डॅम म्हणून केली जाते.वायनाड जिल्यातील दक्षिण –पश्चिम भागात हे धरण असून तो करलाड तलावाच्या अगदी जवळ आहे.
बनसुरा सागर धरणाचा मुख्य परिसर हा बनसुरा शिखरावर जाण्यासाठी ट्रेकिंगचे सुरवातीचे ठिकाण आहे. येथील आकर्षक गोष्ट म्हणजे बेटांचा समूह होय,जो आजूबाजूच्या भूभागाला जलाशयाने जलमग्न करून वेढले असताना बनला आहे.
काय खरेदी कराल:-
वायनाड मधील मनोरम पेक्षणीय स्थळे, ध्वनी आणि सुगंधाचा आनंद घेताना वायनाडमधील इतर विशेष गोष्टींची जसे की मसाले, कॉफ़ी, चहा, बांबू उत्पादने, मध आणि हर्बल उत्पादने यांची खरेदी देखील करू शकता.
**अतिशय महत्वाचे सूचना**
वायनाड व आसपासच्या क्षेत्रात फ़िरण्यासाठी कृपया वायनाड पर्यटन विभागाच्या संपर्कात रहावे.
कधी जाल:-
पावसाळा सोडून कधीही भेट देऊ शकता.शक्यतो सप्टेंबर ते मार्च या कालावधीत भेट
विमान सेवा:-
जवळचा विमानतळ: कोझिकोड
रेल्वे सेवा:-
जवळाचे रेल्वे स्थानक: कोझिकोड
मुख्य गावे आणि जवळच्या रेल्वे स्थानकापासूनचे अंतर:
कलपेट्टा: कोझिकोड पासून 72 किमी
मानंतवाडी: थलसेरी पासून 80 किमी आणि कोझिकोड पासून 106 किमी
सुल्तान बाथरी: कोझिकोड पासून 97 किमी
वैत्तिरी: कोझिकोड पासून 60 किमी
रस्ता: कोझिकोड, कन्नूर, ऊटी (कलपेट्टा पासून 175 किमी) आणि मैसूर (कलपेट्टा पासून 140 किमी) यांच्याशी रस्त्याने उत्तम प्रकारे जोडलेला आहे.
रस्ता सेवा:-
कोझिकोड,उटी,कूर्ग,वैतिरी, म्हैसूर येथून नियमित बस सेवा, टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत.
**अधिक माहितीसाठी खालील अधिकृत संकेतस्थळ संपर्क साधावा.
पत्ता,
जनरल सेक्रेटरी
वायनाड टुरिझम ऑरगनायझेशन(वायनाड पर्यटन विभाग)
वसुदेव एडोम,पोझुठाणा पीऒ
वायनाड, केरळ, भारत
पिन - 673575
दूरध्वनी. + 91 4936 255308, फ़ॅक्स. + 91 4936 227341
ई-मेल : mail@wayanad.org
Department of Tourism,
Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org
Photos
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.