google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : महू | Mhow

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

महू | Mhow

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाला म्हणजे ‘महू’ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महू इथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्स्थळाला वंदन करीत असतात. महू इथे बाबासाहेबांच्या जन्मस्थळावर शासनाने यथोचित स्मारक उभे केले आहे. हे स्मारक एक चैतन्याचा झरा आहे.




डॉ. आंबेडकर नगर जूने नाव: महू, ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूरजवळ एक लष्करी छावणी आहे. 

'महू' हे नाव इंग्रजी MHOW (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर इंदूर जिल्ह्यामध्ये येते. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. येथे भीम जन्मभूमी स्मारक आहे. 

  • सन २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने महूचे नाम बदलून "डॉ. आंबेडकर नगर" असे ठेवले. 
  • येथील महू स्टेशन रेल्वे स्थानकाचे नावही "डॉ. आंबेडकर स्टेशन" असे केले गेले.
  • येथे बाबासाहेबांच्या सन्मानार्थ डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ स्थापन केलेले आहे.
  • भीम जन्मभूमी हे महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे स्मारक आहे. 
  • १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. 
  • या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली.
  • १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले. 
  • दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बुध्द अनुयायी व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात.


कधी जाल:-

वर्षभरात कधीही भेट देऊ शकता


कसे जाल:-

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व इंदौर येथून ४० किलोमीटरच्या अंतरावर महू आहे.

विमान सेवा:-

जवळचे विमानतळ इंदोर आहे. जे भारतातील सर्व प्रमुख शहराशी जोडलेले आहे.

रेल्वे सेवा:-

जवळचे रेल्वे स्टेशन इंदोर असून भारतातील सर्व प्रमुख शहरातून नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहेत.


रस्ता सेवा:-

इंदोर मधून महू साठी नियमित बस सेवा, टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत.



हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...