तवांग हे अरुणाचल प्रदेश मधील प्रसिध्द असे पर्यटन स्थळ आहे.अरुणाचल प्रदेश च्या पश्चिमेला हिमालयाच्या तराई क्षेत्रात वसलेले तवांग समुद्रसपाटीपासून ३०४८ मीटर उंचीवर आहे. हे ठिकाण तवांग जिल्ह्याचे मुख्यालय असून अरुणाचल प्रदेश ची राजधानी इटानगर पासून ४४८ कि.मी.उत्तर-पश्चिमेला वसलेले आहे.
तवांग मध्ये बौध्द धर्मीय लोकांचे अनेक मठ आहेत.तवांग हे बौध्द धर्मगुरू दलाई लामा यांचे जन्मस्थान मानले जाते.यामुळे धार्मिक महत्वाबरोबरच नैसर्गिक सौंदर्य व प्रदूषण मुक्त,शांत वातावरण यामुळे तवांग हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षून न घेईल तर नवलच.दूर-दूर वरून लाखो पर्यटक दरवर्षी तवांगला पर्यटना साठी येतात.
मध्ययुगीन काळात इथे स्थानिक आदिवासी शासक राज्य करत होते व तवांग हा त्याकाळी तिबेटचा एक हिस्सा होता. त्याकाळी मूंगीपा जमातीचे लोक या ठिकाणी राहत होते त्यांची ठेवण मंगोली लोकांसारखी होती. तवांग मठाची स्थापना मेरेक लामा यांनी १६८१ मध्ये केली व याच ठिकाणी सहावे दलाई लामा यांचा जन्म झाला.
तत्कालीन ब्रिटिश शासनाने तवांग चा प्रदेश ऑफ लिमिट म्हणून घोषित केला होता. त्यावेळी तवांग व प्रदेशावर तिबेटचे शासन होते. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरही तवांग वरील मालकी हक्कासाठी भारत आणि चीन यांच्यामध्ये विवाद होता. त्यानंतर 1962 मध्ये चीन ने या प्रदेशावर आक्रमण केले व हा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिकारामुळे चीनला या प्रदेशातून माघार घ्यावी लागली व तवांग भारतीय शासनाच्या अधिपत्याखाली आले.
तवांग मधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे: Tawang tourism information.
तवांगमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत जी पर्यटकांना सदैव खुणावत असतात. इथले शांत वातावरण,बर्फाच्छादित पर्वत शिखरे,स्वच्छ पाण्याचे झरे यामुळे इथे आलेला पर्यटक पुन्हा पुन्हा तवांगला येण्याचा निश्चय करतो. तवांग पर्यटन स्थळांना नक्कीच भेट दिली पाहिजे.
तवांग मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तवांग मठ:Tawang Monastery
तवांग मठाची स्थापना मेरेक लामा यांनी १६८१ मध्ये केली.समुद्रसपाटीपासून या मठा ची उंची 3000 मीटर इतकी आहे. अरुणाचल प्रदेश मधील प्रमुख मठ म्हणून तवांग मठाची ओळख आहे. हा भारतातील सर्वात मोठा व जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बौद्ध मठ आहे.
जगातील सर्वात मोठा बौद्ध मठ तिबेटमधील ल्हासा याठिकाणी आहे. तवांग मठ बौद्ध धर्मीय लोकांमध्ये पवित्र मानला जातो कारण या ठिकाणी सहावे दलाई लामा यांचा जन्म झाला होता. चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या या तवांग मठामध्ये जवळ जवळ 300 विद्यार्थी बौद्ध धर्माचे शिक्षण घेत असतात. तवांगला भेट देणारे पर्यटक आवर्जून या मठाला भेट देतात.
जायंट बुद्धा तवांग:Ginat Buddha Statue Tawang.
तवांग मधील सर्किट हाऊस जवळ एका उंच टेकडीवर विशाल काय बुद्धप्रतिमा पाहायला मिळते. त्यास साक्यामुनी बुद्धा म्हणून ओळखले जाते. येथून तवांग परिसराचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. या पुतळ्याच्या खालील भागात दोन प्रार्थना हॉल आहेत. सायंकाळच्या वेळी इथून दिसणारे दृश्य अविस्मरणीय असते.
तवांग वॉर मेमोरियल:Tawang war memorial
तवांग शहरामध्ये असलेले हे वॉर मेमोरियल १९६२ च्या भारत चीन युद्धातीलभारतीय सैनिकांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्यापुढे मांडतो.
दररोज सायंकाळी इथे ध्वनी प्रकाश योजनेच्या साह्याने १९६२ युद्धातील जवानांचा पराक्रम सादर केला जातो. अत्यंत बिकट परिस्थितीत भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमामुळे आपली छाती अभिमानाने भरून येते.
तवांग मधील नुरानांग धबधबा :Nuranang fall.
तवांग पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना नुरानांग धबधबा आकर्षित करून घेतो. घनदाट हिरव्या जंगलांमध्ये असलेला हा धबधबा अखंडपणे कोसळत असतो.
भारतातील सर्वात सुंदर धबधब्यांमध्ये या धबधब्याला स्थान आहे. १०० मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलधारा खाली पर्यटक ओलीचिंब होतात.
सेला पास:Sela pass Tawang
तवांग खोऱ्या चे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे स्थळ म्हणजेच सेला पास होय. सेला पास ही खिंड समुद्रसपाटीपासून १३७०० फूट उंचीवर आहे. सेला पास चे सौंदर्य शब्दांमध्ये व्यक्त करणे कठीण होते
अत्यंत रमणीय असे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते स्थळ असते. सेला पासला तवांग खोऱ्याची जीवन रेखा असेही म्हटले जाते कारण हा एकमेव मार्ग तवांग खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडतो. या खिंडी मध्ये वर्षभर बर्फ साचलेल्या पाहायला मिळतो. इथे असणारा सेला नावाचा तलाव बौद्ध धर्मीय लोकांसाठी पवित्र मानला जातो. तवांगला जाणारे पर्यटक सेला पासला थांबल्याशिवाय पुढे जात नाही
जसवंत स्मारक:
तवांग मधील प्रेक्षणीय स्थळांमध्ये जसवंत गड चा उल्लेख आवर्जून करावा लागतो कारण याठिकाणी येणारा पर्यटक अथवा सैन्याधिकारी जसवंत स्मारकाला अभिवादन केल्याशिवाय पुढे जात नाही.
१९६२ भारत चीन युद्ध मध्ये शहीद जस्वंत यांनी अतुलनीय असा पराक्रम केला त्यांच्या पराक्रमामुळे चिनी सैन्य परिसरातून मागे फिरले. या ठिकाणी शहीद जसवंत यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे व त्याचे व्यवस्थापन भारतीय सैन्य द्वारे केली जाते.
माधुरी लेक : Madhuri lake.
तवांग मधील पर्यटन स्थळांमध्ये माधुरी लेक चा सुद्धा समावेश होतो तवांगला आलेले पर्यटक तवांग पासून तीस किलोमीटर अंतरावरील माधुरी लेक ला भेट देतात.
निसर्ग संपन्न व शांत वातावरणात असलेले हे लेक आपल्या निर्मळ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या लेकचे खरे नाव संगतेसर लेक असे होते. परंतु हिंदी चित्रपट कोयला चे शूटिंग या तलावाच्या परिसरात झाले होते. माधुरी दीक्षित या तलावाच्या परिसरात एका गाण्यावर नृत्य केले. तेव्हापासून या तलावाचे नाव माधुरी लेक असे पडले. समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवर असणारा हा तलाव नैसर्गिक सौंदर्याने संपन्न आहे.
गोरीचिन पिक: Gorichen Peak.
अरुणाचल प्रदेश मधील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या तवांग जवळील गोरीचेन पिक हे पर्वत शिखर अरुणाचल प्रदेश मधील सर्वात उंच पर्वत शिखर आहे.
तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांच्या दरम्यान हे पर्वत शिखर येते हे तवांग पासून 57 किलो मीटर अंतरावर आहे ज्या पर्यटकांना ट्रेकिंगची आवड असते ते पर्यटक गोरीचेन पिक ला आवर्जून भेट देतात. याच्या शिखरास सान्गफो असे म्हटले जाते. याची उंची समुद्रसपाटीपासून 22500 फुट इतकी आहे.
पी टी त्सो लेक :
पासून 25 किलोमीटर अंतरावरील पी टी त्सो हा तलाव अत्यंत निसर्गसंपन्न वातावरणात आहे आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडी व शांत निर्मळ पाणी हे या तलावाचे वैशिष्ट्य आहे तवांगला भेट देणारे पर्यटक या तलावाला आवर्जून भेट देतात.
तवांगला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ: Best time to visit Tawang .
तवांगला वर्षभरामध्ये कधीही भेट देऊ शकतो परंतु तवांगला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा मार्च ते सप्टेंबर आहे. कारण या काळात इथले वातावरण पर्यटकांसाठी आल्हाददायक असते या काळात सर्व पर्यटन स्थळांना सहजपणे भेट देऊ शकतो.
पावसाळा व हिवाळा हा कालावधी तवांग ला भेट देण्यासाठी योग्य नाही. कारण प्रचंड पडणाऱ्या पावसामुळे कधीकधी दरडी कोसळतात व हिवाळ्यात बर्फवृष्टी मुळे रस्ता बंद होतो.
तवांग चा लोसर उत्सव : Losar festival Tawang.
तवांग मध्ये दरवर्षी बौध्द धर्मिय लोक नववर्षाच्या स्वागतावेळी तीन दिवसीय उत्सव साजरा करतात.त्यास लोसर उत्सव म्हणतात.लोसर या तिबेटी शब्दाचा अर्थ लो- नवीन आणि सर – वर्ष असा आहे.
दरवर्षी फेब्रुवारी/मार्च महिन्यात हा उत्सव साजरा होतो.या वेळी बौध्द व तिबेटी संस्कृती जवळून पाहता येते.देश-विदेशातून पर्यटक याअरुणाचल प्रदेश मधील तवांग हे जसे प्राकृतिक सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे,त्याच प्रमाणे तवांग मधील खाद्य पदार्थ प्रसिध्द आहेत.विशेषतः अरुणाचल प्रदेश च्या पर्वतीय प्रदेशात स्थानिक जनजाती जे खाद्य पदार्थ खातात,ते खाद्य पदार्थ पर्यटक देखील आवर्जून खातात.त्यामध्ये झान,खुरा,ग्याप्का-खाझी,थुप्का,पुता,मोमो,ब्रेसी इत्यादी खाद्यपदार्थ प्रसिध्द आहेत,त्याच बरोबर तवांग मध्ये साउथ इंडिअन,पंजाबी,चायनीज पदार्थही सहज मिळतात.
तवांग मध्ये कुठे राहाल:-Hotels in Tawang
तवांग हे अरुणाचल मधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने तवांग मध्ये विविध सोयी-सुविधा युक्त हॉटेल्स सहज मिळतात.
बजेट नुसार व पर्यटक संख्ये नुसार हॉटेल ची निवड करणे योग्य ठरते.तरीही तवांग मधील उत्तम सेवा देणाऱ्या हॉटेल्स ची नावे पुढील प्रमाणे
Bliss Homest
Hotel Tawang hight
The Oa
Hotel zax sta
Hotel mount vie
कसे जाल:-
तवांग च्या भौगोलिक स्थानामुळे तवांगला पोहोचणे हे आव्हानात्मक व रोमांचकारी असते.कारण तवांग हे उंच पर्वतीय प्रदेशात वसलेले असल्यामुळे रेल्वे किंवा विमान सेवा तिथे उपलब्ध करणे थोडे कठीण आहे.त्यामुळे तवांग ला जाण्यासाठी नॉर्थ-ईस्ट भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे गुवाहाटी हे तवांग ला जाण्यासाठी आरंभ शहर म्हणून वापरू शकतो कारण गुवाहाटी चा विमानतळ सुसज्ज असून मुंबई,पुणे,नागपूर सह देशातील प्रमुख शहरांशी विमान सेवेने जोडले आहे
तसेच गुवाहाटी हे रेल्वे सेवेने देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडले गेले आहे.महाराष्ट्रातून गुवाहाटी ला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दररोज सेवा देत असता
गुवाहाटी ला पोहोचल्या नंतर तवांग ला जाण्यासाठी पुढील पर्याय वापरू शकता.
1)गुवाहाटी ते तवांग पब्लिक सुमो :
नॉर्थ-ईस्ट भारतात शेअर्ड सुमो किंवा पब्लिक सुमो सर्वत्र उपलब्ध असतात.पर्वतीय प्रदेशातील अवघड मार्गावर चालणारे उपयुक्त वाहन म्हणून सुमोला ओळखले जाते.
गुवाहाटी रेल्वेस्टेशन जवळून तवांग साठी दररोज पहाटे ५.०० वाजता सुमो सुटतात.यांचे बुकींग आदल्या दिवशी करावे लागते.तवांग ला या सुमो सायंकाळी ७.०० च्या आसपास पोहोचतात.प्रवासामध्ये चहापाणी व जेवणासाठी काही ठिकाणी थांबा घेतात.
जर ५ ते १० जणांचा ग्रुप असेल तर स्वतंत्र सुमो भाड्याने घेऊन देखील हा प्रवास करता येतो.गुवाहाटी ते तवांग हे अंतर ५४३ कि.मी. असून या प्रवासास १४ ते १६ तास लागतात.
सलग १४ ते १६ तास प्रवास करणे हा पर्याय शारीरिकदृष्ट्या व मानसिक दृष्टया थकवा आणणारा असतो.त्याचा परिणाम आपल्या पुढील पर्यटनावर होऊ शकतो.त्यामुळे ज्यांच्याकडे वेळेची कमतरता आहे,त्यांनी हा पर्याय निवडावा.
२)गुवाहाटी ते तेजपूर व तेजपूर ते तवांग असा प्रवास करणे.
तेजपूर हे गुवाहाटी पासून १८० कि.मी. असून प्रवास कालावधी ३ ते ३.३० तास इतका असतो.गुवाहाटी वरून तेजपूर साठी भरपूर बसेस मिळतात.तेजपूर ला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे निघणाऱ्या सुमो ने तवांग ला जाणे.तेजपूर ला सैन्य छावणी असल्याने इथे बजेट नुसार हॉटेल्स उपलब्ध असतात.सुमो चालक हॉटेल वरून पिक-अप करतात.
तेजपूर ते तवांग हा प्रवास १० ते १२ तासांचा असून हा प्रवास निसर्गरम्य प्रदेशामुळे कधी पूर्ण होतो हे कळत ही नाही.
३)हेलिकॉप्टर ने तवांग ला जाणे:
Arunachal Pradesh Helicopter Service मार्फत तवांग ते गुवाहाटी व गुवाहाटी ते तवांग अशी हेलिकॉप्टर सेवा चालवली जाते.गुवाहाटी विमानतळावरून हेलिकॉप्टर निघते व ५५ मिनिटात तवांग ला पोहोचते.या हेलिकॉप्टर मधून १० ते १२ जण प्रवास करू शकतात.माणशी हेलिकॉप्टर चे तिकीट साधारणपणे ३५०० रु.असते.
ही सेवा सोमवार,मंगळवार,गुरुवार व शुक्रवार या दिवशी सुरु असते.
हेलिकॉप्टर चे तिकीट गुवाहाटी विमानतळावरील तिकीट काउंटर व तवांग येथील हेलिपॅड येथे काढता येते.Online तिकीट बुकींग ची सुविधा अजून सुरु झालेली नाही.
तवांग मध्ये कोणकोणत्या बँक व ATM ची सुविधा आहे:-
तवांग मध्ये SBI,HDFC,ICICI,Canara Bank इत्यादी बँक व त्यांची ATM आहेत.
तवांग मध्ये कोणकोणते mobile नेटवर्क चालतात:-
तवांग मध्ये BSNL,Vodafone आणि Airtel ही Mobile नेटवर्क चालतात.
तवांग ला जाण्यासाठी परवाना काढावा लागतो :-
तवांग ला जाण्यासाठी Inner Line Permit (ILP) काढावा लागतो.
अरुणाचल चे रहिवासी सोडून इतर राज्यातील लोकांना अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवेश करण्यासाठी परवाना काढावा लागतो.यासाठी विहित शुल्क,फोटो व ओळखपत्र या बाबींची आवश्यकता असते.हा परवाना Online व शासकीय कार्यालयात जाऊन काढता येतो.Online परवाना काढण्यासाठी http://www.arunachalilp.com/ या संकेतस्थळाचा वापर करावा.
गुवाहाटी,शिलॉंग,तेजपूर,मोहनबारी,लीलाबारी,जोरहाट,कोलकाता,नवी दिल्ली या शहरातील अरुणाचल प्रदेश कमिशनर कार्यालयातून परवाना प्राप्त करू शकतो.अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवेश करते वेळी प्रवेशद्वारावर ज्या ठिकाणी कार्यालय आहे तिथूनही तात्पुरत्या स्वरूपातील परवाना प्राप्त करू शकतो.परंतु गैरसोय टाळण्यासाठी प्रवासा पूर्वीच Online परवाना काढणे हिताचे ठरते.
अधिक माहिती साठी https://tawangtourism.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा