ईशान्य राज्य, नागालँड हे देशाच्या इतर राज्यांपेक्षा बर्याच प्रकारे भिन्न आहे. येथे त्यांचे खाद्य निवडी सण आणि रंगीबेरंगी सणांपेक्षा भिन्न आहेत. नागालँडमध्ये 16 जमाती आढळून आल्या आहेत. नागालँड हे भारतातील अशा तीन राज्यांपैकी एक आहे जिथे ख्रिस्ती धर्माचे अनुयायी बहुसंख्य आहेत. याशिवाय नागालँडभोवती विखुरलेली डोंगर आणि खोरे तेथील नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहेत.
नागालँड एक अतिशय सुंदर राज्य आहे. आपल्याला कदाचित माहिती नसेल परंतु नागालँडच्या आसपास प्रवास करण्यासाठी अंतर्गत रेखा परवान्याची आवश्यकता असते.ही परवानगी मिळवणे अगदी सोपे आहे. ज्यानंतर आपण नागालँडचे सौंदर्य शोधू शकता.
सण समारंभ:-
सेक्रेंसी, मोआत्सु, तुलुनी व तोखु इमॉग हे काही महत्त्वाचे सण नागालँडमध्ये साजरे केले जातात. सगळ्या जाती- जमाती रंगीबेरंगी कपडे परिधान करून मोसमी सण संगीतासोबत साजरे करतात.
प्रसिद्ध नृत्य प्रकार:-
आलूयाट्टू (कोन्याक आदिवासी नृत्य), अगुरशिकुकुला (युद्ध नृत्य), फुलपाखरू नृत्य (झेलियांग आदिवासी नृत्य), चांगाई नृत्य (चाँग आदिवासी नृत्य), खांबा लीम (हे नृत्य महिला आणि पुरूष अशा दोन गटात होते. हे दोन गट दोन रांगात उभे राहून करतात याला अखू असे म्हणतात.), कुकी नृत्य (हे नृत्य बांबूच्या काठ्या घेऊन केले जाते.), लेशालापटू (हे नृत्य फक्त महिला करतात), मयूर नृत्य हे प्राणी नृत्य आहे. मोडसे (हे नृत्य ओ आदिवासी करतात. मोनयोशो, सदाल केकाई, सिछा, शंकाई, रेंग्मा हे इतर नृत्यही नागालँड मध्ये प्रचलित आहेत.
कोहीमातले प्राणीसंग्रहालय आणि वस्तुसंग्रहालय, दिमापूर हे औद्यागिक केंद्र, इंटकीतले वन्य प्राणी अभयारण्य, मोकोकचाँग, ओखा, मेदजीफेमा, चूमुकेदिमा ही पर्यटन स्थळे राज्यात लोकप्रिय आहेत.
कोहिमा
भारताच्या इशान्येकडील नागालँड हे आजपर्यंत पर्यटनाच्या दृष्टीने फारचे प्रसिद्ध नसले तरी या राज्याचे निसर्गसौदर्य, येथील जाती जमातींच्या अजूनही टिकविल्या गेलेल्या संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची दिलेली जोड यासाठी या राज्याची सफर आवर्जून करावी अशी आहे. राज्याच्या राजधानी कोहिमा हे पहाडी शांत शहर पर्यटनासाठी आदर्श ठिकाण म्हणता येईल. या शहराचे नावच मुळी केहवीरा या फुलावरून पडले आहे.
शहराला भेट देणार्यांना दोन ठिकाणची भेट अजिबातच चुकवून चालणार नाही.
पहिले म्हणजे दुसर्या महायुद्धात शहीद झालेल्या शेकडो जवानांचे येथे उभारले गेलेले युद्ध स्मारक. येथे या सैनिकांवर अंत्यसंस्कार केले गेले.
दुसरे म्हणजे येथील राजा मिरचीची चव. ही बाब मात्र जरा जपूनच करायला हवी कारणही राजा मिरची जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून प्रसिद्ध आहे.
नागा जमातींच्या नागरिकांचे हे राज्य असले तरी येथे अनेक जनजाती आहेत. विशेष म्हणजे आधुनिकतेचा स्वीकार करताना त्यांनी आपल्या परंपरा संस्कृतीही जपून ठेवली आहे. त्यांची ही परंपरा दाखविणारे कोहिमा मधील संग्रहालय आवर्जून पाहायला हवे.
हॉर्नबील महोत्सव
डिसेंबरमध्ये येथे किसामा हेरिटेज गावात हॉर्नबील महोत्सव साजरा केला जातो आणि तो फार प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्व जाती जमातींचे लोक यावेळी परंपरागत वेशभूषेत येतात आणि त्यांची लोकगीते, नृत्य यांचे सादरीकरण करतात. कोहिमापासून जवळ जाफू चोटी हा उंच पहाड ट्रेकसाठी उत्तम आहे. येथून कोहिमाचे नयनरम्य दर्शन होते. येथे राज्यपक्षी टॅगोपॅनही पाहायला मिळतो. गॅरिसन हिलवर युद्धस्मारक आहे.नागालैंड मधील हॉर्नबिल फेस्टिवल आयोजन कला आणि संस्कृती विभाग द्वारे केले जाते. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत साजरा केला जातो.
नागा हेरिटेज व्हिलेज
कोहिमा शहराच्या बाहेरील भागात असलेले नागा हेरिटेज व्हिलेज म्हणून ओळखले जाणारे किसामा गाव हे नागालँडच्या आकर्षणांपैकी एक आहे. नागा लोकांच्या संस्कृती आणि परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे हा त्याचा उद्देश आहे. किसामा गावाचे नाव किग्वेमा आणि फामासा या दोन गावांच्या नावावरून पडले आहे. डिसेंबरमध्ये येथे साजऱ्या होणाऱ्या हॉर्नबिल उत्सवादरम्यान गाव एका आठवड्यासाठी लोकांसाठी खुले केले जाते. नागालँडच्या या सुंदर गावांना भेट देण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येतात.
इजुको घाटी
जून ते सप्टेंबर या काळात गेलात तर इजुको घाटीला भेट द्यायला हवी कारण या काळात येथे अनेक प्रकारची रानफुले फुललेली असतात जणू फुलांचे गालिचे घातल्यासारखी ही फुले दिसतात. कहोनोमा गांव ग्रीन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे कारण येथील घरांची छपरे हिरव्या रंगांची आहेत शिवाय शेकडो वर्षांचे वृक्ष येथे मुद्दाम जतन केले गेले आहेत.
ईशान्य भारतातले सर्वात मोठे आणि खास बनावटीचे कॅथॉलिक चर्चही मुद्दाम पहावे असेच. चर्चवर उभारला गेलेला लाकडी क्रॉस १६ फुट उंचीचा आहे. नागालँडमध्ये गेल्यानंतर राजा मिरचीपासून बनलेले पदार्थ, बांबूच्य कोंभापासून बनविलेले खास लोणचे टेस्ट करायचे आणि हाताने विणलेल्या नागा शॉल खरेदी करायच्या हाही कार्यक्रम करायला हवाच.
ट्रिपल फॉल्स
ट्रिपल फॉल्स नागालैंड मधील दीमापुर शहरात आहे. हे फॉल्स सेथेकिमा गावात आहेत. हे तीन सुंदर आणि चमकदार फॉल्स 280 फूट उंच असुन हे दृश्य पाहण्यासारखे व आकर्षक आहे. येथे ट्रैकिंग करता येते. ट्रिपल फॉल्स पर्यटका साठी एक अद्भुत नजराणा आहे. नागालैंड मधील लोकप्रिय स्थळापैकी सर्वांत सुंदर ठिकाणं आहे.
प्रवेश : सकाळी 5 ते संध्याकळ 6
ग्रीन पार्क
दीमापुर जिल्ह्यात ग्रीन पार्क असून पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे. नावावरूनच कळते की हा पार्क हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे.
नागालँड राज्याची सर्वात मोठी नर्सरी आहे.ज्यामध्ये सर्व प्रकारच्या फळे फुले याची विविध प्रकार पाहू शकता. तसेच रेस्टॉरंट आहे, सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेतशिवाय येथे तूम्ही वैयक्तिक कार्यक्रम घेऊ शकता. पार्टी आयोजन पण करू शकता. मामूली प्रवेश शुल्क आकारले जाते. नेहमी खुले असते.
प्रवेश : सकाळी 9 ते संध्याकाळी 5
प्रवेश फी : नि शुल्क
रंगपहाड़ रिजर्व फॉरेस्ट
रंगपहाड़ रिजर्व फॉरेस्ट, नागालैंड मधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे स्थान वन्य जीव आणि औषधी वनस्पती साठी प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे विविध प्रकारचे पशू पक्षी पाहण्यासाठी खूप लोक येत असतात.
येथे विविध प्रकारचे औषधी वनस्पती चे जतन आणि संवर्धन केले जाते. या आरक्षित वनात अस्वल, हरिण, चितळ, जंगली शेळी, आणि बरेच प्रकारचे पशू पक्षी पाहता येतात. अनेक प्रकारच्या पशू पक्षांच्या विलुप्त जाती प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या सुद्धा येथे पाहता येतात. 49.4 एकर भूमि वर असलेले हे अभयारण्य एकवेळ अवश्य पहावे.
प्रवेश : सकाळी 8 ते संध्याकाळी 8
प्रवेश फी : नि शुल्क
नागालैंड जूलॉजिकल पार्क
नागालैंड जूलॉजिकल पार्क दीमापुर जिल्ह्यात आहे. याचे उद्घाटन वर्ष 2008 मधे केले गेले.हा पार्क पशू पक्षी आणि वनस्पती संवर्धन यासाठी उभारला गेला आहे. विशेष करून उत्तर पूर्व आणि नागालैंड मधील जीव संरक्षण केंद्र म्हणून कार्य करीत आहे.
प्रवेश फी: मोठ्यासाठी 10 रुपये,
लहान मुलांना 5 रुपये
प्रवेश वेळ : सकाळीं 10 ते संध्याकाळी 4
खोनोमा गांव
नागालैंड मधील ‘अंगामी नागा’ जातीय समूह संबंधित आकर्षिक शहर आहे. खोनोमा गाव नागालैंड ची राजधानी कोहिमा पासुन 20 किमी आहे. खोनोमा गाव भारतातील पहिले ग्रीन विलेज म्हणून ओळखले जाते. येथील जनजीवन आणि आदिवासी संस्कृती पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी परदेशी लोकांची वर्दळ असते.
शीलोई लेक
नागालैंड मधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशी शीलोई झील पटकाई मधील एक सुंदर झील आहे. शीलोई लेकच्या चारी बाजूला वर्धमान घाटी आहे. ही झील ला लाटसम गावातील लोकांसाठी खूप महत्वाची आणि श्रध्दास्थान आहे . असे मानले जाते की या झील मधे एका लहान मुलाचा पवित्र आत्मा वास करतो.
तौफेमा
नागालैंड के पर्यटन स्थळ सूची मधील तौफेमा एक हिरवीगार वनराईने नटलेले सुंदर असे स्थळ आहे. नागालैंड पर्यटन विभाग आणि स्थानीय समुदाय यांनी संयुक्त मिळून पर्यटकासाठी छोट्या झोपड्यांचा समूह बनवलेला आहे.
तौफेमा ग्राम संस्कृति, जीवन शैली नागालैंड निवासी साठी एक अविस्मरणीय अनुभव आहे.
मोकोकचंग
सुंदर परंपरा आणि उत्सव आणि उत्साही आओ जमातीच्या आतिथ्यमुळे हा नागालँडचा सर्वात जीवंत जिल्हा आहे.
येथे आपण मंत्रमुग्ध करणारे डोंगर आणि प्रवाहांचे सौंदर्य पाहू शकता. मोकोकचुंग आणि त्याच्या आजूबाजूला अशी अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत जी आपल्याला अविस्मरणीय अनुभव देतील. आपण येथे असल्यास आपण लाँगखुम, मोकोकचंग व्हिलेज आणि पार्क, चांगटोंग्या, चुचुईमलांग, उन्ग्मा व्हिलेज इत्यादी भेट देऊ शकता.
मेलुरी
एक लहान आणि विचित्र गाव आहे. खेड्यात अपवादात्मक शिकार करण्याच्या कौशल्यांसाठी ओळखल्या जाणार्या पोचरी जमातीचे घर आहे. हे गाव नागालँडमध्ये केवळ आपल्या सौंदर्यासाठीच नव्हे तर आपल्या आकर्षक खडकांच्या स्थापनेसाठी देखील आवश्यक आहे.
वोखा
जसे तुम्ही वोख्यावर पोहोचताच डोंगर आणि हिरव्यागार लँडस्केप तुमचे मन मोहून घेतील. येथे आपल्याला बहुरंगी फुले, रसाळ आणि ताजी फळांसह मुक्तपणे वाहणा नद्या आढळतील.
येथे राहणारी जमात म्हणजे लोथा जमात. आपण येथे असल्यास, माउंट तिय्या, डोआंग नदी, तोत्सू क्लिफ, तेहरंग व्हॅली इत्यादी मध्ये फिरायला विसरू नका.
सोम
सोम कोन्याक सर्पांपैकी एक आहे, जो स्वत: ला नोहाचे वंशज मानतात. सोम समुद्रसपाटीपासून 897.64 मीटर उंचीवर आहे. संपूर्ण नागालँड राज्यात सोम सर्वात समृद्ध आणि रहस्यमय स्थान मानले जाते. हवेत असे काहीतरी आहे जे आपणास त्याच्याकडे खेचते.
जुकू घाटी
नागालैंड मधील जुकू घाटी कोहिमा पासुन 25 किमी अंतरावर आहे.नागालैंड मधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.नागालैंडला पूर्वेचे स्विटजरलैंड म्हटले जाते.
जुकु घाटीआणि जपफू पीक ची सुंदरता पाहण्याची संधी मिळते. येथे तूम्ही ट्रेकिंग करु शकता.जपफू ची ऊंची 3048 मीटर असुन नागालैंड मधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे .
काय खरेदी कराल:-
पारंपरिक वेशभूषा परिधान करणे, कपड्यांना रंग देणे, बांबूपासून अनेक वस्तू तयार करणे, चटया तयार करणे, ऊसांपासून विविध वस्तू तयार करणे, धातू पासून वस्तू तयार करणे अशा विविध हस्तकला नागालँड मध्ये तयार होत असतात.
कुठे राहाल:-
सर्व प्रकारच्या बजेट मधील हॉटेल्स उपलब्ध आहेत त्यापैकी काही प्रसिध्द :-
होटल थेजा फोर्ट
होटल जाफू
त्रगोपन होटल (Tragopan)
होटल सारामती
नाउन रिज़ॉर्ट
कधी जाल:-
नागालैंड भेटीसाठी ऑक्टोबर ते मार्च ही योग्य वेळ आहे.
कसे जाल:-
दीनापूरपासून ७२ किमीवर अंतरावर कोहिमा आहे आणि दीनापूर रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. त्यानंतर कार, बसने प्रवास करता येतो तसेच आता एअरपोर्टची सुविधाही झालेली आहे.
विमान सेवा:- दिमापुर विमानतळ
रेल्वे सेवा:- दिमापुर रेल्वे स्टेशन हे एकमेव स्टेशन असून गुवाहाटी आणि कोलकाता बरोबर जोडलेले आहे.
रस्ता सेवा:- अतिशय उत्तम सेवा सुविधा उपलब्ध आहेत. सर्व प्रमूख शहराशी बस सेवा, टॅक्सी सुविधा, सुमो, इत्यादी अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा