या ठिकाणास पट्टदकल्लू अथवा रक्तपुरा असेही म्हणतात. कलेच्या इतिहासकारांची ही स्वप्ननगरी आहे.
भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडे आहे. या ठिकाणास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. हे खेडे बदामीपासून २२ किलोमीटर व ऐहोळेपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथील ऐतिहासिक मंदिरांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव होतो. या महोत्सवाला खूप पर्यटक येतात.
भारतातील विविध शैलीतील मंदिरे येथे आहेत. यातील चार मंदिरे दाक्षिणात्य पद्धतीची, तर चार मंदिरे उत्तर भारतीय नागरशैलीतील आहेत. पापनाथ मंदिर, काडसिद्धेश्वर मंदिर, जंबुलिंगेश्वर मंदिर, गळगनाथ मंदिर, चंद्रशेखर मंदिर, संगमेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, वीरुपाक्षझा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, ही मंदिरे येथे आहेत.
विरूपाक्ष मंदिर
हे मंदिर सर्वांत सुंदर समजले जाते. दाक्षिणात्य पद्धतीचे हे मंदिर कांचीच्या कैलासनाथ मंदिराप्रमाणे आहे. इ. स. ७३५मध्ये कांचीच्या पल्लवांच्या विरुद्ध झालेल्या लढाईतील विजयाच्या सन्मानार्थ विक्रमादित्य दुसरा याने हे मंदिर बांधले. विरूपाक्ष मंदिराचे तोंड पूर्वेकडे मलप्रभा नदीकडे आहे. मुखमंडपातील १८ खांबांमध्ये पुराणांमधील दृश्ये दर्शविली आहेत. रावणानुगृह मूर्ती, नरसिंह, गजेंद्रमोक्षम, शिवाची नृत्येदेखील त्यात आहेत. पंचतंत्रातील कथाही येथे दाखविल्या आहेत.
पापनाथ मंदिर
विरूपाक्ष मंदिराच्या दक्षिणेस सुमारे अर्धा किलोमीटरवर हे मंदिर आहे. साधारण आठव्या शतकाच्या मध्यात हे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर द्रविड, नागारा शैलीसाठी प्रसिद्ध आहे. शैव व वैष्णव पंथांच्या देव-देवतांची शिल्पे यात कोरलेली आहेत. रामायण, किरातार्जुन कथा, तसेच मिथुनशिल्पेही येथे दिसून येतात.
काशी-विश्वनाथ मंदिर
हे मंदिर काशीविश्वेश्वर म्हणूनही ओळखले जाते. काशी-विश्वनाथ मंदिर पट्टदकलच्या लहान मंदिरांपैकी एक आहे. साधारण सातव्या शतकाच्या उत्तरार्धात याचे बांधकाम झाले असावे.
संगमेश्वर मंदिर
याला विजयेश्वर मंदिर असेही म्हणतात. चंद्रशेखर मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या या मंदिरात सातव्या आणि आठव्या शतकातील शिलालेख आहेत.
राहायची सोय:-
पट्टडकल मध्ये राहण्याची सुविधा अत्यंत कमी उपलब्ध असून बदामी हाच पर्याय आहे.बदामीमध्ये हॉटेल्सचे मर्यादित पर्यायच मिळू शकतात. होम स्टेचे काही पर्याय आहेत.
केव्हा जावे:
मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते.पाऊस इकडे फार पडत नाही .
रेल्वे मार्ग:
एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हंपी आहे .
काही उपयुक्त रेल्वे :
(१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस .
(२) मिरज हुबळी एक्सप्रेस रोज
(३)हुबळी ते मुंबईसाठी
चालुक्य ए ११००६ /११०२२ ,
शरावती एक्स ११०३६ ,
शिवाय १७३१७ /०६५११ आहेत .
रस्त्याने: सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बेळगाव, येथून बस सेवा उपलब्ध आहेत.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा