नालंदा / Nalanda येथील प्रशंसित महाविहार हे एक विशाल बौद्ध मठ आहे ज्याचे निर्माण भारतीय मगध (सध्याचे बिहार) साम्राज्याने केले होते. हि जागा बिहार शरीफ नगर पासून पटना येथून दक्षिणेस ९५ किलोमीटर दूर आहे. सातव्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत अभ्यासाचे मोठे केंद्र होते. यासोबतच उनेस्कोने जाहीर केलेली वर्ल्ड हेरीटेज साईट पण आहे.
५ व्या आणि ६ व्या शतकात नालंदा हे गुप्त साम्राज्याच्या काळात मोठ्या नावलौकीकाने उदयास आली. नंतर हर्ष आणि कन्नौज साम्राज्यातही याचे उल्लेख सापडतात. या नंतरच्या काळात पूर्वी भारतात पाल साम्राज्यात बौद्ध धर्माचा विकास होताना दिसतो.
आपल्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना ह्या विद्यापीठाकडे अनेक विद्वान आणि विद्यार्थ्यांना आकर्षिले यासोबत चीनी, तिब्बती कोरियाई आणि मध्य आशियाई देशांमधून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. पुरातत्वीय तथ्यांच्या आधारे कळते कि याचा संबंध इंडोनेशियाच्या शैलेन्द्र साम्राज्याशी सुद्धा होता. ज्यांच्या एका राजाने कॉम्प्लेक्स मध्ये एका मठाची निर्मिती केली होती.
नालन्दाविषयी बहुतांश माहिती पूर्वी आशियाई तीर्थ भिक्षुकांकडून लिहिली आणि प्रचारली गेली आहे. या भिक्षुकांमध्ये वूझांग आणि यीजिंग यांचा समावेश आहे, ज्यांनी ७ व्या शतकात महाविहाराची यात्रा केली होती. विन्सेंट स्मिथ यांनी म्हटले होते कि नालंदाचा पूर्ण इतिहास हा महायानी बौद्ध यांचाच इतिहास आहे.
१२ व्या शतकात मामलुक साम्राज्यातील बख्तियार खिलजी यांच्या सैन्यांनी नालन्दाची तोड फोड केली होती. तर दुसरया तथ्यांच्या आधारे महाविहार अस्थायी फ्याशन च्या काही वेळा आधी पर्यंत सुरु होते. परंतु मग अचानक १९ व्या शतकापर्यंत लोकांनी यास विसरले होते. नंतर भारतीय पुरातत्वीय विश्लेषणात सर्वेक्षण केल्यावर याचा शोध पुन्हा लावल्या गेल्यावर जगाला याची माहिती मिळाली.
व्यवस्थित उत्खनन कार्य १९१५ मध्ये सुरु होऊन त्यानंतर विटांच्या बनलेल्या ६ मंदिरांना पुन्हा १२ हेक्टरच्या विशाल परिसरात स्थापित केल्या गेले. उत्खननात येथे मुर्त्या, नाणी, शिलालेख, इत्यादी सापडले. मिळालेल्या सर्व वस्तूंना पुरातत्वीय शाखेने नालंदा वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. सद्ध्याच्या काळात नालंदा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी येतात. बौद्ध धर्मीय लोक मोठ्या संख्येने येतात.
प्राचीन इतिहास
प्रथम नालंदा हे एक समृद्ध गाव होते. याच्या जवळच राजगृह (सध्याचे राजगिर) हे शहराचा व्यापारी मार्ग होते. राजगृह हि त्यावेळी मगधची राजधानी होती. असे म्हटले जाते कि जैन तीर्थकर महावीर यांनी १४ पावसाळे येथे वास केला होता. यासोबतच गौतम बुद्धांनी सुद्धा येथे आमकुजाजवळ प्रवचन दिले होते. असे म्हटले जाते कि महावीर आणि बुद्ध ५-६ शतकात येथे येत असत.
बिहार राज्यात नालंदा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जे भारतातच नाही तर विश्वातील लोकांनासुद्धा आकर्षित करते.बौद्ध धर्माचे एक पवित्र स्थळ सुद्धा आहे. नालंदामध्ये एक आणखी वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित वस्तूसंग्रहालय पाहायला मिळते. ज्यामध्ये 3 डी अनिमेशनच्या मदतीने नालंदा इतिहास सम्बन्धी माहिती घेतली जाते.
क्सुजांग मेमोरियल हॉल
प्रसिद्ध भिक्षुक आणि यात्रियांसाठी सन्मान देण्याच्या उद्देशाने क्सुजांग मेमोरियल हॉलची स्थापना केली गेली होती या मेमोरियल हॉलमध्ये बरेच चीनी बौद्ध भिक्षुकांच्या मुर्त्या लावल्या आहेत.
नालंदा पुरातत्वीय म्यूजियम
भारतीय पुरातत्वीय विभागाने पर्यटकान्साठी आकर्षण म्हणून येथे एक म्युजियम सुद्धा सुरु केले आहे.
ह्या म्युजियम मध्ये आपल्याला प्राचीन अवयवांना पाहण्याची संधि मिळते. उत्खनानातुन जमा झालेल्या १३,४६३ वस्तुमधुन फ़क्त ३४९ वस्तुच म्यूजियम मध्ये पहायला मिळतात.
कधी जाल:- वर्षभरात कधीही भेट देऊ शकता.
कसे जाल:-
रस्ता सेवा:- राजगिर 12 km, बोध गया 110 km, गया 95 km, पाटणा 90 km, पावापुरी 26 km, बिहार शर्रिफ 13 km.
लोकल सेवा :- टॅक्सी सुविधा अत्यंत कमी आहेत. सायकल रिक्षा भरपूर आहेत.
विमान सेवा:- जवळील विमानतळ पाटणा 89 km. कोलकाता, रांची, मुंबई, दिल्ली, लखनऊ ही जवळची विमान सेवा उपलब्ध आहेत.
रेल्वे सेवा:- राजगिर (12 km) हे सर्वातजवळचे स्टेशन आहे.गया 95 km आहे
अधिक माहितीसाठी:-
Bihar State Tourism Development Corporation organizes trips to Nalanda, Rajgir etc. from its Headquarters Tourist Bhawan, Bir Chand Patel Path, Patna-1. Ph.0612-2222622 , 2225411. Fax-0612-2236218.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा