google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : विक्रमशिला एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

विक्रमशिला एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ

 बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तिबेटी परंपरेनुसार ‘मगध’चा ‘पाल’ वंशीय राजा ‘धर्मपाल’ (राज्यकाल – इ.स. ७८०-८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता, आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. 




या विहारास ‘विक्रम’ नावाच्या यक्षाचे नांव देण्यात आले. या विहाराचेच पुढे प्रसिद्ध अशा ‘विक्रमशिला विद्यापीठा’त रुपांतर झाले. धर्मपालाचे दुसरे नांव ‘विक्रमशिल’ असल्यामुळे या विद्यापीठाचे नांव विक्रमशिला ठेवण्यात आले. 


 नालंदा विद्यापीठाप्रमाणेच येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. विक्रमशिला विद्यापीठ हे रसायनशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेद याचे फार मोठे केंद्र होते विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागलपूरजवळ येथे होते धर्मपालन नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये केली या ठिकाणी सहा विहार होते प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.


विक्रमशिला विद्यापीठ हे सध्याच्या बिहार राज्याच्या भागलपूर जिल्ह्यात भागलपूरपासून पूर्वेला ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या अंतीचक येथे होते. पाल घराण्यातील राजा धर्मपाल याने नवव्या शतकाच्या सुरुवातीला विक्रमशिला विहाराची स्थापना केली. हाच विहार पुढे ‘विक्रमशिला विद्यापीठ’ या नावाने प्रसिद्ध झाला.  रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे विद्वान पंडित या विद्यापीठात अध्यापनकार्य करीत होते. 


विक्रमशिला विद्यापीठाच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालय होते. येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. 


प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे.

कधी जाल:- वर्षभरात कधीही भेट देऊ शकता.

कसे जाल:-

रस्ता सेवा:- राजगिर 12 km, बोध गया 110 km, गया 95 km, पाटणा 90 km, पावापुरी 26 km, बिहार शर्रिफ 1

लोकल सेवा :- टॅक्सी सुविधा अत्यंत कमी आहेत. सायकल रिक्षा भरपूर आहे

विमान सेवा:- जवळील विमानतळ पाटणा 89 km. कोलकाता, रांची, मुंबई, दिल्ली, लखनऊ ही जवळची विमान सेवा उपलब्ध आहे.

रेल्वे सेवा:- राजगिर (12 km) हे सर्वातजवळचे स्टेशन आहे.गया 95 km


 अधिक माहितीसाठी:-

bihar state tourism development corporation organizes trips to nalanda, rajgir etc. from its headquarters tourist bhawan, bir chand patel path, patna-1. ph.0612-2222622 , 2225411. fax-0612-223621


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर क

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!

अस्वीकरण (disclaimer

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते


. ): ..ळवा.8.ठी:- आहेहेत. त. 3 km.ल:- प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...