google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : मध्य प्रदेश |"The Heart of Hindusthan"

माझी ब्लॉग सूची

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

मध्य प्रदेश |"The Heart of Hindusthan"

 

स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..

आज आपण या लेखामध्ये  मध्यप्रदेश मधील आणखी काही पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. 


भीमबेटका


ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे. यांपैकी तेथील पाषाणयुगीन गुहेतील चित्रकारी इसवी सनपूर्व ३०,००० वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते.ही भित्तिचित्रे भारतातली सर्वात प्राचीन भित्तिचित्रे समजली जातात. भीमबेटकाच्या सभोवताली अजून सुमारे पाचशे शैलगृहे आहेत.


भोजपुर 

या मंदिरांशी शिव भक्तांची अपार श्रद्धा जोडली गेली आहे.मध्यप्रदेशमध्ये महादेवाची विविध प्राचीन मंदिरं असून, ज्यामध्ये दोन ज्योतिर्लिंगसुद्धा आहेत. या व्यतिरिक्त येथे आणखी एक शिव मंदिर असून हे आजपर्यंत अपूर्ण आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून 32 किलोमीटर अंतरावर भोजपूर गाव असून येथेच महादेवाचे भोजेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या छताचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे हे मंदिर अपूर्ण आहे. या मंदिराला पूर्वेचे सोमनाथ मंदिर असेही म्हटले जाते.

भोपाळ

बिर्ला संग्रहालय 

कोणतीही संस्कृती आणि इतिहास जाणून घेण्यासाठी  हा एक चांगला पर्याय आहे. भोपाळची संस्कृती आणि सभ्यता जाणून घेण्यासाठी आपण बिर्ला संग्रहालयाला भेट दिली पाहिजे. आर्किटेक्चरपासून दुसऱ्या शतकातील हस्तलिखिते, चित्रे आणि शिलालेख देखील संग्रहालयात आहेत.


भोपाळचा ताजमहाल 

 नाव ऐकून  नक्कीच धक्का बसला असेल. हे पूर्णपणे सत्य आहे. भोपाळमध्ये ताजमहाल देखील आहे, क अगदी आग्राच्या ताजमहालासारखा दिसतो. हा ताजमहाल नवाब शाहजहाँ बेगमने बांधला होता. नवाब शाहजहां कलाप्रेमी होते. त्यांना स्थापत्यशास्त्रात खूप रस होता. भोपाळचा ताजमहाल बांधण्यासाठी एकूण 13 वर्षे लागली.


लक्ष्मण झुला

सर्वांना माहित आहे की भोपाळला तलावांचे शहर म्हटले जाते. हा झूला ऋषिकेशच्या प्रसिद्ध लक्ष्मण झुल्यासारखी आहे. जो भोपाळच्या मोठ्या तलावाच् पुलावर आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे केले गेले. तलावाची लांबी 183 मीटर आणि रुंदी सुमारे 4 मीटर आहे. 


इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय

वनविहार पाहिल्यावर बडा तालाबच्या काठानं पुढे जाताना वनविहार जंगलाच्या पलीकडे ‘श्यामल हिल्स’ डोंगराच्या एका बाजूस हे मानव संग्रहालय आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण भारत देशाची संस्कृती इथं पहावयास मिळते. घरं, झोपड्या, हस्तकला, मूर्ती, सण, उत्सव, पोशाख... अगदी प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य, तिथली संस्कृती एकत्र जतन करणारं हे संग्रहालय म्हणजे अख्खा भारत देश डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे...तेही एकाच वेळी...!


वनविहार:

वनविहारचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला भलामोठा डोंगर आणि पायथ्याला बडा तालाब. प्रवेश शुल्क भरून प्रवेश केला की, या जंगलात प्रत्यक्ष वाघ, सिंह, बिबटे, अस्वल, हरणं, सांबर, नीलगाय, विविध प्रकारचे पक्षी, साप, कासवं, काळविटे पहावयास मिळतात. अगदी मोकळ्या रानात १५-२० फुटावरून वाघ, सिंह, बिबटे पहावयास मिळतात.


नर्मदा धुँवाधार / नर्मदा जलप्रपात:


नर्मदेच्या प्रवाहात निर्माण झालेला धुँवाधार धबधबा या ठिकाणी पहावयास मिळतो. अमरकंटक या स्थानाला तीर्थराज म्हणतात कारण या ठिकाणी नर्मदा, सोना आणि जोहिला या नद्या उगम पावतात. दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये इथे नर्मदा महोत्सव साजरा केला जातो.


बडा तालाब:

या तलावाची निर्मिती एक हजार वर्षांपूर्वी परमार राजा भोजनं केली. विवेकानंदांच्या पुतळ्याची आठवण व्हावी असा भव्य दिव्य पुतळा आणि समोर प्रशस्त, दूरवर पसरलेला तलाव. सूर्याची किरणं तलावावर उतरली की संध्याकाळ अप्रतिम सुंदर दिसते आणि ते विलोभनीय सौंदर्य पाहण्यासारख आहे.


मध्य प्रदेश संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..





२ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...