google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : मध्य प्रदेश | "The Heart of Hindusthan"

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

मध्य प्रदेश | "The Heart of Hindusthan"

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..

 आज आपण या लेखामध्ये मध्यप्रदेश मधील पर्यटन स्थळांची  माहिती घेणार आहोत. 


ओरछा: -
ओरछा हे मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यातील बेतवा नंदीच्या काठावर वसलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे. ओरछा स्मारके, मंदिरे, किल्ले, महल आणि अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे. येथील मंदिरे आणि हवेल्या  भव्यतेमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. जुलै महिन्यात ओरछाची भटकंती  एक अविस्मरणीय अनुभव देते संध्याकाळच्या वेळी  बेतवा नदीच्या काठावर सूर्यास्ताचा अद्भूत दृश्य खूप सुंदर असते.

महेश्वर:-
महेश्वर ही अहिल्याबाई होळकरांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराणी अहिल्या बाई होळकर आधी मालवा येथे राज्य करत होता नंतर त्या नदीच्या काठी वसलेल्या इंदूरच्या दक्षिणेस महेश्वर येथे स्थायिक झाल्या. कुंभारच्या युद्धात अहिल्याबाई यांचे पती खंडेराव होळकर मारले गेले. यानंतर त्या मालवा राज्याच्या महाराणी बनल्या. त्यांचा अहिल्या किल्ला येथे आहे. माहेश्वर हे महेश्वरी साडीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तसेच बॉलीवूड चित्रपट छायाचित्रणसाठी हे स्थान अतिशय प्रसिध्द आहे.

कान्हा नॅशनल पार्क:- 
कान्हा अभयारण्य हे जैवविविधता आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. बांबूची जंगले, गवताळ मैदाने, वन्यजीव यामुळे कान्हा अभयारण्य मन जिंकून घेते. या नॅशनल पार्कची स्थापना १९५५ मध्ये झाली होती. १९७४ मध्ये इथेच कान्हा टायगर रिझर्व्हची स्थापना करण्यात आली होती. येथील प्रसिद्ध हरणांचे संरक्षण या पार्कमुळे करण्यात येते आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. येथील वाघ प्रसिद्ध आहेत. सध्या कान्हा नॅशनल पार्कमध्ये १००० पेक्षा जास्त फुलांची झाडे आहेत. निसर्गवेड्यांसाठी कान्हा नॅशनल पार्क ही एक पर्वणीच आहे.

मांडू :-
मांडू किंवा मांडवगढ हे इसवीसनापूर्वी सहाव्या शतकातील वास्तुकला, शिल्पकला आणि इतिहास यांचा खजिना आहे. येथील ऐतिहासिक इमारती इतिहासाची आठवणी करून देतात. मांडूच्या राजांच्या समृद्ध आणि भव्य वारसा दिसतो. मध्य प्रदेशातील सुंदर इमारतींपैकी काही इमारती आहेत

ग्वाल्हेर :-
हे ऐतिहासिक शहर  सुंदर महाल, किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराची स्थापना राजा सूरजसेनने केली होती. इथे अनेक शतके जुन्या इमारती आणि मंदिरे आहेत. त्यामुळे या शहराच्या सौंदर्यात भर पडते. शिवाय इथे डोंगर आणि हिरवेगार जंगल आहे. ग्वाल्हेरचा किल्ला या सौंदर्याचे प्रतिक बनला आहे. येथील वास्तुकला मंत्रमुग्ध करते. या किल्लाची निर्मिती दोन भागात वेगवेगळ्या काळात झाली होती. ऐतिहासिक वास्तू आणि इतिहासाची आवड असणाऱ्या साठी हे एक अतिशय सुंदर स्थळ आहे.


मध्य प्रदेश संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

२ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...