google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : गोवा | " येवा गोवा आपलोच असा"

माझी ब्लॉग सूची

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

गोवा | " येवा गोवा आपलोच असा"

गोव्यातील नितांत सुंदर किनारे देशी आणि विदेशी पर्यटकांनी गजबजलेले असतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी जात असता तेव्हा काही गोष्टी कटाक्षाने टाळणे आवश्यक असते.

गोव्याला जात असाल तर खालील गोष्टी टाळा.

१ : दळणवळणाची व्यवस्था तपासून घ्या

गोव्यात जाताना स्वतःच्या कारने जात असाल तर पार्किंगच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. 

आपली गाडी इतरांना त्रासदायक होईल अशा पद्धतीने पार्क करू नका. योग्य ठिकाणीच मार्किंगच्या आतच गाडी पार्क करा.

गोव्यात फिरण्यासाठी रिक्षा वापणार असाल तर थोडे सावधान रहा. काहीवेळेस फसवणूक होण्याची शक्यता असते. त्या पेक्षा कार किंवा बाईक भाड्याने घ्या.

२ : स्वच्छतेची काळजी घ्या 

 जेव्हा पर्यटक म्हणून जात असाल तेव्हा तेथील किनाऱ्यावर कचरा होणार नाही याची काळजी घ्या. 

जेव्हा गोव्याला आपले टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून निवडता तेव्हा तेथील किनारे स्वच्छ असावेत अशी अपेक्षा असते. 

तेव्हा  स्वतः देखील तुमच्या नंतर येणाऱ्या पर्यटकांसाठी किनारा स्वच्छ ठेवा.

खाद्यपदार्थ तिथे खाणार असाल तर त्यांच्या प्लास्टिकच्या अथवा कागदाच्या पिशव्या अथवा चॉकलेट रॅपर्स, उरलेले अन्नपदार्थ शीतपेये अथवा बियरचे कॅन इत्यादी कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी डब्यात टाका, इतरत्र टाकू नका.

३ : समुद्रात उतरण्या आधी स्वत:ची काळजी घ्या 

समुद्रात पोहायलाउतरण्यापूर्वी कपडे पोहण्यास योग्य असतील याची खात्री करा. लुंगी अथवा साडी नेसून समुद्राच्या पाण्यात उतरू नका. 

जोरदार लाटेच्या प्रवाहात असे कपडे पायात अडकून  पडू शकता. 

लुंगी ढिली बांधली गेली असल्यास लाटेबरोबर वाहून जाऊ शकते.

४ : मद्यपान करताना काळजी घ्या

गोव्यामध्ये दारू स्वस्त मिळते आणि साहजिक पर्यटक दारू जास्त प्रमाणात खरेदी करतात, याचीच परिणीती दारू जास्त प्रमाणात पिण्यात होते.
दारू पिऊन गाडी चालवू नका आणि वाहतुकीचे नियम तोडू नका.

अपघात करून स्वतः अथवा दुसऱ्याला इजा करू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे दारू पिऊन समुद्राच्या पाण्यात उतरू नका.

मद्यप्राशन केल्याने मेंदूवरील ताबा सुटून तुम्ही कोसळू शकता आणि लाटांबरोबर वाहून जाऊ शकता.

५ : विदेशी पर्यटकांप्रती चांगला व्यवहार ठेवा 

गोव्याच्या कलंगुट, कोलवा, तसेच पालोलीम सारख्या जवळपास सर्वच किनाऱ्यांवर परदेशी पर्यटक नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
विदेशी महिला कमी कपड्यात अथवा टु पीस बिकिनी घातलेल्या अवस्थेत समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरतात.

अशा महिलांकडे टक लावून पहाणे टाळा. तसेच त्यांचे फोटो काढू नका. असे फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे अतिशय महागात पडू शकते. कायद्याने तो गुन्हा आहे.

६: महिलांनी घ्यावयाची काळजी 

महिला वर्गासाठी खास सूचना.. त हाय हिल्स वापरत असाल तर प्लिज त्या हॉटेल मध्ये ठेऊन साध्या चपला वापरा. उंच टाचांच्या चपला वाळूत पटकन रुततात.

 
लाट मोठी असेल तर प्रवाहातून पटकन बाहेर पडता न आल्याने बुडू शकता. कोणत्याही प्रकारच्या चपला अथवा बूट किनाऱ्यावरून वाहून जाणार नाहीत याची काळजी घ्या.

८ : कॅसिनोमध्ये जाताना घ्यायची काळजी 

गोव्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या कॅसिनोमध्ये जाणार असाल तर कटाक्षाने एक गोष्ट पाळा. खेळताना गम्मत म्हणून छोटीशी रक्कम घेऊन खेळा, मोठी रक्कम खर्च करू नका. सावधानतेने खेळा.

 तेथे फोटो अथवा व्हिडीओ शूट करणे टाळा. व्हिडीओ शूट करणे गुन्हा आहे.

९ : स्थानिकांशी सौदार्ह्य बाळगा 

 कोणत्याही किनाऱ्यावर तेथील रहिवाशी असलेल्या लोकांशी उद्धट पणे बोलू अथवा वागू नका. कोणत्याही प्रकारची वादावादी टाळा.

१० : अमुल्य ऐवज जपा 

आपली महत्वाची कागदपत्रे, पैशाचे पाकीट, दागिने अशा मौल्यवान वस्तू शक्यतो हॉटेलमध्ये सोडून येऊ नका. आपल्यासोबतच बाळगा.

पाण्यात उतरणार असाल तर मात्र या वस्तू लॉकरमध्ये ठेवून या.बरीच हॉटेल्स लॉकरची सुविधा देतात. त्याचा वापर करा. लॉकर नसेल तर खोलीची किल्ली काउंटरवर न ठेवता स्वतः जवळ असू देणे श्रेयस्कर.

११ : सतर्क रहा  

एखादी व्यक्ती तुम्हाला फ्री पासेस देऊ करत असेल तर नम्रपणे नकार द्या. मोठ्या क्लब मधील डान्स अथवा इतर गोष्टीचे आमिष दाखवत असतील तर नक्कीच काही गडबड आहे हे ध्यानात घ्या.

तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीत गुंतवून तुम्हाला लुटण्याचा डाव असू शकतो.

१२ : खेकड्यांंपासून जरा जपून रहा  
रात्रीच्या वेळेस किनाऱ्यावर मस्ती करत झोपू नका, खेकडे तुम्हाला चावू शकतात.विशेषतः दारूच्या नशेत अशा गोष्टी करणे टाळा.

 खेकडा अथवा इतर कीटक वगैरे चावलेले कळणार नाही व त्याचा त्रास होऊन  टुर मध्ये मनस्ताप  होऊ शकतो.

आपण आनंद घ्यायला आलो आहोत याचे भान ठेवल्यास पर्यटन सुखाचे होऊ शकते. गोवा तेथील चर्चेस आणि मंदिरे दोन्हीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचे काही नियम असतात.

जर तुम्हाला नियम जाचक वाटत असतील तर प्रवेश करूच नका. पण प्रवेश करणार असाल तर नियमांचे पालन करणेच योग्य ठरेल.

गोवा खुप सुंदर आहे.तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या, विशेषतः गोव्यातील मासे एकदा चाखून बघा. प्रत्येक प्रदेशाची आपली अशी खाद्यपदार्थाची एक खास शैली असते. गोवन फिशकरी अवश्य चाखा.

संध्याकाळी क्रूझ राईडची गंमत लुटा.

गोवा बाहू पसरून आपले स्वागत करत आहे..त्या स्वागताचा स्वीकार करून आनंद लुटा परंतु तो आनंद लुटत असताना गोव्याच्या आदरातिथ्याला आणि सौंदर्याला गालबोट लागेल असे काही करू नका.

(Covid १९ अत्यंत महत्वाचे) :- पर्यटकांना गोव्यात येण्यापूर्वीच हॉटेलचं बुकींग करावं लागेल. तसंच येताना गेल्या 48 तासातला कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत असायला हवा. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांची कोरोना टेस्ट सीमेवर केली जाईल. रिपोर्ट येईपर्यंत पर्यटकांना क्वारंटाईनमध्ये रहावं लागेल.

येवा..गोवा आपलाच असा.


गोवा संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

२ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...