google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : मध्यप्रदेश | "The Heart of Hindusthan"

माझी ब्लॉग सूची

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

मध्यप्रदेश | "The Heart of Hindusthan"

स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..

आज आपण या लेखामध्ये मध्यप्रदेश मधील आणखी काही पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. 

इंदूर

1. इंदूरचे खजरराना



 हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे. 


2. गीताभवन - ही वास्तू शहरातच आहे .सिंधमधून फाळणीच्या वेळी भारतात आलेल्या एका सिंधी गृहस्थाने ही वास्तू उभारली आहे . हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे .प्रवेशद्वार दक्षिणेतील गोपुराच्या पद्धतीचे आहे. अनेक देवतांच्या सुंदर मूर्तीची मंदिरे आहेत .सभागृहात इतिहासकालीन दृश्यांची तैलचित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वार चार पूर्णाकृती दगडांवर उभारलेले आहेत .

3. जुना राजवाडा - हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.
 
4. मल्हारी मार्तंड मंदिर - शिवलिंग, मध्यभागी गणेशमूर्ती व नटराजमूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
 
5. इंदूरची बिजासन देवी -


 वैष्णोदेवीप्रमाणे येथेही देवी पाषाणातील पिंडरूपात आहे. मंदिराच्या पुजार्‍यांच्या मते, या पिंडी स्वयंभू आहेत. त्या येथे कधीपासून आहेत, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. आम्हीच अनेक वर्षांपासून त्यांची पूजा करत आहोत, असे पूजारी सांगतात. 

6. लालबाग महाल - 

हा खूप मोठ्या विस्ताराचा राजवाडा आहे.पण बाहेरून अतिशय सामान्य अशी वास्तू वाटते. आता होळकर घराण्यातील कोणीही व्यक्ती तेथे राहत नाही .शेवटच्या वंशज (उषा राजे मल्होत्रा)विवाहानंतर मुंबईला १९६० च्या सुमारास स्थायिक झाल्या .त्यांनतर महालाची देखभाल पुरातन तत्व विभागाकडे आली आहे .
 
7.गोमतगिरी - जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.

8.नखराली ढाणी - इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
 
9. अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त वेदपाठशाळा (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप वेद आहेत. येथील अन्नपूर्णा देवीची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे जाते. ह्या मंदिराची बांधणी मथुरेच्या मीनाक्षी मंदिरासारखी आहे. प्रवेशद्वारात चार पूर्णाकृती हत्तिया आहेत व द्वार प्लास्टरचे आहे दगडाचे नाही. मंदिरात अन्नपूर्णादेवीची मूर्ती आहे व इतर काही छोटी मंदिरे आहेत . 

10. काच मंदिर -

 संपूर्ण इमारत बाहेरच्या बाजूला रस्त्यावरून( आत येण्याच्या भाग सोडून)प्रवेशद्वारापासून आत सर्वत्र रंगीत काचांच्या तुकड्यांची बांधलेली आहे. हुकूमचंद शहा या गृहस्थाने ती बांधली आहे. यात भिंतीवर, छतावर मूर्ती आहेत. त्यातून महाविराच्या जैन धर्मातील दृश्ये आहेत. चित्रात बारकावे स्पष्ट दिसतात. (फोटो काढायला परवानगी नाही )ही वास्तू गावातच भर वस्तीत आहे. 
 
11. छत्री - खान नदीच्या काठावर होळकर घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या येथे बांधल्या आहेत.मराठी वास्तुकलेचा यात उत्कृष्ठ नमुना बघायलामिळतो..

12.क्लाथ मार्केट -

 खुद्द इंदूरमध्ये सुती कपडे, साडया अतिशय स्वस्त आणि विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे जाताना एक मोठी रिकामी पिशवी घेऊन जाणं सोयीस्कर.

मध्य प्रदेश संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..



२ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...