रण ऑफ कच्छ :- याचा बहुतांश भाग भारतात असून थोडा भाग पाकिस्तान मध्ये आहे.थार वाळवंटाचा भाग रण ऑफ कच्छ आहे.गुजरात शासनाच्या वतीने दर वर्षी तीन महिने “रण उत्सव” आयोजित केला जातो.दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात या उत्सवाचे आयोजन केले जाते.ज्यामध्ये अनेक खेळ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.कच्छच्या इतर आकर्षणेमध्ये ऐतिहासिक भुज गाव आणि पारंपारिक हस्तकला, बंदरगाडीतील मांडवी शहरातील जहाज बांधणी आणि प्राचीन सिंधु संस्कृतीचा वास आणि धरणाचे अवशेष समाविष्ट आहेत.
गीर नेशनल पार्क :- हे उत्तम ठिकाण आहे.गीर अभयारण्य हे आशियाई सिंहाचे निवासस्थान आहे. वन्यजीव पाहण्याचे गीर हे भारतातील सर्वोत्तम व एकमेव स्थान आहे. सिंहांव्यतिरिक्त, गिर नॅशनल पार्क मध्ये तरस आणि जंगली कुत्रे पाहता येतात.
सोमनाथ:- भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले अत्यंत पूजनीय मंदिर आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असून प्राचीन काळी वर्षानुवर्षे परकीय आक्रमकांकडून बर्याच वेळा नासधूस व लुटालूट केले गेलेले मंदिर आहे. सोमनाथ मंदिराबाबत अनेक पौराणिक कथा आहेत.सोमनाथ मंदिराबरोबरच गीता मंदिर,बालुका तीर्थ,कामनाथ महादेव मंदिर ही स्थळेही पाहण्यासाठी प्रसिध्द आहेत.
सापुतारा:- हे पश्चिम घाटातील थंड हवेचे ठिकाण आहे.सुंदर हिरवीगार वनराई असलेले जंगल,उंच डोंगर व नितळ पाण्याचे तलाव ही इथली आकर्षण स्थळे आहेत.नयनरम्य वातावरणातील तलावात बोटिंग करण्यासाठी व केबल कार मध्ये बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. हे ठिकाण निसर्गप्रेमी,वन्यजीवप्रेमी,साहसी खेळ आवडणाऱ्या लोकांसाठी महत्वाचे ठिकाण आहे.
अहमदाबाद :- साबरमती आश्रम, अक्षरधाम मंदिर आणि कांकरिया तलाव हे शहरातील मुख्य आकर्षण स्थळे आहेत.भारतातील भारतीय-इस्लामिक वास्तुकलाची आणि हिंदू मुस्लिम आर्टची काही उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
१) साबरमती आश्रम– गुजरात हे महात्मा गांधी यांची जन्मभूमी असलेले राज्य आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी जिथे राहत होते,ती जागा साबरमती आश्रम म्हणून ओळखली जाते.गांधीजींच्या दैनदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू इथे पाहायला मिळतात त्यामध्ये त्यांचा चष्मा,काठी,झोपण्याचा पलंग,कपडे,चरखा इत्यादींचा समावेश आहे.आश्रमाची पूर्ण माहिती देणारी सहल घडवली जाते.सकाळी आठ ते सायंकाळी सात या काळात आश्रमाला भेट देऊ शकता.
२)कांकरिया तलाव : अहमदाबाद मध्ये असलेला कांकरिया तलाव गुजरात मधील सर्वात मोठया तलावापैकी एक आहे.इ.स.१४५१ मध्ये कुतुब-उद-दीन याने या तलावाची निर्मिती केली.तलावाच्या मध्यभागी असलेल्या महालामुळे या तलावाचे सौंदर्य अधिकच खुलून जाते.
वडोदरा/बडोदा:- लक्ष्मी विलास पॅलेससाठी ओळखले जाते.१८९० मध्ये निर्माण केलेल्या या पॅलेस चे काम पूर्ण व्हायला बारा वर्षे लागली. लक्ष्मी विलास पॅलेस महाराज सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांचे खाजगी निवासस्थान होते.त्यावेळेस हे जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान मानले जात असे. या कॉम्प्लेक्समध्ये मोती बाग पॅलेस आणि महाराजा फतेहसिंग संग्रहालय अशा वडोदराच्या अनेक लोकप्रिय इमारती आहेत. लक्ष्मी विलासचा बहुतांश भाग अजूनही शाही निवास म्हणून सेवा करीत आहे, तर त्यातील काही भाग लक्झरी हेरिटेज हॉटेलमध्ये बदलला आहे.
मोधारे सूर्य मंदिर :- कोणार्क सूर्य मंदिर नंतर या मंदिराला महत्व आहे.सर्वात महत्वाचे सूर्य मंदिरे आहेत. सोलंकी वंशवंश शासकांनी 11 व्या शतकात बांधले गेले.
उर्वरित स्थळांची माहिती भाग 2 पाहू....
गुजरात संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
Mast information
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏☺️
हटवाnice
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏☺️
हटवा