द्वारका:- सर्वात पवित्र चार धाम हिंदू तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आणि सर्वात प्राचीन सप्तपुरी धार्मिक शहरांपैकी एक, भगवान कृष्णचे प्राचीन राज्य आणि गुजरातची पहिली राजधानी मानली जाते. कृष्णा जन्माष्टमी उत्सव ही एक प्रमुख उत्सव. जगत मंदिर उंट, चहाच्या स्टॉल आणि शेशल ज्वेलरी साठी प्रसिध्द आहे.मंदिराची वास्तुकला पाहण्यायोग्य आहे. मंदिराशेजारील सुंदर समुद्र किनारा असून इथे बर्याचदा कासव आणि स्टार फिश पाहायला मिळतात.
मरीन नॅशनल पार्क:- 1982 मध्ये हे राष्ट्रीय उद्यान स्थापन केेलं गेेलं.राष्ट्रीय उद्यानात 42 द्वीपांचा समावेश आहे, ज्यापैकी 33 प्रवाळ रीफद्वारे वेढलेले आहेत, आणि विविध समुद्री आणि पक्षी आढळतात. पर्यटकांना केवळ काही बेटांवर भेट देण्याची परवानगी आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते.
जुनागढ:- 19 शतकांच्या शतकातील जुनागड येथील स्थानिक शासक महाबत मकबरा समाधीअतिशय सुंदर आहेत. हे एक ऐतिहािकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. इतर पाहण्यासारखे stepwells आणि बौद्ध रॉक-कट लेणी आहेत.
ब्लॅकबॅक नॅशनल पार्क:- सर्पाकार-शिंगे असलेला भारतीय काळवीट येथे आढळते. भारतातील एकमेव उष्णकटिबंधीय चराऊ कुंपणे आहेत. यामुळे याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आली आहे. हे गवताळ पक्षी पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचे घर आहे. ब्लॅकबॅक लॉज भारताच्या जंगल लॉजपैकी एक असून राहण्यासाठी उत्कृष्ट स्थान आहे
चंपनेर आणि पावागढ :- युनेस्को जागतिक वारसा स्थान, चंपाणर आणि पावागढ हे मुस्लिम आणि हिंदू परंपरेतील ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रीय व पुरातन वास्तुशास्त्रीयदृष्ट्या 8 व्या आणि 14 व्या शताब्दींच्या कालखंडातील आहेत. या उद्यानाला युनेस्कोने २००४ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ठ केले आहे.या उद्यानाची स्थापना चावडा वंशाचे राजा वनराज यांनी केली होती.या उद्याना मध्ये ११ प्रकारच्या इमारती निर्माण केल्या असून मंदिर,मशीद व अन्य इमारतींचा त्यामध्ये समावेश आहे.नागर शैलीमध्ये बांधल्या गेलेल्या या इमारतींची वास्तुकला पाहण्यासारखी आहे.लाल पिवळसर खडकाळ टेकडीवर या उद्यानाची निर्मिती केलेली असून समुद्र सपाटीपासून ८०० मी.उंचीवर आहे.यामध्ये डोंगरी गढी, राजवाडे, उपासनेची जागा (जाम मशिद गुजरातमध्ये सर्वात आकर्षक मशिदी आहे), निवासी क्षेत्रे, जलाशयांचे व पायरी विहिरी आहेत.
Statue of Unity:- केवडिया गावाजवळ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाच्या जवळ तयार करण्यात आला आहे.हा जगातील सर्वात उंच पुतळा असून याची उंची १८२ मीटर(५९७ फुट)आहे.या पुतळ्या मध्ये म्यूझियम,प्रेक्षागृह असून १५३ मीटर उंचीवरील प्रेक्षा गृहातून सरदार सरोवर व आसपास चा परिसर यांचे अत्यंत विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.हे स्थळ वडोदरा शहरापासून १०० कि.मी.अंतरावर तर सुरत पासून १५० कि.मी. अंतरावर आहे.मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावरून केवडिया साठी दररोज रात्री २३.५० वाजता रेल्वे सुटते,जी केवडिया येथे सकाळी ७.२५ ला पोहोचेल व केवडिया येथून दररोज रात्री २१.२५ वाजता रेल्वे सुटते,जी दादर ला पहाटे ५.३० वाजता पोहोचते.यामुळे अगदी कमी वेळात Statue of Unity ला भेट देऊन परत येता येतं.
खाद्य संस्कृती:- हे आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण खाद्यसंस्कृती मुळे ओळखले जाते गुजराती जेवणामध्ये प्रामुख्याने दाल,कढी,भात,चपाती किंवा पुरी,सलाड,लोणचे,पापड व काही गोड पदार्थांचा समावेश असतो.तर ढोकळा,ठेपला,फाफडा,जिलबी,कचोरी,खांडवी,गाठीया, उंधियो हे खाद्यपदार्थ गुजरात मध्ये प्रसिध्द असतात.
कधी जाल:- हिवाळा हा कालावधी योग्य आहे.ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी उत्तम मानला जातो.कारण गुजरात राज्य हे प्रामुख्याने उष्ण व कोरड्या हवामानाचे आहे.उन्हाळ्यात तापमानात खूप वाढ होते,त्यामुळे प्रवास सुखकर होत नाही तर सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्यात पण जाऊ शकतो.
कसे जाल:-
रस्ता:- मुंबई,पुणे,नाशिक,औरंगाबाद,नागपूर,कोल्हापूर या शहरातून गुजरात साठी खाजगी व्होल्वो बस नियमित सेवा देत असतात.
रेल्वे:-अनेक महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन असून सुरत,राजकोट,वडोदरा,अहमदाबाद ही त्यापैकी काही आहेत,वडोदरा हे गुजरातमधील सर्वात व्यस्त रेल्वेस्टेशन असून दिल्ली किंवा मुंबई वरून सुपरफास्ट रेल्वे ने वडोदरा येथे येता येते.
विमान:- अहमदाबाद विमानतळ हा पर्याय आहे.
गुजरात संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
Khup mast ani khup sunder mahiti 👌
उत्तर द्याहटवाThank you 🙏☺️
हटवाnice
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवा