google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : राजस्थान | "पधारो म्हारे देश”

माझी ब्लॉग सूची

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

राजस्थान | "पधारो म्हारे देश”

६)जैसलमेर-सोनेरी शहर म्हणून प्रसिद्ध असलेले शहर पश्चिम भागात आहे.थार वाळवंटामध्ये असलेल्या वाळूच्या टेकड्या,काटेरी झुडुपे, काटेरी वने पाहता येतात.जैसलमेर चा किल्ला,सलीम सिंग कि हवेली, पटवो कि हवेली गदिसर तलाव, बडा बाग ही जैसलमेर शहरातील मुख्य पर्यटन स्थळे आहेत.शहरापासून काही अंतरावर असलेले सेना संग्रहालय,वाळवंटातील उंट सफारी,भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर,लोन्गेवाला पोस्ट ही काही पाहण्यासारखी  ठिकाणे आहेत.
७)बिकानेर- पश्चिम-उत्तरेला असलेले बिकानेर विविध प्रकारच्या मिठाई साठी संपूर्ण भारतभरात प्रसिद्ध आहे. इथून जवळच देश्नोक इथले करणी माता मंदिर प्रसिद्ध आहे.पवित्र मानले गेलेले जवळजवळ पंचवीस हजार उंदीर या मंदिरात वावरत असतात.

८)माउंट अबू-राजस्थान मधील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माउंट अबू समुद्र सपाटीपासून ४००० फुट उंचीवर आहे.थंड हवेच्या ठिकाणा बरोबरच तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.दिलवाडा मंदिर प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे.
९)चितोडगड-चितोडगड हा किल्ला विशालकाय असून या किल्ल्याच्या परिसरात अनेक महाल,हवेली,मंदिरे आहेत.त्यापैकी पद्मिनी महाल,खतान राणी महाल,राव रणमल हवेली, सामुदायिकपणे बलिदान करणाऱ्या राजपूत स्त्रियांचे.जोहारस्थळ,सूर्यकुंड,विजयस्तंभ,जटाशंकर महादेव मंदिर,मीराबाई मंदिर,तुळजाभवानी मंदिर ही काही प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.
१०)रणथंबोर अभयारण्य– भारतातील प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे हे राजस्थान मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.कमी क्षेत्र व जास्त वाघांची संख्या हे वैशिष्ट्य असल्याने या अभयारण्यात वाघाचे दर्शन हमखास होते.वाघांबरोबरच बिबटे,रानडुक्कर,सांबर,चितळ,गवा,नीलगाय हे प्राणी व अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.
योग्य कालावधी – राजस्थान पर्यटनासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा आहे,या काळात हिवाळा असल्याने वातावरणात शीतलता असते.जुलै ते सप्टेंबर हा कालावधीही राजस्थान पर्यटनासाठी उत्तम,या काळात वातावरणात शुष्कता असते व काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते.एप्रिल ते जून हा कालावधी मात्र उष्ण असतो,या काळात राजस्थानला गेलात तर सकाळी व संध्याकाळी पर्यटन करणे व दुपारच्या काळात विश्रांती घेणे गरजेचे ठरते.

वाहतुकीचे पर्याय:- राजस्थान राज्यात सार्वजनिक वाहतूक ,व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे.शहरांतर्गत वाहतुकीसाठी सिटी बस, रिक्षा, टॅक्सी तसेच ओला,उबर असे आधुनिक पर्याय ही उपलब्ध आहे

कसे जाल:- 
रस्ते- दिल्ली,मुंबई,भोपाळ,अहमदाबाद,चंडीगड,इत्यादी शहरातून राजस्थान साठी आराम बस मिळतात.

रेल्वेमार्ग- जयपूर हे राजस्थान मधील मुख्य रेल्वे स्थानकआहे.अजमेर,जोधपुर,उदयपुर,जैसलमेर,बिकानेर ही काही मुख्य रेल्वे स्थानक आहेत. भारतातील सर्व मुख्य शहरांशी जोडलेले आहेत.

विमानमार्ग- जयपूर विमानतळ राजस्थान मधील मुख्य विमानतळ आहे.भारतातील सर्व मुख्य शहरांशी जोडलेले आहे.

राजस्थान संबंधित संपूर्ण पर्यटन ची माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

1 टिप्पणी:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...