३)पुष्कर-अजमेरच्या उत्तरेला १० कि.मी.अंतरावर असलेले पुष्कर हे हिंदू आणि शीख धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे.जगातील एकमेव ब्रम्हा मंदिर इथे आहे.या सरोवराच्या परिसरात अनेक मंदिरे व घाट आहेत. पुष्कर हे उंटांच्या वार्षिक यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.कार्तिक पौर्णिमेपासून सात दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो उंट,घोडे,पाळीव प्राणी यांची खरेदी-विक्री होते. पर्यटकांमध्ये पुष्कर विशेष लोकप्रिय आहे.
४)जोधपुर- ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते. मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. “जोधपुर स्वीट्स”, “जोधपुरी वस्त्रे” भारतभरात प्रसिद्ध आहेत.मेहरान गड चा किल्ला मुख्य आकर्षण असून उंच टेकडीवर असलेला हा किल्ला शहराच्या कोणत्याही भागातून दिसतो.किल्यावरुन जोधपुर शहराचे निळसर दृश्य विलोभनीय दिसते.जसवंत थडा,उमेदभवन ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
५)उदयपुर- सरोवरांचे शहर म्हणून प्रसिद्ध. उदयपुर राजस्थान मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असून देश विदेशातील लाखो पर्यटक दरवर्षी उदयपुर ला भेट देतात.सिटी पॅलेस, लेक पॅलेस यांचे दर्शन अनेक हिंदी चित्रपटातून पाहायला मिळते.जुन्या मोटारींचे संग्रहालय,सहेली योंकी बाडी(बाग),राणा प्रताप बाग, रोप-वे ही काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
उर्वरित माहीत आपण पुढील भागात घेऊया....
Mast mahiti
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा