google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : लडाख | Ladhakh "Buddha Land"

माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

लडाख | Ladhakh "Buddha Land"



लडाखमध्ये हेमिस, शंकर थिकसे, स्पिटूक,चेदे, ट्रापक इ. प्रसिद्ध गुम्पा (गोम्पा बौद्धांची धार्मिक क्षेत्रे-मठ) आहेत. यांशिवाय इतर धर्मीयांच्या मशिदी, गुरुद्वारा आहेत. बुद्धजयंती, पद्मसंभव जयंती, गुस्तर इ. बौद्धांचे धार्मिक दिन श्रद्धेने साजरे होतात. या सर्वांत पिशाच नृत्य हा महत्वाचा समांरभ मानण्यात येतो कारण त्यावेळी स्वतः लामा नृत्य करतात. लडाखमध्ये बोधी, बल्टी, लडाखी या प्रमुख बोली भाषा असून उर्दू, हिंदी आणि तिबेटी भाषाही प्रचलित आहेत. लडाखची अशी खास संस्कृती असून तीत सर्व धर्मीयांत एकात्मता जाणवते



 हिम बिबटे :- जगातील ७००० हिम बिबट्या पैकी २०० पेक्षा जास्त बिबटे लडाख प्रांतात आढळतात.


शांती स्तूप लेह : लेह शहरापासून ५ कि.मी.अंतरावर असलेला शांती स्तूप प्रेक्षणीय व धार्मिक महत्व असलेले ठिकाण आहे.जपानी बौध्द भिख्खू ग्यामयो नाकामुरा यांनी १९९१ साली शांती स्तूपाचे बांधकाम केले.पांढऱ्या रंगाचा व गोल घुमटाकार छत असलेला हा स्तूप खूप सुंदर आहे.


कारगिल युध्द स्मारक: लेह- श्रीनगर महामार्गावर द्रास या शहराजवळ भारतीय सैन्याद्वारा हे युध्द स्मारक उभारण्यात आलेले आहे.१९९९ च्या भारत-पाक कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पवित्र स्मृती या ठिकाणी ज्योतीच्या रुपात सदैव तेवत आहेत.या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात.व शहीद जवानांच्या स्मृतीला अभिवादन करतात.


 रोड ट्रिप:- जगातील सर्वात धाडशी आणि अत्यंत धोकादायक रोड ट्रिप ही फक्त लडाख मध्ये आहे.


सण,उत्सव:- हेमिस आणि लोसार हे उत्सव प्रसिद्ध आहेत. लोक पवित्र ग्रंथांचे पठण करतात किंवा विविध उत्सव साजरे करतात.यांग जप, ठराविक वेळेशिवाय केले जाते. यामध्ये विविध प्रकारचे ड्रम आणि सुमधुर वाद्यानचा वापर केला जातो. धार्मिक मुखवटा नृत्य ही लडाखच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बौद्ध धर्माच्या द्रुकपा परंपरेचे प्रमुख केंद्र हेमिस मठ असून यामार्फत इतर सर्व प्रमुख लडाखी मठांप्रमाणेच वार्षिक मुखवटा घातलेला नृत्य महोत्सव आयोजित केला जातो.

 
खाद्यपदार्थ :- भारतातील सर्वात चविष्ट मोमोस हे फक्त लडाख मध्येच मिळतात.लेह लडाखचा प्रवास करताना तिबेटी आणि लडाखी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येतो.

काय खरेदी कराल:- धातूच्या शिल्पाकृती, पेटिंग्ज आणि पश्मीना शालींसाठी लडाख प्रसिद्ध आहे. तिबेटी कलाकुसरीच्या वस्तू,चांदी व खड्यांचे दागिने,जर्दाळूचे तेल व जाम,पश्मीना शाली आणि उबदार कपडे,गालिचे इत्यादी वस्तू लेह मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.

 राहण्याची सुविधा :- लेह येथे राहण्याची चांगली सुविधा आहेत. अनेक चांगली हॉटेल्स येथे आहेत.

केव्हा जाल : जून ते सप्टेंबर हिवाळ्यातला लडाख पाहायचा असेल तर डिसेंबर ते मार्चमध्ये जाता येईल.

कसे जाल : रेल्वे:- मुंबई - दिल्ली - श्रीनगर-लेह 

विमान:- मुंबई-लेह
  
लडाख संबंधित संपूर्ण पर्यटन ची माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. आणि कमेंट पण करा..

पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...
धन्यवाद!!!!!

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.


३ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...