लडाखमध्ये बौद्ध संस्कृतीचे महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही या थंड वाळवंटी प्रदेशात काही सुंदर मठ पाहण्याची अपेक्षा करू शकता.
पर्यटन हा लडाखच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे कारण दरवर्षी सुमारे 1 लाख पर्यटक भेट देण्यासाठी येतात. या पर्यटकांच्या सुविधा लक्षात घेऊन येथील रहिवासी आपला व्यवसाय करतात.
मठ:- "स्पितुक गुहा” हा टेकडीवर आलेला मठ सर्वात प्रसिद्ध आहे.
नौकायन/ राफ्टिंग :- झंकार आणि इंदू नदीच्या संगमावर नौकायन करता येते.राफ्टिंग करणारे इथे बरेच जण असून मस्त निसर्गाचा आनंद लुटता येईल.
गुरुद्वारा पठार साहिब:- गुरुद्वारा गुरू नानक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बनविला असून तो लेह कारगिल रस्त्यावर २५ किमी अंतरावर आहे.
नुब्रा घाटी :- नुब्रा नदीच्या काठी असलेल्या ह्या घाटीला अनेक पर्यटक येतात.
मोरीरी आणि पंगँग त्सो सरोवर:- या सरोवरा इतकं स्वच्छ पाणी कोणत्याही सरोवरात शोधून मिळणार नाही हे दोन्ही सरोवर इंडिया चीन बॉर्डर वर असून पंगतोंग प्लाटू या ठिकाणी आहेत.चीन व तिबेट च्या सीमारेषेजवळ असल्याने या लेक ला भेट देण्यासाठी लेह शहरातून परवाना काढावा लागतो.
सरोवराचा ५० टक्के भाग तिबेट मध्ये ४० टक्के लडाख मध्ये तर १० टक्के चीन मध्ये येतो.
हेमीस राष्ट्रीय उद्यान :- साऊथ आशिया मधील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे लडाख मध्ये आहे. चित्ते, तिबेटीएन कोल्हे, विविध प्रकारचे पक्षी पाहता येतात.
खारदुंग- ला : जगातील सर्वोच्च मोटार वाह्तुकीयोग्य रस्ता अशी ओळख असलेली खारदुंग-ला ही खिंड सर करणे हे अनेक दुचाकीस्वारांचे स्वप्न असते. नुब्रा खोरे व श्योक खोरे यांना लेह शहराशी जोडणारी ही खिंड वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.समुद्रसपाटीपासून १८३७९ फुट उंची असल्यामुळे सर्वोच्च स्थानी आहे असे वाटते.इथे काही मिनिटेच थांबण्याचा सल्ला दिला जातो,कारण उंचीमुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते व त्यामुळे डोकेदुखी,चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात. खारदुंग-ला या ठिकाणी येण्यासाठी परवाना काढावा लागतो.
राहण्याची सुविधा :- लेह येथे राहण्याची चांगली सुविधा आहेत. अनेक चांगली हॉटेल्स येथे आहेत.
केव्हा जाल : जून ते सप्टेंबर हिवाळ्यातला लडाख पाहायचा असेल तर डिसेंबर ते मार्चमध्ये जाता येईल.
कसे जाल : रेल्वे:- मुंबई - दिल्ली - श्रीनगर-लेह
विमान:- मुंबई-लेह
लडाख संबंधित संपूर्ण पर्यटन ची माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. आणि कमेंट पण करा..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
good
उत्तर द्याहटवाThank you 🙏☺️
हटवा