लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे.ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेच्या कायद्यानुसार लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रशासित प्रदेश झाला.लडाखी ही येथील प्रमुख भाषा आहे.
शेय मॉनस्ट्री :- येथे बुद्धाचा धातूचा पुतळा आहे. लडाखमधील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुतळा आहे. लेहपासून १५ कि.मी. अंतरावर हे ठिकाण असून लडाखचा राजा डेलडान नामग्याल याने १६५५ मध्ये या मठाची स्थापना केली. उन्हाळ्यामध्ये लडाखचा शाही परिवार येथे वास्तव्य करीत असे.चौदाव्या शतकातील बौध्द साहित्य या मोनेस्टरी मध्ये पाहायला मिळते.या राजवाड्याची वास्तुकला व परिसराची सुंदर दृश्ये पाहण्यासारखी आहेत.
स्टोक पॅलेस : लेह शहरापासून १५ कि.मी.अंतरावर असलेला पॅलेस हा राजवाडा नामग्याल राज परिवाराचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.
आशियातील सर्वात मोठी दुर्बीण:- लडाख मधील हंले ह्या दुर्गम गावात अशियातील सर्वात मोठी दुर्बीण आहे. ही दुर्बीण अवकाश प्रेमीचं आकर्षण असून ती ४५०० मीटर उंचीवर ठेवली आहे.
ग्रॅव्हिटी पॉइंट / मॅग्नेटीक हिल :- या ठिकाणी दृष्टीभ्रम होतो.उताराच्या दिशेला गियर विरहीत स्थितीत उभी केलेली मोटार चढावाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. ही घटना पाहण्यासाठी असंख्य पर्यटक या ठिकाणी येतात.
जगातील सर्वात उंच :- सुरू नदी च्या काठावरचा हा ब्रिज जगातला सगळ्यात उंच ब्रिज आहे. भारतीय सेनेने हा पूल युद्ध प्रसंगी वाहतुकी साठी बनविला होता.
पुलाच्या डाव्या बाजूला वीज निर्मिती तलाव असून उजव्या बाजूला सरोवर आहे.
दोन कुबड असलेले उंट :- लडाख मध्येच दोन कुबडाचे उंट पाहायला मिळतील.हे उंट गोबी वाळवंटातले असून ते -४० डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा जिवंत राहू शकतात
सर्वात मोठे बर्फाचे मैदान / चादर ट्रेक :- लडाख मध्ये सगळ्यात मोठे बर्फ़ाचे मैदान असून ते १९७० मध्ये निर्माण केले गेले याचा वापर साधारण हिवाळा सुरू झाल्यावर करतात.या मैदानावर हॉकी तसेच अनेक बर्फावर खेळण्याजोगे खेळ खेळता येतात. हिवाळ्यामध्ये गोठलेल्या झंस्कार नदीच्या पात्रावरून केला जाणारा चादर ट्रेक भारतातील सर्वात प्रसिध्द ट्रेक पैकी एक आहे.सिंधू नदीची उपनदी असलेल्या झंस्कार नदी च्या १०५ कि.मी. अंतरापर्यंत ट्रेक करता येतो.हा ट्रेक आव्हानात्मक आहे.या ट्रेक दरम्यान गोठलेल्या धबधब्यांचे व हिम बिबट्यांचे दर्शन होऊ शकते.जानेवारी ते फेब्रुवारी हा कालावधी चादर ट्रेक करण्यासाठी उत्तम मानला
राहण्याची सुविधा :- लेह येथे राहण्याची चांगली सुविधा आहेत. अनेक चांगली हॉटेल्स येथे आहेत.
केव्हा जाल : जून ते सप्टेंबर हिवाळ्यातला लडाख पाहायचा असेल तर डिसेंबर ते मार्चमध्ये जाता येईल.
कसे जाल : रेल्वे:- मुंबई - दिल्ली - श्रीनगर-लेह
विमान:- मुंबई-लेह
लडाख संबंधित संपूर्ण पर्यटन ची माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. आणि कमेंट पण करा..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा