||श्री हिंगलाज शक्तीपीठ ||
बलुचिस्तान,पाकिस्तान
हिंदू धर्मात दुर्गा देवीची पूजा करणाऱ्या भक्तांसाठी नवरात्रीला खूप महत्त्व आहे. या नवरात्रीमध्ये लोक अनेकदा शक्तीपीठांना भेट देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीची प्रार्थना करतात. हिंदू धर्मानुसार, शक्तीपीठ म्हणजे पवित्र स्थान मानले जाते.
भारताव्यतिरिक्त ही शक्तीपीठे बांगलादेश, पाकिस्तान, चीन, श्रीलंका आणि नेपाळमध्ये पसरलेली आहेत.
भारतासह पाकिस्तानातही शक्तीपीठ अस्तित्वात आहे. पाकमधील हे शक्तीपीठ वैष्णो देवी नावाने प्रसिद्ध आहे. बलुचिस्तानामधील हिंगोल नदीच्या किनारी हिंगलाज देवीचे एक मंदिर असून, देवीच्या ५१ पीठांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. शास्त्रांतील मान्यतेनुसार, देवी सतीचे शीर या ठिकाणी येऊन पडले होते. देवीच्या या मंदिराला हिंगुला आणि नानी मंदिर किंवा नानी हज असेही म्हटले जाते.
हिंगलाज हे पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ आहे. हे मंदिर बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाजच्या टेकड्यांमध्ये आहे. या मंदिरातील नवरात्रीचा उत्सव जवळपास भारतासारखाच आहे. हिंगलाज देवीच्या दर्शनासाठी भारतातून हजारो भाविक दरवर्षी पाकिस्तानला जात असतात. असं म्हटलं जातं की, अमरनाथपेक्षा हिंगलाजचा प्रवास अवघड आहे. या मंदिरातील नवरात्रीचा उत्सव जवळपास भारतासारखाच असतो.
मंदिराचे वैशिष्ट्य:-
हिंगलाज शक्तिपीठाला भेट देण्याऱ्या भाविकांमध्ये हिंदू-मुस्लिम असा भेद केला जात नाही. हे मंदिर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मातील लोकांना पूजनीय आहे. कधी-कधी मंदिरातील पुजारी आणि सेवक मुस्लिम टोप्या घातलेले दिसतात. त्याच वेळी, मातेच्या पूजेच्या वेळी मुस्लिम हिंदू भाविक एकत्र उभे असतात. त्यापैकी बहुतांश भाविक हे बलुचिस्तान-सिंधमधील आहेत. हिंगलाज मंदिराला मुस्लिम ‘नानी बीबी की हज’ किंवा ‘पिरगाह’ मानत असल्याने अफगाणिस्तान, इजिप्त आणि इराणमधील लोकही या पिरगाहला भेट देतात. भारताशिवाय बांगलादेश, अमेरिका आणि ब्रिटनमधूनही हिंगलाज देवीच्या दर्शनाला भाविक येतात. या मंदिराच्या आवारात उभारण्यात आलेली बहुतांश दुकाने मुस्लिम बांधवांची आहेत.
अमरनाथ यात्रेपेक्षा हिंगलाज मंदिरात पोहोचणे अवघड मानले जाते. ज्या काळात वाहने नव्हते त्यावेळी कराचीहून हिंगलाजला जायला ४५ दिवस लागायचे. आजही इथपर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत. वाटेत हजार फूट उंचीपर्यंतचे डोंगर, दूरवर पसरलेले निर्जन वाळवंट, जंगली प्राण्यांनी भरलेले घनदाट जंगल एवढंच नव्हे तर या भागात दहशतवाद्यांचीही भीती आहेचं. एवढा धोकादायक टप्पा पार केल्यावरच देवीचे दर्शन होते.
देवीच्या दर्शनासाठी घ्यावे लागतात दोन संकल्प:-
या मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना दोन संकल्प घ्यावे लागतात. कराचीमार्गे गेल्यास कराचीपासून १२ ते १४ किमी अंतरावर हव नदी आहे. येथूनच हिंगलाज यात्रेला सुरुवात होते. इथेच पहिला संकल्प घ्यावा लागतो. मंदिरात जाऊन परत येईपर्यंत भौतिक सुखापासून संन्यास घ्यावा लागतो. दुसरा संकल्प असा आहे की प्रवासादरम्यान कोणत्याही सहप्रवाशाला आपल्या कुंडातील पाणी द्यायचे नाही. हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी हे दोन्ही संकल्प भाविकांची परीक्षा घेण्यासारखे असतात. जो भाविक हे संकल्प पूर्ण करत नाही त्याचा प्रवास पूर्ण मानला जात नाही.
प्रति वैष्णो देवी मंदिर:-
पाकिस्तानातील या मंदिराला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे मानले जाते. भारतात जसे वैष्णो देवीला महत्त्व आहे. अगदी तसेच महत्त्व पाकमध्ये या हिंगलाज देवीला आहे. देवीच्या मंदिरात गेल्यावर आपण पाकिस्तानात उभे आहोत, याचा आभासही होणार नाही, इतके ते वैष्णो देवीप्रमाणे भासते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस हिंगलाज देवीच्या मंदिरात केवळ पाकिस्तानातून नाही, तर भारत आणि अन्य देशातील भाविकही दर्शन घेण्यासाठी एकत्रितपणे जातात.
गुरुनानक देव, दादा मखान आणि गुरु गोरखनाथ यांनीही या मंदिरात येऊन हिंगलाज देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते.
पौराणिक कथा:-
एकवीस वेळा परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली. काही बचावलेले क्षत्रिय हिंगलाज देवीला शरण गेले. तेव्हा देवीने त्यांना अभय दिले, असे सांगितले जाते. आणखी एका आख्यायिकेनुसार, रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी हिंगलाज देवीचे दर्शन घेतले होते. येथे श्रीरामांनी एक यज्ञही केला होता, अशी लोकमान्याता असल्याचे सांगितले जाते.
धार्मिक मान्यता:-
हिंगलाज देवीच्या चरणी नतमस्तक झालेल्यांना पूर्वजन्माच्या कष्टातून मुक्तता मिळते. एका उंच पर्वतावर असलेल्या एका गुहेत हिंगलाज देवीचा दरबार भरतो. या मंदिर परिसरात कालिका माता, गणपती यांच्याही मूर्ती आहेत. तसेच महादेव शिवशंकर भीमलोचन स्वरुपात येथे प्रतिष्ठित आहेत.
बलुचिस्तानातील मुस्लिम समुदायात या देवीला नानी देवी म्हटले जाते. मुस्लिम समुदायाकडून देवीला लाल वस्त्र, अगरबत्ती, मेणबत्ती, अत्तर अर्पण केले जाते. पाकिस्तानाच्या निर्मितीपूर्वी भारतातील लाखो भाविक या मंदिरात नियमितपणे दर्शन घेण्यासाठी जात असत.
हिंगलाज शक्तीपीठाची वास्तुकला:-
हे मंदिर नैसर्गिक गुहेत कोरलेले आहे त्यामुळे मानवनिर्मित मंदिर नाही.
हिंगलाज देवीची मूर्ती:-
मंदिर एका छोट्या नैसर्गिक गुहेत आहे. कमी मातीची वेदी आहे. ही देवीची मानवनिर्मित प्रतिमा नाही. लहान आकारहीन दगडाची हिंगलाज माता म्हणून पूजा केली जाते. आणि त्या दगडावर सिंदूर (सिंदूर) मढवलेला आहे, ज्यामुळे कदाचित त्या जागेला त्याचे संस्कृत नाव हिंगुळा पडले आहे, जे सध्याचे हिंगलाज नावाचे मूळ आहे. आणि हिंगलाज माता मंदिरात भैरवाची भीमलोचन म्हणून पूजा केली जाते.
मुख्य उत्सव:-
नवरात्र हा हिंगलाज शक्तीपीठाचा मुख्य उत्सव आहे. आणि हिंगलाज यात्रा ही पाकिस्तानातील सर्वात मोठी हिंदू तीर्थक्षेत्र आहे. येथे नवरात्रीच्या काळात 250,000 हून अधिक लोक हिंगलाज यात्रेत सहभागी होतात.
पूजा आणि आरतीच्या वेळ:-
सकाळची वेळ :-
सकाळी 5:00 ते दुपारी 01:00 पर्यंत
संध्याकाळची वेळ:-
दुपारी 3.30 ते रात्री 9.00
**कोणत्याही उत्सवादरम्यान वेळा बदलू शकतात.
आरतीच्या वेळा:-
सकाळची आरती:-
सकाळी 06:15
संध्याकाळची आरती:-
संध्याकाळी 06:15
हिंगलाज आसपासची इतर प्रार्थनास्थळे:-
गणेश, माता काली, गुरुगोरख नाथ दूनी, ब्रह्मा कुळ, तीर कुंड, गुरुनानक खारव, रामजारोखा बेथक, चौरासी पर्वतावरील अनिल कुंड, चंद्र गोप, खारीवर आणि अघोर पूजा.
कसे जाल:-
भारतीयांसाठी सर्व भाविकांना पाकिस्तान दूतावासात व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.व्हिसा मंजूर झाल्यानंतर ट्रेन किंवा विमानाने जाऊ शकता.
विमान सेवा:-
सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ कराची येथे आहे. हिंगलाज शक्तीपीठापासून ते सुमारे 250 किमी अंतरावर आहे.
रेल्वे सेवा:-
समझौता एक्सप्रेस रेल्वे ने पाकिस्तानला जाणारे भारतीय. हिंगलाज शक्तीपीठापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन 250 किमी अंतरावर आहे. मंदिरापर्यंत स्थानिक वाहतुकीने पोहोचता येते.
रस्ता सेवा:-
हिंगलाजला जोडणाऱ्या अनेक बसेस आहेत. स्थानिक आणि खाजगी वाहतूक देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते