||करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी||
कोल्हापूर
कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.
महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले. जेतीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते.
पौराणिक इतिहास:-
पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महलक्ष्मीचा उल्लेख आहे. काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव आहे परंतु करवीरात शिव व महलक्ष्मी दोघांचेही वास्तव्य आहे, असे सांगितले जाते.
ऐतिहासिक इतिहास:-
ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट अशा विविध पुराव्यांवरून या मंदिराच्या नोंदी नवव्या शतकापासून सापडतात (शके ७९३,इ.स. ८७१ ) ठाणे जिल्ह्यात सापडलेला ताम्रपट तसेच गोमंतक प्रदेशात फोंडा येथे सापडलेल्या ताम्रपटात कदंब वंशीय राजा पहिला षष्ठ याने कोल्हापुरात येऊन श्री महलक्ष्मीची उपासना केल्याचा उल्लेख आहे. हा काळ शके ९६० व इ.स. १०३८ असा आहे. या स्थानावर सत्ता असणारा व महलक्ष्मीवर श्रद्धा असणारा राजा म्हणजे शिलाहार राजवंश होय आपल्या राज्यावर महलक्ष्मीचा वरदहस्त आहे असा अभिमान बाळगणाऱ्या या राजाचा प्रभाव करवीरक्षेत्रावर शके ९८०(इ.स. १०५८) पासून शके १११३(इ.स. ११९१)इतका प्रदीर्घ होता याच वंशातील पहिला राजा मारसिंह याचा ताम्रपट मिरज येथे आहे याच वंशातील पहिला राजा मारसिंह यांचा ताम्रपट मिरज येथे आहे यात शिलाहार नृपती ने स्वतःच्या राजवंशाचा उल्लेख करताना "श्री महालक्ष्मी लब्ध वरप्रसादादि "असा उल्लेख केला आहे. मारसिंह,बल्लाळ,गंडरादित्य विजयादित्य व व्दितीय भोज या सर्वच शिलाहार वंशीय राजवंशातील शिलालेख व ताम्रपट करवीरच्या महालक्ष्मीचा साक्षात श्रद्धा भाव आढळून येतो.
देव गिरीच्या यादव वंशातील राजा सिंघन देव याने ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजवंशाची सत्ता हस्तगत केली . इ.स. १२१३ला हा सर्व प्रदेश यादवाच्या सत्तेखाली आला जरी सत्ता बदलली तरी यादव वंशानेही महालक्ष्मीवर अपार श्रद्धा दाखवली होती.
खिद्रापूरच्या अमृतेश्वाराला भरभरून दान देत असतानाच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला ही आपल्या सेवका तर्फे तोरण बांधले अनेक जेष्ठ अभ्यासकांच्या मते हे तोरण म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरासमोरील महाद्वार होय. याची नोंद असणारा शिलालेख महाद्वाराच्या शेजारीच असणाऱ्या जोशीरावांचा गणपती अर्थात उजव्या सोंडेचा गारेचा गणपतीच्या मंदिरातील खांबावर आजही पाहायला मिळतो या प्रकारे अनेक शिलालेख व ताम्रपटावरून मंदिराची प्राचीनता ८ व्या ते ९ व्या शतका पर्यंत नक्कीच घेऊन जाते हे स्पष्ट होते. आत्ताचे मंदिर हे तारका कृती असून या मध्ये
महालक्ष्मी मूर्ती:-
प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली ,महासरस्वती ,गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकारचे मत आहे मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्या वर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे.
महालक्ष्मी मूर्ती उंची २ फुट ९ इंच इतकी आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक (ढाल ) आहे. खालच्या दोन हाता पैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग (म्हाळुग) आहे. श्रीच्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्याचा नाग असून त्याचा फणा समोर आहे या फण्याच्या मागे लिंग व योनी ही प्रकृती तत्त्व व पुरुष तत्त्व यांची यांची प्रतीके आहेत मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. इ.स. १०९ मध्ये कर्णदेव राजा कोकणातून आला त्या वेळी अरण्यातील झाडे झुडपे तोडून ही मूर्ती उजेडात आणली असे म्हटले जाते.
आठव्या शतकात मंदिर भूकंपाने खचले. राजा गंडरदित्य याने मंदिराचा विस्तार केला . त्याने महाकाली मंदिर तर ११७८ ते १२०९ या काळात राजा जयसिंग व राजा सिंघण देव यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वर मंदिर बांधल्याचे म्हटले जाते.
मंदिर वास्तुकला:-
मंदिर हेमाडपंथी असुन ज्या प्रमाणे श्री यंत्राच्या १६ काटकोना तील मध्यभागी सर्वोच्च बिंदू स्थान असते त्याच प्रमाणे श्री महा लक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणेचा मार्ग हा श्री यंत्रा प्रमाणे १६ काटकोनात विभागाला आहे या मार्गाच्या मध्य भागी म्हणजेच सर्वोच्च बिंदू स्थानावर मूर्ती उभी आहे.
महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातुः लिंग असे म्हणतात महा लक्ष्मीच्या मस्तकावर याचे स्थान असून मातृरूपातील हे शिवलिंग असलेने याला अपवादात्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली तरी चालते.
महालक्ष्मीच्या प्रदक्षिणामार्गाप्रमाणे वरच्या मजल्या वरील या शिवलिंगालाही प्रदक्षिणा मार्ग आहे .
महालक्ष्मीचा किरणोत्सव:-
या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात.
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.
१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात.
२. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. ३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.
मंदिरातील पालखी उत्सव सोहळा:-
मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत.
- प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त
- पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते.
- दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.
मंदिरातील महत्वाचे शिलालेख:-
- देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे.
- दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८चा आहे.
- तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे.
- चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.
मंदिरातील महत्वाचे सण:-
शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.
नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे.
इतर प्रसिद्ध पर्यटन स्थळे:-
- जोतिबा
- पन्हाळा
- कणेरी मठ
- बाहुबली
- खिर्द्रापुर
- नृसिंहवाडी
- राधानगरी अभयरण्य इत्यादी.
कालावधी :- वर्षभरात कधीही.
कसे जाल:-
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर महत्त्वाच्या शहरांमधून राज्य परिवहन मंडळाच्या थेट बस आहेत. राज्याची राजधानी मुंबई ते कोल्हापूर हे अंतर बसने ३७६ किमी असून, रेल्वेचा प्रवास ४६५ किमीचा आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून दररोज महालक्ष्मी एक्स्प्रेस सुटते. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुणे-सांगली मार्गे कोल्हापूरला जाते.
विमान:-
येथे विमानतळ असून कोल्हापूर साठी नियमित विमानसेवा उपलब्ध नाही.कोल्हापूर साठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गोवा राज्यातील दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून पुणे विमानतळ कोल्हापूर पासून दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर तर गोवा विमानतळ कोल्हापूर पासून 221 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे:-
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशनआहे. मुंबई नागपुर पुणे तिरुपती या शहरातून कोल्हापूर साठी दररोज रेल्वेसेवा उपलब्ध आहे.स्टेशन वरून परिसरातील सर्व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी टॅक्सी व खाजगी मोटारी सहज मिळतात.
रस्ता मार्ग:-
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून काही तासांमध्ये या शहराला भेट देता येते. तसेच गोवा, बंगळुरू, हैदराबाद, तिरुपती, नागपूर ,औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी ,सातारा, सांगली या शहरातून कोल्हापूर साठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नियमित मिळतात
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा