बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असून कर्नाटक राज्यामध्ये आहे.बांदीपूर नेशनल पार्क हे वाघांच्या संख्येबाबत देशात द्वितीय क्रमांकाचे असून या उद्याना लगतच नागरहोले राष्ट्रीय उद्यान आहे.वनस्पती व प्राणी यांची विविधता हे बांदीपूर अभयारण्याचे वैशिष्ठ्य मानले जाते.
शुष्क पानझडी प्रकारची वनसंपदा असलेल्या या उद्यानात सागवान,चंदन,शिसम इत्यादी वृक्ष व तरस,अस्वल,बिबटे,अजगर असे प्राणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.
इतिहास:
“बांदीपूर राष्ट्रीय उद्यान” हे जवळजवळ १०० वर्षे जुने असून एकेकाळी हे अभयारण्य म्हैसूर संस्थानच्या महाराजांचे खासगी शिकारक्षेत्र होते.म्हैसूर च्या महाराजांनी १९३१ मध्ये ९० वर्ग कि.मी. क्षेत्रामध्ये हे अभयारण्य उभारले व याचे नाव ‘वेणुगोपाल वन्यजीव पार्क’ असे ठेवले.त्यानंतर ‘प्रोजेक्ट टायगर’ या मोहिमे अंतर्गत वेणुगोपाल वन्यजीव पार्क मध्ये ८०० वर्ग कि.मी. क्षेत्र वाढवून याचे नामकरण “बांदीपूर राष्ट्रीय उद्यान” असे केले गेले.
बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाचे स्थान व वैशिष्ठ्य:
बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यामध्ये पसरलेले आहे.कर्नाटक राज्यामध्ये हे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते तर तामिळनाडू मध्ये ‘मधुमलाई नेशनल पार्क'म्हणून ओळखले जाते.
हे पार्क म्हैसूर-उटी महामार्गावर असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या अभयारण्याला भेट देतात.निसर्गप्रेमी,वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि साहसी लोकांची या पार्क ला पसंती असते.या पार्कच्या जवळ अनेक रिसोर्ट व लॉजेस असून ते पर्यटकांसाठी खास जंगल सफारी व साहसी कार्यक्रमांचे आयोजन करतात.
बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे डेक्कन प्लाटू आणि वेस्टर्न घाट यांच्या संगमाजवळ असून या ठिकाणी अनेक पर्वत शिखरे आहेत ज्यांची उंची ६८० मीटर ते १४६८ मीटर च्या दरम्यान आहे.या अभयारण्यामध्ये वनस्पती व प्राणी यांची विविधता आढळते.कबिनी,मोयुर आणि नुगू या नद्या राष्ट्रीय उद्यानाला सदाहरित ठेवण्याचे काम करतात.
बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राणी:
१) . बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या वनस्पती: बांदीपूर नेशनल पार्क मध्ये विविध प्रकारची वृक्षसंपदा असून त्यामध्ये साग,साल,शिसम,धावडा,चंदन इत्यादी वृक्ष आढळतात तर अनेक प्रकारचे लहान वृक्ष, झुडुपे व फळांची आणि फुलांची झाडे पाहायला मिळतात.
२) . बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात आढळणारे प्राणी: बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र अभयारण्य म्हणून ओळखले जात असल्याने इथला प्रमुख प्राणी वाघ हा असून इतर अन्य प्राण्यामध्ये बिबटे,अस्वल,हत्ती,भारतीय अजगर,साळींदर,गवा तसेच किंग कोब्रा,मण्यार,घोणस असे विषारी सर्प व अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी या अभयारण्यात पाहायला मिळतात.
बांदीपूर नेशनल पार्क मधील सफारी:
बांदीपूर नेशनल पार्क हे जंगल सफारीसाठी ओळखले जाते.सफारी राईड हे या उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटक व वन्यप्रेमीचे मुख्य आकर्षण असते.
कोणत्याही राष्ट्रीय अभयारण्यातील वनस्पती मधील विविधता व वन्यप्राण्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी सफारी शिवाय दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही.बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात जिप्सी सफारी,बस सफारी,बोट सफारी आणि हत्ती सफारी असे सफरीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
१) बांदीपूर अभयारण्यातील जिप्सी सफारी :
३००० रुपये ( ६ व्यक्तींसाठी)
वेळ : सकाळी ६.०० ते ९.०० व दुपारी ४.०० ते ६.००
२) बांदीपूर अभयारण्यातील बस सफारी :
३५० रुपये प्रति व्यक्ती
वेळ: सकाळी ६.३० ते ९.०० व दुपारी ३.३० ते ६.००
३) बांदीपूर अभयारण्यातील बोट सफारी :
२००० रुपये ( १५ पर्यटकांसाठी)
वेळ : सकाळी ६.०० ते ९.०० व दुपारी ४.०० ते ६.००
४) बांदीपूर अभयारण्यातील हत्ती सफारी :
५० रुपये प्रति व्यक्ती
वेळ: सकाळी १० ते ११
५) बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाची प्रवेश फी :
250 रुपये प्रति व्यक्ती
बांदीपूर अभयारण्यातील पक्षी निरीक्षण :
पक्षी निरीक्षण ही बांदीपूर अभयारण्यातील प्रमुख बाब असून देश-विदेशातील अनेक पक्षी निरीक्षक या अभयारण्याला भेट देतात.या अभयारण्यात खंड्या,सारस,तितर,बहिरी ससाणा,भारद्वाज,घुबड,गिधाड,चिमणी,कावळा,घार,बया इत्यादी अनेक देशी-विदेशी २०० प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरु होतो.
तसेच या अभयारण्यात अनेक सरपटणारे जीव आढळतात,त्यामध्ये अजगर,कवड्या,धूळनागीण,विरुळा,नाग,राजनाग,मण्यार,घोणस,तस्कर,मलबार चापडा,धामण असे अनेक विषारी व बिनविषारी सापांचे प्रकार या अभयारण्यात दिसून येतात.
बांदीपूर नेशनल पार्क कर्नाटक पर्यटनासाठी खास टिप्स:
बांदीपूर नेशनल पार्क च्या भटकंती साठी ज्यावेळी जाल,त्यावेळी खालील टिप्स जरूर ध्यानात ठेवा.
- गाईड ने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा.
- सफारी वेळी कॅमेरा,दुर्बीण अशा गोष्टी जरूर सोबत ठेवा.
- थोडेफार खाद्यपदार्थ व पुरेसे पाणी सोबत ठेवा.
- गाईडच्या सूचनेशिवाय वाहनातून खाली उतरू नका.
- सफारी वेळी शांत राहा,बोलायचे झाल्यास हलक्या आवाजात बोला.
- मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवा.
- शक्य झाल्यास डोळे मिटून जंगलाचा आवाज ऐका.
बांदीपूर राष्ट्रीय उद्यान भ्रमंती साठी उत्तम कालावधी:
हिवाळ्याचा कालावधी म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी बांदीपूर अभयारण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम असतो.या काळात हवा आल्हाददायी असते.व जंगल हिरवेगार व जलाशय भरलेले असतात.
पावसाळ्यातही अभयारण्य सफारीला जाऊ शकता परंतु पावसामुळे अनेक मार्ग बंद झालेले असतात व वन्यजीव फारसे बाहेर पडत नाहीत.
उन्हाळ्याच्या दिवसात या अभयारण्यातील तापमान ४५ अंशापर्यंत जाते व उन्हाळा त्रासदायी वाटतो.
कुठे राहाल:
बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाजवळ अनेक हॉटेल्स,लॉज व रिसोर्ट असून लो-बजेट ते हाय-बजेट जसे तुमचे बजेट असेल तसे हॉटेल/रिसोर्ट तुम्ही निवडू शकता.तरीही माहिती साठी काही हॉटेल्स ची नावे खालीलप्रमाणे:
- एम.सी.रिसोर्ट चामराजनगर
- बांदीपूर वाईल्डलाईफ रिसोर्ट चामराजनगर
- वनविहार म्हैसूर
- टायगर रींच,मंगला विलेज रोड
- द कंट्री क्लब,मंगला विलेज रोड
कसे जाल:
विमान सेवा:
बांदीपूर साठी थेट विमानसेवा उपलब्ध नाही.बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाला सर्वात जवळचा विमानतळ कोइम्बतुर या ठिकाणी असून जवळजवळ ४८ कि.मी.अंतरावर आहे.कोइम्बतुर साठी भारतातील प्रमुख शहरातून दररोज विमानसेवा उपलब्ध असते.
कोइम्बतुर विमानतळावरून बांदीपूर अभयारण्या साठी बस/कॅब सहज मिळतात.
रेल्वे सेवा:
बांदीपूर राष्ट्रीय उद्याना जवळचे रेल्वेस्टेशन म्हैसूर या ठिकाणी असून ८० कि.मी.अंतरावर आहे.म्हैसूर रेल्वे स्टेशन देशातील प्रमुख शहरांशी लोहमार्गाने जोडले गेले असून आपण रेल्वेने सहजपणे म्हैसूर ला जाऊ शकतो.म्हैसूर रेल्वेस्टेशन जवळून बांदीपूर अभयारण्याबाबत साठी बसेस किंवा मोटारी सहज मिळतात.
रस्ता सेवा:
बांदीपूर अभयारण्य हे रस्ता मार्गाने अतिशय उत्तम प्रकारे जोडले गेले आहे.म्हैसूर,उटी कोइम्बतुर,बंगलोर या शहरातून बांदीपूर साठी राज्य परिवहन व खासगी बसेस सहज मिळतात.किंवा कोइम्बतुर,उटी इत्यादी शहरातून कार रेन्ट वर घेऊनही या अभयारण्याला भेट देऊ शकता.
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.