केरळने त्याच्या विलक्षण नैसर्गिक सौंदर्याचा जणू मुकुटच घातलेला आहे. केरळमधील बॅकवॉटरसाठी असलेल्या अद्वितीय हाउसबोट्स जगभरातील अनेकांसाठी आकर्षणे ठरल्या आहेत.
शहरातील काही लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये अलाप्पुझा बीच, अलाप्पुझा लाइटहाऊस, सेंट मेरी फोरेन चर्च, इंटरनॅशनल कॉयर म्युझियम, कायमकुलम लेक, विजय बीच पार्क इत्यादींचा समावेश आहे.
केरळच्या बॅकवॉटरमध्ये हाउसबोट्स:-
भारतातील सर्वात आकर्षक राज्यातील एक हे त्याच्या योग्यतेप्रमाणेच एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे.
बॅकवॉटर हे त्यामधीलच एक आहे. केरळचे बॅकवॉटर ९०० किमीचा नागमोडी जलमार्ग आहे. ज्यात एकमेकांना जोडल्या गेलेल्या नलिका, नद्या, सरोवर यांचे जाळेच आहे. याच्या मध्यभागी गावे आणि शहरे आहेत जे बॅकवॉटर प्रवासाचा प्रारंभ आणि शेवटचा बिंदू म्हणून सेवा करत आहे.
बॅकवॉटर पर्यावरणातील विलक्षण भाग म्हणजे नद्यांमधून गोड पाणी अरबी समुद्राच्या पात्राशी एकत्र येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा नदीच्या ताज्या पाण्यात शिरकाव होऊ नये म्हणून कुमाराकॉमजवळील वंबनाद कयाल सारख्या काही भागात धरणे बांधलेली आहेत.
या बॅकवॉटरच्या आत आणि बाजूला जलीय जीवनाच्या अनेक प्रजाती आहेत जसे कि मासे, खेकडे, बेडूक, मडस्कीपर आणि पाण्याचे पक्षी जसे की टोकदार चोच आणि काळे-पांढरे पंख असणारा एक सागरी पक्षी टर्न, पानकावळे, लांब बारीक मान व चोच असणारा पाणवठ्याजवळचा एक पक्षी डार्तर, कानढोक पक्षी तसेच पाणमांजर व कासवे असे प्राणी आढळतात. केरळचे बॅकवॉटर शांती, चैतन्य आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ठामपणे ओळखले जाते.
अलेप्पी बॅकवॉटर हाउसबोट:-
बॅकवॉटर विचार करता तेव्हा,मनात येणारे पहिले नाव म्हणजे अलेप्पी बॅकवॉटर, हे लोकप्रियपणे पूर्वेकडील वेनिस म्हणून ओळखले जाते. तसेच बॅकवॉटरसाठी हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. नैसर्गिक तलाव, खारफुटी, आणि गोड्या पाण्यातील नद्या यातून होणारी हाउसबोटची सफर बॅकवॉटर्सचा आनंद घेता येईल.
अस्सल स्थानिक जेवण :-
या संपूर्ण प्रकरणातील उत्तम भाग म्हणजे केरळमधील हाऊसबोटवरील अस्सल स्थानिक जेवण म्हणजे लज्जतदार मासे!
अर्थात,आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार.अल्लपी येथील बॅकवॉटरमध्ये सफर करणे हे केरळधील अवश्य करण्यासारख्या गोष्टींपैकी एक आहे.
केरळमधील होऊसबोट्सचे विभाग आणि प्रकार:-
केरळमधील हाउसबोट इको-फ्रेंडली सामुग्रीने बनलेले आहेत आणि दिवसा प्रवास किंवा रात्री मुक्कामसाठी भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश बोटींवर नारळाच्या पानांपासून बनलेले गवताचे छप्पर आहे. जरी बाह्य स्वरूप नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांपासून बनले असले तरी इथे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा बऱ्याच आधुनिक आहेत जणू काही एखाद्या आरामदायक हॉटेल प्रमाणे.
केरळमधील तीन मुख्य प्रकारचे हाउसबोट्स आहेत:-
१) स्टँडर्ड हाउसबोट्स:
ही मूलभूत नौका आहेत ज्यात फक्त आवश्यक सुविधा आहेत
२) डिलक्स / प्रिमियम हाउसबोट्स:
स्टँडर्ड हाउसबोट्सच्या तुलनेत यामध्ये काही अधिक सुखसोयी आहेत, जसे की रात्री 10 तास वातानुकूलित सेवा आहे
३) लक्झरी / सुपर डिलक्स हाउसबोट्स:
या हाउसबोट्स सर्वात उच्च प्रतीच्या आहेत. इथे २४-तास वातानुकूलन सेवा आणि गणवेशधारी कर्मचारीदेखील आहे
प्रत्येक मनाचा कल आणि वयानुसार सुशोभित केलेल्या केरळमधील या हाउसबोट्सची रचना निसर्ग आणि सौंदर्य यांची आवड लक्षात घेऊनच केली आहे.
अलेप्पी बॅकवॉटर किंमती:-
**महत्वाचे :- सदर चार्ट दार्शनिक आहे.प्रत्यक्ष किंमती कमी जास्त असू शकतात **
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा