काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एक शिंगी गेंडा,जंगली पाणम्हशी व दलदलीत आढळणारी हरणे हे प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.या उद्यानात एकूण ३५ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आढळतात,परंतु त्यातील १५ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.या उद्यानात आढळणाऱ्या अन्य प्राण्यामध्ये हत्ती, गवा, सांबर,रानडुक्कर,कोल्हा,लांडगा,अस्वल तसेच माकडांच्या प्रजाती,इतर लहान प्राणी,रेक्टाक्युलेटेड पायथोन,किंग-कोब्रा अशा विषारी-बिनविषारी सापांच्या प्रजाती.पक्षांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील समृद्ध वनसंपदा इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते.इथल्या हिरव्यागार जंगलात मनाला एक विलक्षण शांती मिळते.काझीरंगा अभयारण्य हे ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल दलदल युक्त प्रदेशात असल्यामुळे वर्षभर विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध असते,त्यामुळे इथले जंगल वर्षभर हिरवेगार असते.इथे प्रामुख्याने तीन प्रकारच्या वनस्पती आढळतात,मोठे गवत,लहान गवत आणि उष्ण कटिबंधीय सदाहरित वने.इथल्या दलदली आढळणारे कमळ व इतर पाण वनस्पती.इथल्या वनाची शोभा वाढवतात.१९८६ मध्ये केल्या गेलेल्या वन सर्वेक्षणा नुसार इथल्या जमिनीवर ४१ टक्के हत्ती गवत,२९ टक्के खुले जंगल,११ टक्के लहान गवत,८ टक्के नदी व इतर जलस्त्रोत व उर्वरित जमीन इतर म्हणून नोंद आहे
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात भेट देणारे पर्यटक जीप सफारी व हत्ती सफारीचा आनंद घेऊ शकतात.या दोन्ही पैकी कोणतीही आपल्या आवडीची सफारी निवडून आपण या उद्यानातील वन्यजीवांचे निरीक्षण करू शकतो
काझीरंगा उद्यानातील जीप सफारी | jeep safari in kaziranga national park.
काझीरंगा उद्यानाला भेट देणारे पर्यटक जीप सफारीचा आनंद घेऊ शकतात.इथल्या दुर्मिळ वन्यजीवांचे निरीक्षण करण्यासाठी जीप सफारी हा उत्तम पर्याय आहे.इथल्या अत्याधुनिक एस.यु.व्ही.जीप मध्ये पर्यटकांच्या संरक्षणासह वन्यजीवांची माहिती देणारे अनुभवी चालक पर्यटकांना जंगल सफारी घडवून आणतात
जीप सफारी ची वेळ :
सकाळी 7.00 a.
सकाळी 9.30 a.
दुपारी 1.30 p.
दुपारी 2.45 p.
जीप सफारीचा कालावधी दोन तास
जीप सफारी चार्जेस-
सफारी झोन किमंत भारतीय पर्यटक किंमत विदेशी पर्यटक वेळ:-
कोहरा (मध्यवर्ती) झोन 3500 rs./ जीप 7500 rs./ जीप दोन तास
बागोरी(पश्चिम) झोन 3500 rs./ जीप 7500 rs./ जीप दोन तास
आगरतोली (पूर्व) झोन 4500 rs./ जीप 8500 rs./ जीप दोन तास.
जीप सफारी सूचना: जीप सफारी शेअरिंग बेसिस वर नाही.एका जीप मध्ये फक्त ६ लोक बसू शकतात.चार वर्षाखालील मुलासाठी कोणताही जादा चार्ज नाही.चार वर्षावरील मुल पूर्ण चार्ज आकारला जातो.
काझीरंगा उद्यानातील हत्ती सफारी | elephant safari in kaziranga national Park
प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी हत्ती सफारी ही अधिक पसंत केली जाते.एका हत्तीवर माहुतासह कमी खर्चाचा व आरामदायी असेल.
हत्ती सफारीची वेळ: सकाळी 5.00 ते 6.00 सकाळी 6.00 ते 7.00
सफारी झोन किमंत
कोहरा (मध्यवर्ती) झोन
भारतीय n/a
परदेशी पर्यटक 3200 rs./प्रति व्यक्ती एक
बागोरी(पश्चिम) झोन
परदेशी पर्यटक 1400 rs./ प्रति व्यक्ती
भारतीय n/a एक
काझीरंगा अभयारण्याला भेट देण्यासाठी योग्य कालावधी| best time to visit kaziranga national park
काझीरंगा अभयारण्य हे दरवर्षी १ मे ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बंद असते.म्हणून आपण काझीरंगा अभयारण्याला नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत भेट देऊ शकता.
उन्हाळा (मार्च ते एप्रिल): या कालावधीत वातावरण उष्ण व हवा कोरडी असते,वारे वाहत असतात.या कालावधीत पाणवठ्यावर व नदीकिनारी वन्यप्राणी पाहू शकता.
पावसाळा (जून ते सप्टेबर): जून ते सप्टेबर या कालावधीत या भागात मुसळधार पाऊस पडत असतो.वातावरणात उष्णता व आर्द्रता असते.ब्रम्हपुत्रा नदीला या काळात वारंवार पूर येतो.म्हणून मे ते ऑक्टोबर या काळात हे उद्यान पर्यटकांसाठी
हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी): काझीरंगा उद्यान पाहण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे.या काळात वातावरण आल्हाददायी व कोरडे असते.या काळात हिरव्यागार गवताळ प्रदेशात व पाणवठ्यावर गेंडा व इतर प्राणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.
काझीरंगा उद्यानात राहण्याची सोय.| hotels and resorts in kaziranga nation
काझीरंगा उद्यानात राहण्यासाठी डोरमेट्री,रेस्ट हाउस,रिसोर्ट अशा सोयी उपलब्ध आहेत.तुमच्या आवडीनुसार व बजेट नुसार योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता.नोव्हेंबर ते फेब्रुवारी या पर्यटन हंगामामध्ये आगाऊ बुकींग करूनच काझीरंगा अभयारण्य पाहण्यासाठी नियोजन केले पाहिजे.इथे “जंगल प्लान” उपलब्ध असतात,त्यामध्ये हॉटेल,जेवण,प्रवेश फी,सफारी फी इत्यादी बाबी सामील असतात.अधिक माहिती साठी या संकेतस्थळा ला भेट द्यावी.
काझीरंगा अभयारण्याला कसे जाल:-
काझीरंगा अभयारण्य पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.भारतातील प्रमुख अभयारण्यापैकी एक असल्याने पर्यटकांसाठी सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध असतात.
विमान सेवा:-
काझीरंगा अभयारण्याला सर्वात जवळ चा विमानतळ ९६ कि.मी अंतरावर जोरहाट इथे असून दिल्ली,कोलकत्ता,गुवाहाटी इथून थेट विमान सेवा जोरहाट साठी उपलब्ध आहे.तसेच गुवाहाटी विमानतळ काझीरंगा पासून २२५ कि.मी.अंतरावर आहे.पूर्वोत्तर भारतातील सर्वात प्रमुख विमानतळ असल्याने देशातील सर्व प्रमुख शहरातून व विदेशातील काही शहरातून गुवाहाटी साठी विमान सेवा उपलब्ध आहे.
रेल्वे सेवा:-
काझीरंगा साठी सर्वात जवळ चे रेल्वे स्टेशन फुकरिंग हे असून ८० कि.मी.अंतरावर आहे.दिमापुर किंवा दिब्रुगढ च्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे या स्थानकात थांबा घेतात.त्याचबरोबर गुवाहाटी रेल्वे स्टेशन हे प्रमुख रेल्वे स्टेशन काझीरंगा पासून २२५ कि.मी. अंतरावर आहे.देशातील प्रमुख शहरातून गुवाहाटी साठी रेल्वे सुटतात
रस्ता मार्ग:-
काझीरंगा हे गुवाहाटी पासून २२५ कि.मी. अंतरावर असून राष्ट्रीय महामार्ग ३७ ने जोडले गेले आहे.या मार्गावर अनेक सार्वजनिक व खाजगी बसेस सुरु असतात.तसेच गुवाहाटी इथून मोटार भाड्याने घेऊनही आपण काझीरंगा अभयारण्य पाहायला जाऊ शकतो
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा