google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : आसाम |Assam

माझी ब्लॉग सूची

बुधवार, २ मार्च, २०२२

आसाम |Assam

 निसर्गाचा आर्शीवाद असणारे आसाम हे राज्य पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श राज्य आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण इतिहास पर्यटकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो.


आसाम हे भारतातील असेच एक राज्य आहे, येथील नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण इतिहास पर्यटकांना वेगळाच आनंद देणारा आहे. पण पर्यटक क्वचितच आसामला भेट देतात.


उमानंद द्विप


 हे देखील आसामची शान आहे. हे सर्वात लहान नदीचे बेट आहे. उमानंद द्विप हे ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले आहे. 


कामदेव भगवान शंकराची तपस्या करताना भस्मसात झाले होते अशी मान्याता आहे.


नामेरी नॅशनल पार्क 

हे आसाम राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे जे हत्ती आणि इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे.


 निसर्ग सौंदर्य वेगळे अनुभवायचे असेल तर प्रत्येकाने एकदा नामेरीला भेट द्यायला हवी.


डिब्रूगढ़ 

हे आसाममधील सर्वात मोठे शहर आहे, गुवाहाटीपासून 439 किमी अंतरावर आहे. या ठिकाणचे सौंदर्य वेगळे आहे. 


हे शहर भारताचे चहाचे शहर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. येथे अनेक सुंदर चहाच्या बागा पाहायला मिळतात.


शिवसागर

 हे आसाममधील अनेक भव्य मंदिरांसह एक सांस्कृतिक शहर आहे. 


शिवसागर आपल्या अनेक स्थापत्य चमत्कारांसह, इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित विविध पर्यटन आकर्षणे लोकांना आकर्षित करते.


गुवाहाटी 

हे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. गुवाहाटीमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची एक रंजक कथा ऐकायला मिळते. गुवाहाटीमध्ये सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय देखील आहे.


काझीरंगा 

काझिरंगाराष्ट्रीय उद्यानात एक शिंगी गेंडा,जंगली पाणम्हशी व दलदलीत आढळणारी हरणे हे प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.


या उद्यानात एकूण ३५ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आढळतात,परंतु त्यातील १५ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.या उद्यानात आढळणाऱ्या अन्य प्राण्यामध्ये हत्ती, गवा, सांबर,रानडुक्कर,कोल्हा,लांडगा,अस्वल तसेच माकडांच्या प्रजाती,इतर लहान प्राणी,रेक्टाक्युलेटेड पायथोन,किंग-कोब्रा अशा विषारी-बिनविषारी सापांच्या प्रजाती.पक्षांच्या अनेक  प्रजाती पाहायला मिळतात.


काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील समृद्ध वनसंपदा इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते.इथल्या हिरव्यागार जंगलात मनाला एक विलक्षण शांती मिळते.काझीरंगा अभयारण्य हे ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल दलदल युक्त  प्रदेशात असल्यामुळे वर्षभर विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध  असते,त्यामुळे इथले जंगल वर्षभर हिरवेगार असते.इथे प्रामुख्याने तीन प्रकारच्या वनस्पती आढळतात,मोठे गवत,लहान गवत आणि उष्ण कटिबंधीय सदाहरित वने.इथल्या दलदली आढळणारे कमळ व इतर पाण वनस्पती.इथल्या वनाची शोभा वाढवतात.१९८६ मध्ये केल्या गेलेल्या वन सर्वेक्षणा नुसार इथल्या जमिनीवर ४१ टक्के हत्ती गवत,२९ टक्के खुले जंगल,११ टक्के लहान गवत,८ टक्के नदी व इतर जलस्त्रोत व उर्वरित जमीन इतर म्हणून नोंद आहे


जोरहाट

आसामधील जोरहाट इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने भरभरुन आहे.


 हे आशियातील पहिले आणि जगातील तिसरे सर्वात जुने शहर आहे.


हाजो


गुवाहाटीपासून ६० किमी ‘हाजो’ इथे विष्णू महादेव मंदिर असून ते चढावावर आहे.


 तलावात पाय धुवूनच पुढे ७०-८० पायऱ्या चढून वर जावं लागतं. मंदिर पूर्ण दगडी असून आत कृष्णाच्या पाच वेगवेगळ्या मूर्ती आहेत. ह्याला मंदिराला आसामचं खजुराहो म्हणतात.


सौलकुची


गुवाहाटीपासून जेमतेम ४० किमीवर ‘सौलकुची’ नावाचं महिला पर्यटकांना आकर्षित करणारं ठिकाण आहे. ‘मोगा सिल्क’ उत्पादनासाठी तो प्रसिद्ध आहे. मेखला व साडी हे रेशमाचे दोन प्रकार तेथे मिळतात. ‘मोगा’ नावाचा रेशमी किडा तेथे विकसित केला जातो. त्यापासून रेशीम काढले जाते.

आसाम मध्ये पर्यटनाबरोबर लुटा खरेदीची मजा

कारण येथे तुम्ही पर्यटनाचा आनंद मनमुराद लुटू शकालच पण येथील बाजारात खरेदीची मजाही अनुभवू शकाल. मुळात चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले हे राज्य. इथला चहा देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध. त्यामुळे सर्वप्रथम येथील चहाचे मळे पहा. काही ठिकाणी चहा विक्रीसाठी तयार होण्यापूर्वी त्यावर काय प्रक्रिया केल्या जातात, चहाची गुणवत्ता कशी ओळखायची हेही पाहायला मिळते. आसाम मधली पहिली खरेदी तुम्ही चहाची करू शकता. जालान टी मार्केट मध्ये विविध प्रकारचा चहा मिळू शकतो.


माटी सेंटर 

हा गोहाटी मधील खास शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेला भाग. येथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. त्यातून तुम्ही तुमच्या आवडीच्या निवडू शकता. हे सेंटर पतीपत्नी चालवितात. त्यात ईशान्येकडील राज्यातील एनजीओ स्थानिक कलाकारांकडून बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी आणतात. स्थानिक हँडीक्राफ्ट साठी येथे आवर्जून भेट द्याच.

सिल्कालय मध्ये नावाप्रमाणे सिल्कच्या अनेक वस्तू म्हणजे साड्या, कपडे, पर्सेस मिळतात. आसामची सिल्कसाठी वेगळी ओळख आहे. येथे मुंगा, पॅट, इरी आणि मलबेरी असे विविध प्रकारचे सिल्क मिळते. खास विणलेल्या आसामी सिल्क साड्या तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील.

एनइडीएफआय हाट ही स्थानिक संस्थांनी चालविलेली संस्था. येथे प्रामुख्याने स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी असतात. बांबू पासून बनविलेल्या टोप्यापासून फर्निचरपर्यंत तसेच लाकडी सामान, धातूंच्या विविध वस्तू, मूर्ती, भांडी, शोभेच्या वस्तू जेथे जश्या मिळतात तश्या अन्यत्र मिळणे कठीण, तेव्हा येथेही खरेदी कराच. 


कसे जाल:-

नॉर्थ-ईस्ट भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुवाहाटी हे शहर देशभरातील सर्व प्रमुख शहरांशी दळणवळणाच्या सोयींनी जोडले आहे.

विमान सेवा:-

कामाख्या मंदिरापासून जवळच १३ कि.मी.अंतरावर गुवाहाटी चा गोपीनाथ बोरडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देश-विदेशातील प्रमुख शहरांशी नियमित विमानसेवेने जोडला गेला आहे.मुंबई,पुणे,नागपूर येथून गुवाहाटी साठी नियमित विमानसेवा उपलब्ध असते.विमानतळावरून गुवाहाटी सिटी सेंटर साठी वातानुकुलीत बस सेवा तसेच कॅब उपलब्ध असतात.


रेल्वे सेवा:-

  गुवाहाटी किंवा दिब्रुगड रेल्वे स्टेशन.

रस्तामार्ग सेवा:-

गुवाहाटी हे शहर रस्ता मार्गाने देशातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे.आसाम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आसपासच्या राज्यांना नियमित सेवा देतात.अदबारी,पलटण बाजार किंवा ISBT बस डेपो इथून बस सेवा.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 


आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...