google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : वृंदावन | Vrindavan/ Brij

माझी ब्लॉग सूची

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

वृंदावन | Vrindavan/ Brij


वृंदावन, बृदावन वा ब्रज म्हणून ओळखले जाते.भारतातील राज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थान आहे. ब्रज भूमी (व्रजमंडल) प्रदेशात आहे आणि हिंदू धर्मानुसार ,भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपणाचे दिवस येथे घालवले.

हे शहर आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच -४४ ), यमुना नदीच्या तीरावर कृष्णाचे जन्मस्थान , सुमारे ११-१२कि.मी. अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेत आहे.या शहरात राधा आणि कृष्ण यांची पूजा करण्यासाठी समर्पित अनेक मंदिरे आहेत.

एक शहर असून कृष्णाचे बाललीला स्थळ असल्याचे मानले जाते.


श्रीकृष्णाच्या रासस्थळामुळे व्रजमंडलातील सर्व वनांत वृंदावन श्रेष्ठ मानले गेले आहे. वृंदावनात शेकडो मंदिरे, अनेक साधूंच्या समाध्या व इतरही पवित्र स्थळे आहेत. येथील कालियाडोह, वंशीवट, रासचबुतरा, केसीघाट, राधाबावडी, दावानलकुंड, ब्रह्मकुंड व धीरसमीरघाट ही स्थळे विशेष प्रसिध्द आहेत. ब्रह्मकुंड व गोविंदकुंड हे नैसर्गिक तलाव असून १८५७ मध्ये ते बांधून काढण्यात आले. 

वृंदावनच्या परिसरात मोर व माकडे आढळतात. केवरबन हा तिसरा तलाव मदनमोहन मंदिराजवळ आहे. त्याच्या जवळच दावानल बेहरी हे छोटेसे मंदिर आहे. सोळाव्या शतकात अनेक भाविक लोक येथे येऊन स्थायिक झाले. त्यांनी गोविंददेव, मदनमोहन, गोपीनाथ व जुगलकिशोर ही चार मंदिरे बांधली.

वृंदावन उत्तर प्रदेश मधील दर्शनीय स्थळे

गोविंद देव मंदिर |Govind dev Temple


गोविंददेव हे येथील सर्वांत जूने (१५९०) व वैभवशाली मंदिर असून अकबराच्या कारकीर्दीत अंबरचा (जयपूरजवळ) राजा मानसिंग यांनी हे बांधून घेतले. याच्यावरील कोरीव काम व खोदकाम अतिशय सुंदर आहे. तांबड्या वालुकाश्मात बांधलेल्या या पिरॅमिडसदृश मंदिरातील गोविंदजीची जुनी मूर्ती जयपूरला हलविण्यात आली आहे. वृंदावनमधील हे मंदिर मथुरेच्या व्यापारीवर्गाने दक्षिणेतील श्रीरंगम्‌ येथील मंदिराच्या धर्तीवर उभारले आहे


इस्कॉन मंदिर | Iskon Temple


भक्तिवेदान्त प्रभुपाद (१८९६–१९७७) यांनी स्थापन केलेल्या इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) या संस्थेचे वृंदावन हे भारतातील प्रमुख केंद्र आहे. संस्थेने बांधलेले संगमवरी श्रीकृष्ण मंदिर, बिर्लांनी बांधलेले गीता मंदिर, प्रभुपाद यांच्या स्मरणार्थ बांधलेले कृष्ण-बलराम मंदिर इत्यादी येथील प्रसिध्द मंदिरे आहेत.


बांके बिहारी मन्दिर | Banke Bihari Temple


वृन्दावन मधील दर्शनीय मन्दिर श्री बांके बिहारी आहे. स्वामी हरिदास निर्मित हे  मन्दिर अति प्राचीन आहे. मन्दिर स्थापित श्री विग्रह निधिवन मधून प्रकट होऊन स्वामी हरिदास ने येथे स्थापित केले. श्री बिहारी चरण दर्शन केवळ अक्षय तृतीया दिवशी   आणि श्रावण महिन्यात  हिंडोले दर्शन होते.


रंग जी  मन्दिर |Shri Rang Ji Temple


रंग जी मन्दिर दक्षिण भारतीय स्थापत्य कलेचा अद्भूत नमूना आहे. हे मन्दिर भव्य असून मन्दिर प्रांगणात उभ्या 6 फुट सोन्याच्या खांभा साठी प्रसिद्ध आहे.रंग जी मन्दिर रथ उत्सव, बैकुंठ उत्सव तथा जन्माष्टमी उत्सव पाहण्यासारखा असतो.

मद्रास मधील रंग नाथ मन्दिर ची प्रतिकृती मानली जाते.


निधिवन|Nidhivan


आजही वृंदावनात दररोज रात्री श्रीकृष्ण येतो आणि रासलीला करतो असं मानलं जातं. वृंदावनातल्या “निधीवन”मध्ये श्रीकृष्णाची रासलीला रोज होते असं म्हणतात.

दररोज रात्री सात वाजता निधीवनातल्या मंदिरात आरती होते आणि त्यानंतर तो परिसर बंद केला जातो. मंदिरात असलेले पुजारी, भक्त आणि इतरही लोक मंदिर सोडून जातात. अगदी असं मानलं जातं की दिवसभर दिसणारे पशुपक्षी, प्राणी देखील रात्री सात नंतर त्या परिसरात फिरकत नाहीत.

निधीवनाच्या परिसरामध्ये एक राजवाडा आहे, ज्याला रंगमहल म्हटलं जातं. तिथल्या एका खोलीमध्ये चंदनाचा पलंग ठेवलेला आहे. रोज रात्री श्रीकृष्ण रासलीला केल्यावर त्या पलंगावर विश्रांती घेतात असं मानलं जातं.

दररोज रात्री तो परिसर बंद व्हायच्या आधी त्या खोलीतील पलंगावर नवीन आच्छादन घातलं जातं. शेजारी पाण्याने भरलेला तांब्या ठेवला जातो. प्रसाद म्हणून लोणी साखर ठेवलं जातं. खायच्या पानाचा विडा ठेवला जातो. तसंच दात घासण्यासाठी कडूलिंबाची काडी ठेवली जाते.

असं मानलं जातं की रात्री ही झाडं गोपिका बनतात, आणि रासलीलेमध्ये सहभागी होतात. पहाट होते आणि सूर्य उगवायच्या आत परत त्यांचे रूपांतर झाडात होतं. (असंही म्हणलं म्हणलं जातं की निधीवनात १६ हजार झाडे आहेत आणि ही झाडे म्हणजेच श्रीकृष्णाच्या 16000 पत्नी.)

श्रीकृष्ण दररोज येतो की नाही हे कदाचित तिथे असलेल्या कडक नियमांमुळे कधीच कळणार नाही. पण आयुष्यात एकदा तरी वृंदावनाला, निधीवनाला भेट द्यायला हवी, तिथल्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.


राधा दामोदर मंदिर | Radha Damodar Temple


प्राचीन श्रीराधा दामोदर मंदिर वृंदावन मध्ये आहे. याच्या चार परिक्रमा केल्यावर गिरिराज गोवर्धन  परिक्रमा चे फळ मिळते.साडे चारशे वर्ष जुन्या मंदिर परिक्रमा केल्यावर यात विराजमान गिरिराज शिळे ची स्वतः परिक्रमा होते.एक किलोमीटरच्या चार परिक्रमा केल्यावर श्रध्दाळू गिरिराज गोवर्धनच्या सात कोस (25 किलोमीटर) लांब परिक्रमेचे पुण्य अर्जित करतात.


शाह जी मन्दिर | Shahji Temple


यमुना घाटावरील शाह जी मन्दिर संगमरवर खांबा साठी प्रसिद्ध आहे. याचे खरे नाव ललित कुंज आहे. बसंत पंचमी ला येथे खूप मोठी यात्रा भरते.

सेवा कुंज | Seva Kunj

सेवा कुंजला निकुंजवन सुद्धा म्हटले जाते. येथे ताल आणि कदम्ब ची झाडे आहेत. कोपऱ्यात एक छोट  मन्दिर आहे. आख्यायिका सांगितली जाते की रात्रि येथे राधा आणि भगवान श्रीकृष्ण विहार करतात. येथे रात्रि राहणे वर्ज्य आहे. संध्याकाळी मन्दिरातील सर्व  जीव जन्तु स्वत: निघून जातात.


मदन मोहन मन्दिर | Madan Mohan Temple


श्रीकृष्ण भगवानच्या  अनेक नावापैकी एक प्रिय नाम मदनमोहनहे नाव आहे. याच नावाचे मंदिर मथुरा जिह्यातील  वृंदावन धाम मध्ये विद्यमान आहे. 


वंशी चोर राधा रानी मंदिर| Bansi Chor

 Radha Rani Mandir


निधि वन मधेच  वंशी चोर राधा रानी  मंदिर आहे. येथील महंत सांगतात की जेव्हा राधालावाटू लागले की कन्हैया सर्व वेळ बासरी वाजवत असतात आणि त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत तेंव्हा त्यांनी बासरी चोरून येथे लपवली. याच मंदिरात कृष्णाचीसर्वात प्रिय गोपी ललिता ची मूर्ति राधा बरोबर आहे.


भगवान कृष्णाचं जन्मस्थान असल्याने वृंदावन लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही धार्मिक वृत्तीचे असाल तर कुंटुबासोबत जाण्यासाठी हे ठिकाणी अगदी छान आहे. अगदी स्वस्तात ट्रस्टच्या रूम्स मिळू शकतात. या ठिकाणी प्रार्थना आणि नामस्मरणामुळे तुम्हाला नेहमीच्या धावपळीतून दूर मन शांत करणारा अनुभव मिळू शकतो. इथली विलक्षण शांतता आणि अध्यात्मिक वातावरण तुम्हाला नक्कीच भारावून टाकेल.

 कसे जाल:-

विमान सेवा:- खेरिया,आग्रा (53 km), दिल्ली, कोलकाता, वाराणसी, मुंबई 

इंटरनॅशनल विमान सेवा :- दिल्ली, न्यू दिल्ली (128 km) 

बस सेवा: -

मथुरा 10 km. भरतपूर  45 km.  

रेल्वे सेवा:-

मथुरा जंक्शन, वृंदावन रेल्वे स्टेशन.

कधी जाल :- वर्षभर कधीही.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

अस्वीकरण (Disclaimer ): 


आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...