google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : सारनाथ | Sarnath

माझी ब्लॉग सूची

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

सारनाथ | Sarnath

सारनाथ हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. सारनाथ उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यात वाराणसी शहरापासून १३ किमी अंतरावर गंगा व गोमती नदींच्या संगमावर स्थित आहे. सारनाथ येथे भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचे प्रशिक्षण दिले होते असे मानण्यात येते. सारनाथ, बोधगया, लुंबिनी व कुशीनगर ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.


जगातील प्राचीन धर्मा पैकी एक म्हणून बौद्धधर्म ओळखला जातो जगभरातील 40 करोड पेक्षा जास्त अनुयायी या धर्माचे अनुसरण करतात परंतु फारच कमी लोकांना ही माहीत आहे की गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ येथील बोधी वृक्षाच्या खाली बसून दिले होते.


पूर्वी हे वन हरणांसाठी ओळखले जात होते,तसेच या ठिकाणी सारंग नाथ या देवाचे मंदिर होते या नावावरूनच सारनाथ हे नाव रूढ झाले. बौद्ध धर्माच्या बरोबरच सारनाथ हे स्थळ जैन धर्मा साठी ही महत्त्वाचे आहे कारण जैन धर्माचे अकरावे तीर्थंकर श्रेयांशनाथ यांचा जन्म सारनाथ या ठिकाणी झाला होता म्हणजेच सारनाथ हे स्थळ बौद्ध हिंदू आणि जैन या तिन्ही धर्मियांसाठी पवित्र मानले जाते


सारनाथच्या इतिहासामध्ये डोकावले असता असे दिसते की सारनाथ चा इतिहास इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापर्यंत खूप घडामोडींनी भरलेला होता.सारनाथची खरी ओळख सम्राट अशोक यांनी केली त्यांनी या स्थळाचे महत्त्व ओळखून या ठिकाणी विशालकाय स्तुपांची निर्मिती केली.


दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत अनेक विदेशी आक्रमणांमुळे सारनाथ व परिसराचे खूप नुकसान झाले अनेक ऐतिहासिक वास्तू या काळात उध्वस्त केल्या गेल्या. सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे धर्मराज स्तूप, धमेक स्तूप तसेच सिंह स्तंभाचे कार्य हाती घेतले व पूर्ण केले परंतु सम्राट अशोकाच्या उत्तराधिकार यांनी या स्थळाकडे फारसे लक्ष न दिल्याने पुन्हा हे स्थळ दुर्लक्षित बनले ज्यावेळी संपूर्ण उत्तर भारतात कुशाण सम्राटांनी राज्यकारभार विस्तारला, त्यावेळी बौद्ध धर्माची पुन्हा उन्नती झाली.


कनिष्क राजा च्या कार्यकाळात सारनाथ येथे बोधिसत्व प्रतिमा स्थापन केली गेली. राजा कनिष्कने आपल्या कार्यकाळात फक्त सारनाथ येथेच नाही तर भारताच्या वेगवेगळ्या भागात खूप विहार आणि स्तुपांची निर्मिती केली. असे मानले जाते की सारनाथ हे बौद्धधर्माच्या प्रचारात पूर्वी एक उपासना केंद्र होते. सारनाथ हे वन्यजीवन युक्त असल्याने याठिकाणी अनेक ऋषीमुनी वास्तव्याला होते व त्यांचे आश्रम ठीक ठिकाणी होते. गुप्त काळामध्ये सारनाथ चा इतिहास अत्यंत गौरवशाली होता. त्यावेळी उत्तर भारतातील कलेचे केंद्र म्हणून सारनाथ ओळखले जात होते.


सम्राट हर्षवर्धन च्या काळात ह्युएनत्संग हा चिनी प्रवासी भारतात आला. त्यावेळी त्याने सारनाथ चे वर्णन करताना लिहिले आहे की, सारनाथ हे अत्यंत संपन्न व सुखी स्थळ आहे. सम्राट हर्षवर्धन च्या नंतर अनेक वर्षे सारनाथ व परिसरावर विविध सम्राटांनी शासन केले परंतु त्याचे पुरावे उपलब्ध होत नाहीत.ज्यावेळी मोहम्मद गजनी याने भारतामध्ये आक्रमण केले त्यावेळी सारनाथ प्रचंड नुकसान झाले


चौखंडी स्तूप |Choukhandi Stupa


उत्तर प्रदेश मधील सर्वात पवित्र स्तूप मानला जातो तसेच पर्यटकांद्वारा सर्वात जास्त भेट दिला जाणारा स्तूप म्हणून चौखंडी स्तूप ओळखला जातो. हा स्तूप बौद्ध धर्म मधील प्रमुख स्मारका पैकी एक मानला जातो. या स्तुपाची निर्मिती अशा ठिकाणी केली गेली, जिथे भगवान बुद्ध यांची भेट आपल्या 5 अनुयायांची झाली होती याच पाच अनुयायांच्या द्वारे बुद्धांनी आपली पहिली प्रचाराची मोहीम राबवली. या चार प्रमुख घटनेचे स्मरण म्हणून हा स्तूप निर्माण केला गेला बौद्ध धर्मामध्ये या स्तूपाचे खूप महत्त्व आहे अत्यंत भव्य आणि दिव्य असा हा स्तूप पाहिल्यानंतर पर्यटकांना शांती व समाधानाची प्राप्ती होते.


अशोक स्तंभ सारनाथ | Ashoka pillar Sarnath


सारनाथ येथील अशोक स्तंभ हा सम्राट अशोकाच्या सारनाथ भेटीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. तसेच हा अशोक स्तंभ भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. दगडा पासून तयार केलेला हा स्तंभ एक उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असून ज्यावर चार सिंह कोरण्यात आले आहेत हा स्तंभ 50 मीटर उंच असून सम्राट अशोक यांच्याद्वारे बौद्ध धर्मासाठी दिलेली एक भेट म्हणून ओळखला जातो. या स्तंभाच्या परिसरात अनेक बौद्ध भिकू ध्यानधारणा करताना दिसून येतात.


अशोक स्तंभा चा परिसर हिरव्यागार हिरवळीने नटलेला आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटकांना खूप आवडतो या स्तंभाच्या परिसरात भारतातील सर्वात प्राचीन पुरातत्वीय संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. या परिसरातील धमेक स्तूप बौद्ध धर्मीय लोकांसाठी खूप पवित्र मानला जातो कारण याच ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिल्यांदा आपल्या अनुयायांसह समोर विचार मांडले होते.

थाई मंदिर सारनाथ| Thai temple Sarnath 


 सारनाथ येथील थाई मंदिर हे प्रमुख आकर्षण स्थळांपैकी एक असून या मंदिराची वास्तू कला व शिल्पकला अत्यंत प्रेक्षणीय आहे या मंदिराच्या परिसरात सुंदर बगीचा याची निर्मिती केली असून सारनाथ येथे आलेले पर्यटक आणि तीर्थयात्री मंदिराच्या शांत वातावरणात वेळ घालवणे पसंत करतात.


तिबेटी मंदिर सारनाथ | Tibetian temple Sarnath.


 सारनाथ येथील तिबेटी मंदिर हे ही प्रमुख तीर्थस्थळ असून याठिकाणी तिबेटी बौद्ध धर्मीय संस्कृतीचे दर्शन घडते. या मंदिरामध्ये शाक्यमुनि बुद्ध यांची मूर्ती पाहायला मिळते.सारनाथ येथील तिबेटी मंदिराला भेट देण्यासाठी थायलँड तिबेट चीन आणि जपान येथील तीर्थयात्री मोठ्या संख्येने येतात.

सारनाथ येथील पुरातत्व संग्रहालय:Sarnath Archaeological Museum.


 इसवी सन 1910 मध्ये सारनाथ येथे पुरातत्वीय संग्रहालयाची स्थापना करण्यात आली या संग्रहालयामध्ये इसवी सनापूर्वी पासून ते बाराव्या शतकापर्यंत च्या अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित केल्या आहेत भारताच्या प्राचीन संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी सारनाथ येथील पुरातत्वीय संग्रहालयाला खूप पर्यटक भेट देतात.


धमेक स्तूप सारनाथ | Dhamek Stupa Sarnath.


 सारनाथ येथील द मिक्स तोफा दंडगोलाकार तू पासून याचा व्यास 28.5 35 मीटर व उंची 39.0 एक मीटर पासून हा स्तूप सुंदर सुंदर नक्षीकामाने घडवण्यात आला आहे त्यामध्ये अनेक आकृती असून वनस्पती व फुलं करण्यात आले आहेत यास तुपाची सुरुवात सम्राट अशोक यांच्या काळात झाली वहा स्तूप कुशान काळात विस्तारला गेला व याचे पूर्णत्व गुप्त काळात झाले बौद्ध धर्माचे अनेक संदेश या स्तूपावर कोरण्यात आली आहेत धर्मिक या शब्दाचा संस्कृत अर्थ धर्मोपदेशक असा होतो.

जपानी बुद्ध मंदिर|Japanese Temple


बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म व ज्ञान आणि मोक्ष हे मोठ्या उत्सव रूपात साजरे केले जातात. हा सण पौर्णिमेच्या रात्री साजरा केला जातो याला बौद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. सारनाथ इथे या पवित्र उत्सवा वेळी गोरगरीब लोकांसाठी मोफत चिकित्सा शिबिर आयोजित केले जाते. त्याच बरोबर दिवसभर विविध प्रार्थना साजऱ्या केल्या जातात.


सायंकाळच्या वेळी बोधिवृक्ष व इतर महत्त्वाच्या ठिकाणी दीप प्रज्वलन केले जाते व भक्तांच्या द्वारे गौतम बुद्ध यांची मूर्ती पाण्याने भरलेल्या व फुलांच्या पाकळ्यानी सजवलेल्या पाण्याच्या छोट्या बेसिन मध्ये ठेवली जाते. या दिवशी इथे अनेक भजने सादर केली जातात व अनेक प्रकारचे शाकाहारी पदार्थ भाविकांसाठी तयार केले जातात बुद्ध पौर्णिमेचा उत्सव सारनाथ येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातील अनेक भाविक येतात. तसेच विदेशातूनही बौद्ध धर्माचे अनुयायी सारनाथ येथे बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी येतात.

सारनाथ पर्यटनाचा सर्वात चांगला कालावधी |Best time to visit Sarnath.

 ऑक्टोबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये या ठिकाणी अत्यंत उष्णता असते,तर जुलै ते सप्टेंबर हा कालावधी मान्सून चा असतो. सारनाथ येथील सर्वात मुख्य उत्सव बुद्ध पौर्णिमा असतो. जो मे महीन्यात साजरा होतो. 


कसे जावे? How to reach Sarnath.

 उत्तर प्रदेश राज्यातील सारनाथ हे पवित्र तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश-विदेशातून अनेक अनुयायी व पर्यटक येतात सारनाथ येथे येण्यासाठी हवाई मार्ग,रेल्वे किंवा रस्ता मार्ग यापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर पर्यटक करू शकतात.


 विमानाने सारनाथ ला कसे जावे?

 सारनाथसाठी सर्वात जवळचा विमानतळ वाराणसी या शहरात असून सारनाथ येथून 25 किलोमीटर अंतरावर आहे. वाराणसी विमानतळ देशाच्या सर्व प्रमुख शहरांशी नियमित विमान सेवेने जोडला आहे महाराष्ट्रातून मुंबई,नागपूर येथून वाराणसी साठी विमानसेवा उपलब्ध असते वाराणसी विमानतळावरून सारनाथ साठी बस टॅक्सी यांची सेवा उपलब्ध आहे.


 रेल्वेने सारनाथ ला कसे जावे?


 सारनाथ येथे रेल्वे स्टेशन असून भारतातील प्रमुख शहरातुन या ठिकाणी रेल्वे येतात जसे की मुंबई नागपूर दिल्ली भोपाळ या शहरातून सारनाथ ला जाण्यासाठी रेल्वे चा वापर केला जाऊ शकतो.मुंबई येथून वाराणसी साठी दररोज पाच रेल्वे सुटतात. सारनाथ रेल्वे स्टेशन वरून शहरातील तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी भाड्याने घेता येते


बस ने सारनाथ ला कसे जावे?


सारनाथ हे उत्तर प्रदेश मधील प्रमुख तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असल्याने इथे रस्ते वाहतूक सुविधा अत्यंत चांगल्या दर्जाची आहे उत्तर प्रदेश मधील प्रमुख शहरातून सारनाथचा जाण्यासाठी नियमित बस सेवा उपलब्ध असते तसेच वाराणसी येथून सारनाथ साठी खूप बसेस उपलब्ध होतात किंवा वाराणसी येथून सारनाथ पर्यटनासाठी रिक्षा किंवा टॅक्सी बुक करता येते.

हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...