google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : अष्टविनायक | Maharashtra "Unlimited"

माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

अष्टविनायक | Maharashtra "Unlimited"


स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..

आज आपण या लेखामध्ये अष्टविनायक दर्शन याबद्दल माहिती घेणार आहोत. 

 अष्टविनायक दर्शन.


पहिला गणपती - मोरगावचा श्री मयुरेश्वर

मोरगांव हे पुण्याच्या आग्नेय (दक्षिणपूर्व) दिशेला स्थित आहे. ते पुण्याहून सासवड-जेजुरी मार्गे केवळ दोन तासांच्या अंतरावर आहे. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगांव येथील श्री मयूरेश्वराच्या दर्शनाने केला जातो.

दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर

पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमॅॅजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.

चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक

पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे.

पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी

थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे.

सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर

हे देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. आणि पुन्हा मोरगांवच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेण्याने अष्टविनायक यात्रा संपन्न होते.

कसे जाल:-

पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा हे टूर्स आयोजित करतात. आपल्या स्वतःच्या खासगी वाहनानेसुद्धा ही यात्रा करता येते. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याचे रिसोर्ट उपलब्ध आहेत. अष्टविनायकाची ही मंदिरे २० ते ११० किमी इतक्या क्षेत्रात स्थित आहेत.

ही आठही मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत आणि या मंदिरांना भेट देण्याचा एक ठराविक क्रम आहे. परंपरेनुसार तीर्थयात्रा मोरगांवच्या मोरेश्वराच्या दर्शनाने सुरु होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव याक्रमाने मंदिरांना भेट देण्यात येते. या तीर्थयात्रेची सांगता मोरगांवच्या मंदिराला पुन्हा जाण्याने होते.

अष्ट विनायक यात्रा कां करतात?

  या मंदिरांमध्ये गणपतीचे दर्शन घेण्याने गणेशभक्ती अधिक गहिरी आणि अधिक सात्विक होते. शिवाय असे मानले जाते की या सर्व मंदिरातील मुर्त्या या स्वयंभू असून त्यांच्या निर्मितीत मानवी हातांचा स्पर्शसुद्धा झालेला नाही. म्हणूनच या देवळांमध्ये गणपतीचे दर्शन हे त्याच्या सर्वात सात्त्विक अवतारामध्ये मिळते. शिवाय आजकालचे आपले आधुनिक जीवन ताणतणावाचे असते. निसर्गरम्य अशा जागी स्थित असलेल्या या देवळांना भेट दिल्याने मनाला हलके वाटते, शांत वाटते, प्रसन्न वाटते आणि पुन्हा आपली कर्तव्यपूर्ती करण्यासाठी ही यात्रा एक वेगळीच उर्जा प्रदान करते.


अष्टविनायक दर्शन संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...