google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : मध्यप्रदेश | "The Heart of Hindusthan"

माझी ब्लॉग सूची

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

मध्यप्रदेश | "The Heart of Hindusthan"

स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..

आज आपण या लेखामध्ये मध्यप्रदेश मधील आणखी काही पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. 


रायसेन किल्ला




इसवी सण 1200 मध्ये तयार करण्यात आलेला रायसेन किल्ला मध्यप्रदेशातील प्रमुख आकर्षण आहे. डोंगराच्या माथ्यावर तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याची ओळख बलुआ दगडांपासून बनविण्यात आलेला प्राचीन वास्तुकलेचा नमुना म्हणून होते. एवढी शतके उलटूनही या किल्ल्याची शान अजून अबाधित आहे. या किल्ल्यात जगातील सर्वात प्राचीन वॉटर हॉर्वेंस्टिंग यंत्रणा पाहायला मिळते. या किल्ल्यावर शेरशाह सुरीचे राज्य होते. असे म्हटले जाते की येथील राजाकडे परिस होता, ज्याकशाला या दगडाचा स्पर्ष केला जात होता त्याचे सोने होत होते. या परिसासाठी युद्ध झाल्याच्याही कथा येथील ग्रामिण सांगतात. जेव्हा राजा रायसेनचा पराभव झाला, तेव्हा त्याने परिस दगड किल्ल्यावरील एका तलावात फेकून दिला असल्याची अख्यायिका आहे.


उदयगिरी लेण्या.



विदिशा शहराच्या जवळच असलेल्या या लेण्या या चौथ्या शतकात बांधण्यात आल्या आहेत अशी माहिती उपलब्ध आहे.
एकाच ठिकाणी १४ लेण्या असलेली ही जागा म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुना आहे.

चंद्रगुप्त मौर्य यांच्या अधिपत्याखाली निर्माण झालेल्या या लेण्यांमध्ये सुद्धा रेखीव मुर्ती आहेत. येथिल दुमजली बांधकाम बघण्यासारखं आहे.


बांधवगड



या जंगलाच्या एकूण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर हे जंगल तीन भागांत विभागलेलं आहे. ताला, मगधी आणि खितौली. यांपैकी ताला भागात जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याचं नाव आहे बांधवगड. याच किल्ल्याच्या नावावरून जंगलाला बांधवगड हे नाव मिळालं आहे. आख्यायिकेनुसार, वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अयोध्येकडे येताना श्रीराम या भागात थांबले होते. दक्षिणेकडील लंकेवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी हा किल्ला लक्ष्मणाला भेट दिला. श्रीरामांनी आपल्या बंधूला दिलेली भेट म्हणून या किल्ल्याचं नाव पडलं बांधवगड!
अप्रतिम निसर्गसौंदर्य, नजर जाईल तिथं धरणी व्यापून राहिलेलं जंगल, मध्यभागी असलेला आणि जंगलाचा रखवालदार भासणारा बांधवगड, विस्तीर्ण गवताळ प्रदेश आणी ठायी ठायी दिसणारी जैवविविधता यांनी बांधवगड हे जंगल खऱ्या अर्थानं समृद्ध झालं आहे. या जंगलाला एकदा का भेट दिली की आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि प्रत्येक भेटीत हे प्रेम अधिक गहिरं होत जात.


कान्हा राष्ट्रीय उद्यान



कान्हा राष्ट्रीय अभयारण्य हे मध्यप्रदेश राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.हे अभयारण्य आपल्या अद्वितीय निसर्ग सौंदर्य आणि प्राणीसंपदेसाठी प्रसिध्द आहे.

कान्हा अभयारण्याचा विस्तार मध्यप्रदेश राज्याच्या मंडला आणि बालाघाट या जिल्ह्यामध्ये असून देश-विदेशातील पर्यटक या अभयारण्याला भेट देण्यासाठी येत असतात.
प्रोजेक्ट टायगर या अभियानातील प्रमुख उद्यान असलेल्या या अभयारण्यात बंगाली वाघ(रॉयल बेंगाल टायगर)मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.त्याच बरोबर अनेक दुर्लभ पशु पक्षी देखील या अभयारण्यात पाहायला मिळतात.
प्रसिध्द लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या “द जंगल बुक” या पुस्तकाच्या मागील प्रेरणा कान्हा अभयारण्य होते.म्हणून कान्हा राष्ट्रीय अभयारण्याला “The land of Jungle book” म्हणूनही ओळखले जाते. 


मध्य प्रदेश संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

२ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...