स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..
आज आपण या लेखामध्ये मध्यप्रदेश मधील आणखी काही पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.
सांची
महान बुद्ध स्तूप भारतातील सर्वात प्राचीन वास्तूंपैकी एक मानला जातो. याची निर्मिती तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी केली. स्तूपाचा मध्यबिंदू अर्धगोलाकार विटांच्या बांधकामांनी करण्यात आलेला आहे. पूर्वी सांची हे एक व्यापारी केंद्र होते.सांची ची कीर्ती रजपूत काळात व मोगल काळात हे अबाधित राहिली.
खजूराहो
मध्यप्रदेश राज्यातील छत्रपूर जिल्ह्यांमधील हे शहर काम शिल्प साठी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये याचं नाव सामील आहे. खजुराहो मंदिर प्रामुख्याने हिंदू आणि जैन मंदिरांचा संग्रह आहे ही सर्व मंदिरे प्राचीन असून चंदेल राजवंशाच्या काळामध्ये तयार केलेली आहेत त्यांची निर्मिती साधारणपणे 950 ते 1050 या काळामध्ये झाली होती प्राचीन काळामध्ये खजुराहोला खजूर पुरा या नावाने ओळखले जायचे.
कधी जाल :-
मध्यप्रदेश पर्यटनासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी उत्तम आहे. या काळात मध्य प्रदेश मधील हवामान अल्हाददायी असते .
कसे जाल :-
मध्य प्रदेश हे राज्य हवाई मार्ग लोहमार्ग व रस्ता मार्गाने देशाच्या सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेले असून यापैकी कोणताही पर्याय वापरून मध्यप्रदेश ला भेट देऊ शकता.
रस्ता मार्ग :-
सर्व राज्यातून रस्ता मार्गाने मध्य प्रदेशातील प्रमुख शहरांना सहज भेट देता येते.
राष्ट्रीय महामार्ग 7, राष्ट्रीय महामार्ग 12, राष्ट्रीय महामार्ग 25, राष्ट्रीय महामार्ग 26, राष्ट्रीय महामार्ग 27, राष्ट्रीय महामार्ग 70, राष्ट्रीय महामार्ग 3 ,राष्ट्रीय महामार्ग 92 असे अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग मध्य प्रदेश ला देशाच्या इतर प्रमुख शहरांशी जोडतात.
देशातील प्रमुख शहरे , आग्रा, जयपुर, वाराणसी, रणथंबोर, रायपुर, नागपूर, विशाखापटनम, अजिंठा, नाशिक, उदयपूर, अहमदाबाद, मुंबई, औरंगाबाद, मध्य प्रदेशातील प्रमुख शहरांशी जोडली गेली आहेत.
मध्यप्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसेस राज्यातील सर्व प्रमुख शहरांशी नियमित बससेवा जोडली गेली आहेत.
गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, छत्तीसगड या राज्यातून मध्य प्रदेश मधील प्रमुख शहरांसाठी बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वे :-
रेल्वेने अत्यंत जलद व किफायतशीर दरात मध्यप्रदेश पर्यटन करता येऊ शकते. देशाच्या सर्व प्रमुख शहरांची चांगल्या प्रकारे जोडले गेले असून या राज्यांमध्ये लोहमार्गाचे विस्तृत जाळे विणलेले आहे.
देशातील प्रमुख रेल्वे मार्ग मध्यप्रदेश मधून जातात. त्यामुळे मध्यप्रदेश हे शहर रेल्वेने आग्रा, दिल्ली, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, कोलकत्ता, पुणे, नागपूर, अहमदनगर, उदयपूर अहमदाबाद, हैदराबाद या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.
मध्यप्रदेश मधील इटारसी, बिना, कटनी, उज्जैन, इंदोर,ग्वाल्हेर,छिंदवाडा, देवास, खांडवा या शहरांमध्ये रेल्वे स्थानके आहेत.
हवाईमार्ग :-
मध्यप्रदेश मधील भोपाळ, ग्वाल्हेर, इंदोर, जबलपूर, खजुराहो या शहरांमध्ये विमानतळ असून देशातील प्रमुख शहरांशी निमित हवाई सेवेने जोडले गेले आहे.
मध्य प्रदेश संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
Thank you 🙏
उत्तर द्याहटवा