google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : मध्यप्रदेश | "The Heart of Hindusthan"

माझी ब्लॉग सूची

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

मध्यप्रदेश | "The Heart of Hindusthan"



स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..

आज आपण या लेखामध्ये मध्यप्रदेश मधील आणखी काही पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. 


पंचमढी


हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. निसर्गरम्य वातावरण, जंगले, ऐतिहासिक ठिकाणे यासाठी हे प्रसिद्ध आहे. इथे दरवर्षी लाखो पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये जवळपास १०६७ मीटर उंचीवर आहे. येथील घनदाट जंगले, धबधबे यामुळे मन प्रफुल्लित होते


 पेंच नॅशनल पार्क


या उद्यानात राॅयल बंगाल टायगर पाहण्यास मिळतात. या उद्यानात बरीच कॉटेज असून अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे.


 तितली पार्क 

 
मध्यप्रदेशातील आणखी एक आकर्षण म्हणजे तितली पार्क. येथे 65 प्रजातींची फुलपाखरं आहेत. याव्यतिरिक्त या पार्कमध्ये 137 झाडंही लावण्यात आली आहेत. लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी हे ठिकाण फार सुंदर आहे. 


 धार किल्ला


किल्ला14 व्या शतकाच्या आसपास बांधलेला धार किल्ला मध्य प्रदेशातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला दिल्लीच्या तत्कालीन सुलतान मुहम्मद बिन तुगलकांच्या कारकिर्दीत बांधला गेला. या किल्ल्याच्या आत संग्रहालय देखील आहे जिथे प्राचीन अवशेष आणि कलाकृती पाहण्यास मिळतील.


उज्जैन 


महाकाल मंदिर येथे पूजा केल्यास आपले स्वप्न पूर्ण होते. हे एक सदाशिव मंदिर आहे. येथे भक्त मोठ्या भक्ती भावाने स्वप्नेश्वरांची पूजा करतात. असे म्हटले जाते कि येथे माता स्वप्नेश्वरींचा हि वास आहे. 
महाकालेश्वर मंदिर सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत खुले राहते. 
शक्तीपिठामध्ये १८ शक्तीपीठांपैकी हे एक मानले जाते.
महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते.

मध्य प्रदेश संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


२ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...