google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : गोवा | "येवा गोवा अपलोच असा"

माझी ब्लॉग सूची

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

गोवा | "येवा गोवा अपलोच असा"


       
पणजी:- आशिया खंडातील सर्वात जास्त चर्च पणजी मध्ये असून त्यातील काही चर्च जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहेत. ‘द कान्वेट’ , ‘चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस’ या इमारती प्रसिध्द असून सेंट फ्रान्सिस चर्च मध्ये सेंट फ्रान्सिस जेवियर यांचा मृतदेह ममी स्वरुपात ठेवला असून आजही तो सुस्थितीत आहे.
सलीम अली पक्षी अभयारण्य,गोवा राज्य संग्रहालय
,सचिवालय,दुर्गा मंदीर,रीस मागोस किल्ला,गोवा पुरातत्व संग्रहालय.
अग्वाद किल्ला:- प्रामुख्याने डच आणि मराठ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून पोर्तुगीजांनी बांधला.सतराव्या शतकात बांधलेला हा किल्ला मांडवी नदीच्या किनाऱ्याला लागून आहे.आशिया खंडातील सर्वात जुने असे पाच मजली दीपगृह आहे.छायाचित्रणासाठी व निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे.
कलंगुट आणि बागा  बीच:-  दोन्ही बीच शेजारी आहेत एक संपून दुसरा कधी सुरु झाला कळत नाही.उत्तर गोव्यामधील सर्वात जास्त गर्दी असणारे हे दोन्ही बीच आहेत.या दोन्ही बीच वर परासेलिंग, बनाना राईड चा आनंद घेऊ शकतो.
नाईट बाजार:- आरपोरा या ठिकाणी दर शनिवारी सायंकाळी ४.०० पासून मध्यरात्रीपर्यंत बाजार भरतो.अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री या बाजारात होते.विदेशी पर्यटकांची विशेष गर्दी बाजारात असते.आभूषणे,खेळणी,इलेक्ट्रॉनिक वस्तू,चप्पल,बूट,चामड्याच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या वस्तू इथे स्वस्त मिळतात.
मंगेशी:- येथे भगवान शंकराचे मंदिर आहे.४५० वर्षे जुने असलेले मंदिर आस्थेचे प्रतिक आहे. मंदिराच्या आवारात सातमजली दीपमाळ असून भाविकांचे लक्ष वेधक आहे.
दूधसागर:-  हा धबधबा अद्भुत आहे.भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक असणारा हा धबधबा कर्नाटक व गोवा या राज्यांची सीमेवर आहे.स्थानिक भाषेत याला धबधब्याला तांबडी सुर्ला असे म्हणतात.पणजी पासून ६१ कि.मी. व मडगाव पासून ४६ कि.मी.अंतरावर हा धबधबा असून भगवान महावीर सेन्क्चुरी व मोलेन नेशनल पार्क मध्ये आहे.बेळगाव- मडगाव रेल्वेलाईन वर कॅसल रॉक या ठिकाणी रेल्वे अल्प काळासाठी तांत्रिक थांबा घेते या वेळी  धबधबा पाहू शकतो.दुसरा पर्याय म्हणजे कुलेम गावातून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी वन विभागाची जीप सफारी घेऊ शकतो.
अरंबोल बीच:- उत्तर गोव्यामध्ये असलेला शांत आणि सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करून घेतो.या ठिकाणी इतर बीच प्रमाणे गर्दी नसते.सायंकाळच्या वेळी पर्यटक वाद्यांच्या गजरात सूर्याला निरोप देण्याची पद्धत आहे.

डोणा पौला बीच:- प्रमुख बीच पैकी एक असलेला हा बीच  गजबजलेला असतो. या परिसरात पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट आहेत.
कोलवा बीच:- पांढऱ्या शुभ्र वाळूचा  समुद्र किनारा भारतीय व विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.शनिवार-रविवारी हा बीच पर्यटकांनी ओसंडून वाहतो.सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासाठी या बीच वर गर्दी असते.
पालोलोम बीच :- दक्षिण गोव्यामधील काणकोण भागात हा बीच आहे.शांत आणि सुरक्षित असणाऱ्या या बीच ला अनेक देशी-विदेशी पर्यटक भेट देतात.ताडा-माडाची उंच आणि गर्द झाडे सुंदर आणि पाहण्यासारखी आहेत.येथे कयाकिंग,परासेलिंग,बोटिंग, मासेमारीचा आनंद लुटू शकतो.



उर्वरित स्थळांची माहिती पुढील भागात घेऊया.....!!!
गोवा संबंधित पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

1 टिप्पणी:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...