google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : हंपी | Hampi

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

हंपी | Hampi


हम्पी हे नाव पंपा क्षेत्र या नावावरून पडले आहे.हे ठिकाण रामायण काळात किष्किंधा क्षेत्र म्हणून ओळखले जाई.वानरराज सुग्रीवाची राजधानी या ठिकाणी होती.मध्ययुगात हे विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा म्हणूनही ओळखले जात होते. 


इसवी सन १३४३ ते १५६५ च्या दरम्यान विजयनगर या हिंदू साम्राज्याची राजधानी हम्पी या ठिकाणी होती.राजा कृष्णदेवराय हा सम्राट असतानाचा काळ हम्पी चा सुवर्णकाळ होता.या काळात हम्पी मध्ये अनेक मंदिरे व भव्य प्रासाद बांधले गेले,दक्षिण भारतातील सर्वात बलशाली व समृद्ध राजवट म्हणूनही विजयनगर साम्राज्याला ओळखले जात.


प्रमुख ठिकाणे :


विरुपाक्ष मंदिर  : 


हम्पी मधील प्रमुख मंदिरांपैकी एक असलेले विरुपाक्ष मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. नक्षीकाम असलेली गोपुरे,दगडी सभामंडप व देव-देवतांच्या मूर्ती या मंदिराच्या भिंतींवर साकारण्यात आली आहे.वाहते.दरवर्षी डिसेंबर महिन्यात विरुपाक्ष व पम्पा यांच्या लग्नाचा समारोह आयोजित केला जातो.तसेच फेब्रुवारी महिन्यात विरुपाक्ष देवाचा वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो.


विठ्ठल मंदिर : 


हम्पी मधील विठ्ठल मंदिर हे श्री विजया विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हम्पी मधील सर्व ऐतिहासिक स्मारकांमध्ये विठ्ठला मंदिर हे नितांतसुंदर स्मारक म्हणून ओळखले जाते.कारण या मंदिराच्या मुख्य कक्षातील ५६ दगडी खांबावर हाताने थाप मारली असता त्यातून सुमधुर संगीत ध्वनी बाहेर पडतात.


मंदिराच्या बाहेर प्रसिध्द असा दगडी रथ आहे.पन्नास रुपयांच्या नोटेवर आपणास त्याचे चित्र पाहायला मिळते.


हजाराराम मंदिर :


 हजार राम मंदिर किंवा हजारा राम मंदिर हे हम्पी मधील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे.भगवान विष्णूला समर्पित असणाऱ्या या मंदिराची निर्मिती राजा कृष्णदेव राय यांनी केली असे मानले जाते.तत्कालीन राजांचे हे खाजगी मंदिर होते.संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या खांबांवर व भिंतींवर उत्तम दर्जाचे नक्षीकाम पाहायला मिळते.रामायणातील विविध प्रसंग इथल्या भिंतीवर साकारण्यात आले आहेत.


हत्ती अस्तबल :


हम्पी मधील हत्तीखाना विजयनगर साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिक आहे.हत्तींना ठेवण्यासाठी सुसज्ज असे कक्ष असणारी ही वास्तू आजही सुस्थितीत आहे.इथे हत्तींना ठेवले जाई,तसेच हत्तींच्या खाद्य व पाण्याची व्यवस्था इथे पाहायला मिळते.


राणीचे स्नानागार  


राणीचे स्नानागार हे विजयनगर साम्राज्याच्या सुस्थितीतील अवशेषा पैकी एक आहे.आयताकार आकार असलेल्या या विहिरीत खाली उतरण्यासाठी सर्व बाजूंनी पायऱ्या आहेत.या पायऱ्यांची रचना या विहिरीचे सौंदर्य वाढवतात.या विहिरी पर्यंत नैसर्गिक उतार वापरून पाणी आणण्यात आले होते


लोटस महल  :


 हजारा राम मंदिरापासून जवळच असलेला लोटस महल अर्थात कमळ महाल हम्पीमधील सर्वात प्रसिध्द स्थळांपैकी एक आहे.वीट आणि चुन्यात बांधकाम केलेला हा महाल दोन मजली आहे.इंडो-इस्लामिक शैली असलेल्या या महालाचा आकार कमळाच्या फुला प्रमाणेच आहे


लक्ष्मी नरसिंह मंदिर  


 राजा कृष्णदेवराय यांच्या काळात बांधण्यात आलेले लक्ष्मी नरसिंह मंदिर हम्पी मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.विरुपाक्ष मंदिरापासून जवळच असलेले हे मंदिर भगवान विष्णू चा अवतार असलेल्या नरसिंहाला समर्पित आहे.अत्यंत मोठी व सुबक नक्षीकाम असलेली लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती ६.७ मीटर उंचीची असून विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे.


हम्पी बाजार : 


हम्पी मधील विरुपाक्ष मंदिराला लागुनच हम्पी बाजार भरतो.पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे,कारण या बाजारात भेटवस्तू,बांगड्या,कलाकुसरीच्या वस्तू इत्यादींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.


कोरल राईड  :


 हम्पी हे स्थान तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे.हम्पी चा काही भाग नदीच्या पलीकडे आहे.या भागात जाण्यासाठी विरुपाक्ष मंदिराजवळच छोट्या नावा किंवा बांबू पासून तयार केलेल्या खोलगट कोराकॅल मधून पैलतीरावर जाता येते.


महानवमी डिब्बा  


राजा कृष्णदेवराय यांच्या काळात तयार करण्यात आलेली ही वस्तू हम्पी मधील प्रमुख वास्तूंपैकी एक आहे.कृष्णदेवराय यांनी उदयगिरी (ओरिसा) वर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून महानवमी डिब्बा बांधून घेतला.


अंजनेय टेकडी 


तुंगभद्रा नदीच्या पलीकडे अंजनेय टेकडी असून बजरंगबली हनुमानाचे जन्मस्थान आहे,असे मानले जाते.या उंच टेकडीवर जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.


मातंग हिल  


या टेकडी चा संदर्भ रामायणाशी जोडला जातो.रामायण काळात मतंग मुनी या ठिकाणी तपश्चर्या करत. हम्पीच्या मध्यवर्ती भागात असलेली व सर्वात उंच असलेल्या या टेकडी वरून हम्पी शहर व तुंगभद्रा नदीचे खोरे यांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.टेकडी माथ्यावर वीरभद्राचे मंदिर आहे.


अच्युतराय मंदिर 


 इ.स.१५३४ मध्ये बांधण्यात आलेले हे मंदिर भगवान विष्णूचा अवतार तिरुवेंगलानाथ यांस समर्पित आहे. मातंग टेकडी आणि गंधमदन टेकडी यांच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुख्य पर्यटन स्थळांपासून थोडेसे अलग असल्याने इथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते.


यानागुंडी गाव 

 हम्पीच्या पैलतीरावर असलेले यानागुंडी हे गाव विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी येथे हलवण्यापूर्वी राजधानी म्हणून ओळखले जात होतेया गावाजवळच रामायण काळाशी नाते सांगणारे पंपा सरोवर,अंजनेयाद्री मंदिर,चान्द्रमौलीश्वर मंदिर,गगन महल,प्राचीन दगडी पूल इत्यादी प्राचीन स्थळे आहेत.


पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय 


 हम्पीच्या पासून जवळच असलेल्या कमलापुरा इथे पुरातत्वीय संग्रहालयाची इमारत आहे.हम्पी मध्ये उत्खननावेळी सापडलेल्या अनेक वस्तू,मुर्त्या,भांडी,अलंकार,शास्त्रे इत्यादी या संग्रहालयात पाहायला मिळतात.तसेच विजयनगर साम्राज्याची संपूर्ण माहिती चित्ररुपात या ठिकाणी पाहायला मिळते.हे संग्रहालय पाहिल्यानंतर हम्पी मधील वास्तूंबाबत अनेक बाबींची माहिती होते .


प्रसिध्द खाद्यपदार्थ :हम्पी मध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. उत्तर भागातील पर्यटन स्थळ असल्याने दक्षिण भारतीय पदार्थ जसे की,इडली डोसा असे पदार्थ नाष्ट्याला व दुपारी केळीच्या पानावरील जेवण ज्यामध्ये विविध कोशिंबिरी व भात यांचा समावेश असतो.हम्पी चा मुख्य भाग ऐतिहासिक क्षेत्राबरोबरच अध्यात्मिक क्षेत्र असल्याने येथे मांसाहारी जेवण मिळणे थोडे अवघड आहे.पण नदीपलीकडील भागात मांसाहारी पदार्थ सहज मिळतात.तसेच येथे चायनीज,इटालियन,थाई असे खाद्यपदार्थ ही मिळतात


कधी जाल:- 

हम्पीला जाण्याचा सर्वात चांगला काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे कारण या काळात हम्पी मधील हवामान आल्हाददायी असते.

मार्च ते जून या काळात तापमान जास्त असल्याने दुपारची वेळ टाळून सकाळी व सायंकाळी केलेले पर्यटन सुखावह ठरते. 

जून ते सप्टेबर या काळात आवर्जून हम्पीला जावे कारण हम्पी मध्ये क्वचितच मोठा पाऊस पडतो. 

हम्पी मधील वार्षिक उत्सवाला हजेरी लावायची असेल तर दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विजया उत्सव तुमच्या साठी खास असेल.

 

कसे जावे:- कर्नाटक राज्यातील हम्पी हे प्रसिध्द असे पर्यटन स्थळ असल्याने देशाच्या सर्व भागाशी चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे.कर्नाटकच्या उत्तर भागात हम्पी असल्याने महाराष्ट्रातून कमी वेळात हम्पी ला जाता येते.हम्पी ला जाण्यासाठी तुम्ही विमान,रेल्वे किंवा बस/ मोटार या पर्यायांचा वापर करू शकता.


 विमान: हम्पी साठी सर्वात जवळचा विमानतळ बेल्लारी या ठिकाणी असून फक्त ३५ कि.मी.अंतरावर आहे.हैद्राबाद व बंगुलुरू इथून बेल्लारी साठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे.


रेल्वेने :- रेल्वे स्टेशन होस्पेट या ठिकाणी असून १२ कि.मी.अंतरावर आहे.मुंबई-पुण्यावरून बंगुलुरू ला जाणाऱ्या रेल्वे होस्पेट स्थानकावर थांबतात.तसेच नागपूर वरून बंगळूरू ला जाणाऱ्या रेल्वेही होस्पेट ला थांबत


रस्ता मार्ग:- मुंबई,पुणे,कोल्हापूर इत्यादी शहरांशी महामार्गाने जोडले गेले आहे.मुंबई,पुणे,सातारा,कोल्हापूर या शहरातून हुबळी,गदग,बेल्लारीला जाणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या व खाजगी वोल्वो बसेस नियमित मिळतात. हम्पीचे अंतर (कोल्हापूर मार्गे) ५९६ कि.म.

विजयनगर साम्राज्याची ओळख करून घ्यायची असेल तर एकदा तरी हम्पी ला भेट दिलीच पाहिजे. 

पर्यटनासाठी सायकल किंवा दुचाकी भाड्याने मिळतात.त्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे भटकंती करता


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.





२ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...