चेन्नई पासून १६० कि.मी. अंतरावर असलेला पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश सर्व प्रकारच्या पर्यटन सुविधा असणारा व आकाराने लहान असल्याने सहजपणे पर्यटन करता येणारा प्रदेश आहे.
पुदुच्चेरी या शहरामध्ये भारतीय व फ्रेंच संस्कृती यांचे मिश्रण आजही पाहायला मिळते. या शहरामध्ये फ्रेंच व तमिळ वास्तुरचना पाहायला मिळते. पुदुच्चेरी ही महर्षी अरविंद यांच्या आश्रमासाठी ओळखली जाते.
फ्रेंच संस्कृती आणि इतिहास :
पाँडेचेरी या ठिकाणी फ्रेंचांनी आपल्या वसाहती वसवल्या. प्राचीन काळापासून हे फ्रांस बरोबरच्या व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते.
मुख्य पर्यटन स्थळे :-
प्रोमेनेड बीच
प्रमुख प्रेक्षणीय स्थळ असून वॉर मेमोरियल पासून ड्यूप्लेसीस पुतळ्या पर्यंत पसरलेला असून १.२ कि.मी.अंतर असलेला बीच आहे.सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक या बीच वर गर्दी करतात. सायंकाळच्या वेळी वेळ घालवण्यासाठी,चालण्यासाठी हा बीच उत्तम आहे. आसपास अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत,त्यामध्ये जुने दीपगृह,म.गांधी पुतळा,वॉर मेमोरियल,हेरीटेज टाउन हॉल इत्यादी.
फ्रान्सीसी युद्ध स्मारक
फ्रेंच वॉर मेमोरियल पुदुच्चेरी च्या आकर्षक स्मारक आहे.पहिल्या महायुद्धा मध्ये ज्या फ्रेंच सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती,त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.दर वर्षी १४ जुलै ला इथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
श्री मनाकुला विनयगर मंदिर
इ.स.पाचव्या शतकाच्या दरम्यान स्थापन केलेले श्री मनाकुला विनयगर मंदिर पाँडेचेरी मधील सर्वात प्राचीन गणेश मंदिर आहे.सकाळी ५.४५ ते दुपारी १२.३० व सायंकाळी ४.०० ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनाची वेळ असते.हे मंदिर वॉर मेमोरियल,श्री अरबिंदो आश्रमा जवळच आहे.
लाईटहाउस
पोमेनेड बीच जवळील जुने लाईटहाउस पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.१८३६ साली तयार करण्यात आलेल्या जुन्या लाईटहाउस ची क्षमता २६ नॉटीकल माईल इतकी आहे.
बोटॅनिकल गार्डन
बोटॅनिकल गार्डन सर्वात लोकप्रिय स्थळांपैकी एक आहे. पाँडेचेरी बस स्थानकाजवळ असलेल्या बोटॅनिकल गार्डन मध्ये असंख्य प्रकारच्या वनस्पतींचा संग्रह पाहायला मिळतो,तसेच या गार्डन मध्ये टोय ट्रेन,मत्स्यालय तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी आहेत.
श्री.अरबिंदो आश्रम
ज्या प्रमाणे हे ठिकाण फ्रेंच वसाहतीसाठी प्रसिद्ध आहे,त्याच प्रमाणे आध्यात्मिक भूमी म्हणूनही ओळखली जाते.महान गुरु श्री अरबिंदो यांचा आश्रम पुदुच्चेरी मध्ये आहे.या आश्रमात लोकांना योग,ध्यानधारणा व मनशांती याबाबत मार्गदर्शन केले जाते.अनेक देशी-विदेशी लोक मन:शांती साठी या आश्रमात येतात.
ऑरोविले
शहरपासून १५ कि.मी.अंतरावर विल्लुपुरम जिल्ह्यात असलेले ऑरोविलेची स्थापना १९६८ मध्ये श्री अरबिंदो यांच्या शिष्या ‘मीरा अल्फासा’यांच्या द्वारा केली गेली. ऑरोविले ला “युनिवर्सल टाऊनशिप”असे ही म्हटले जाते.इथे लोक आपली जात,धर्म,संस्कृती,राष्ट्रीयता इत्यादी सर्व बाजूला ठेवून मानवतेच्या दृष्टीने प्रगतीची विचार घेऊन राहू शकतात.सध्या या टाऊन शिप मध्ये १९५ देशातील २८०० पेक्षा जास्त लोक एकत्र राहतात.
अरीकेमेडू
४ कि.मी.दक्षिणेला असलेले अरीकेमेडू फ्रेंच वसाहत रोमन व्यापारी केंद्र होते.पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या अरीकेमेडू बंदरातून इ.स.पहिल्या व दुसऱ्या शतकात रोमन,चोल,फ्रेंच लोकांशी व्यापार केला जाई.
पॅराडाईज बीच
पॅराडाईज बीच सर्वाधिक भेट दिले जाणारे ठिकाण आहे. पुदुच्चेरी शहराच्या दक्षिणेस ७ कि.मी.अंतरावर हा बीच असून चुन्नाम्बर नदीतून बोटीने या बीच वर जावे लागते.एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला समुद्र असलेला हा बीच सोनेरी वाळूचा आहे.या बीच वर जलक्रीडा करण्याचा आनंद घेता येतो,तसेच समुद्र स्नान करण्यासाठी हा बीच सुरक्षित मानला जातो.
सेरेनीटी बीच पुदुच्चेरी
उत्तर-पूर्वेला १० कि.मी.अंतरावर कोट्टाकुप्पम जवळील सेरेनीटी बीच आहे शांत नितळ पाणी व सोनेरी रेती हे या बीच चे वैशिष्ठ्य आहे. इथून दिसणारे सूर्योदयाचे दृश्य अदभूत असते. दूर असल्याने या बीच वर गर्दी कमी असते.या बीच जवळ उत्तम दर्जाच्या मत्स्याहाराची हॉटेल्स आहेत.
बेसिलिका ऑफ द सेक्रेड हार्ट ऑफ जीजस
बस स्थानका पासून २.५ कि.मी. अंतरावर दक्षिण बाजूला असलेले हे चर्च पवित्र धार्मिक स्थळ आहे.भारतातील एकूण २८ बेसिलिका चर्च पैकी हे एक चर्च असून दि.२४-६-२०११ रोजी या चर्च ला बेसिलिका दर्जा देण्यात आला.फ्रेंच स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे हे चर्च आहे.
वॉटरस्पोर्ट
विविध जलक्रीडा साठी ओळखले जाते.इथल्या शांत नितळ निळ्या पाण्यात पेरासेलिंग,स्कुबा डायव्हिंग,स्नोर्कलिंग,बोटिंग,सर्फिंग इत्यादी जलक्रीडा मोठ्या प्रमाणात केल्या जातात.
प्रसिद्ध खाद्य पदार्थ:-
अनेक रेस्टोरंट मध्ये फ्रेंच पदार्थ मिळतात.इथे मिळणाऱ्या पदार्थांपैकी Baguettes,Croissants,Ratatouille,salade niscoise हे पदार्थ आवर्जून चाखून पाहिले पाहिजेत.त्याच बरोबर दक्षिण भारतीय पदार्थ जसे की,इडली,मसाला डोसा,रस्सम,सांभार,फिश करी,बिर्याणी हे पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत.भात,सांभार,फिश व विविध प्रकारच्या भाज्या हे इथल्या स्थानिक लोकांचे रोजचे अन्न आहे.अनेक हॉटेल मध्ये या अन्नाला मिल (Meal)असे म्हणतात.स्वस्तामध्ये पोटभर जेवण म्हणून या अन्नाकडे पाहिले जाते.
सर्वात चांगला कालावधी:
हे दक्षिण भारतातील शहर असल्याने इथला उन्हाळा कडक असतो.हे ठिकाण समुद्राच्या कडेला असल्याने हवा दमट असते. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम आहे.या काळात तापमान १५ ते ३० अंशाच्या दरम्यान असते.
सायकल/दुचाकी भाड्याने :-
पुदुच्चेरी मध्ये फिरण्यासाठी सायकल किंवा दुचाकी सहज भाड्याने मिळतात.कारण वसाहती सह विविध बीचेस,मंदिरे,गार्डन इत्यादी ठिकाणी फिरण्यासाठी सायकल किंवा दुचाकी सुलभ ठरतात.
सायकल दिवसाला ५० ते १०० रु.दराने व दुचाकी २५० ते ५०० रु.दराने एका भाड्याने घेऊन आपण पर्यटन करू शकतो.
कसे जावे:-केंद्रशासित प्रदेश असल्याने वाहतुकीच्या सर्व पर्यायांनी देशातील विविध शहरांशी जोडले गेले आहे.
विमानाने :-देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ(Domastic Airport)असून शहरापासून ७ कि.मी.अंतरावर आहे.दिल्ली,मुंबई,बंगुलुरू,चेन्नई या शहरातून पुदुच्चेरी साठी विमानसेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने :-विल्लुपुरम जंक्शन देशातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे.मुंबई वरून पुदुच्चेरी(Mumbai to Puducherry train) ला जाण्यासाठी दादर-पुदुच्चेरी एक्सप्रेस(०१००५) ही अत्यंत सोयीची रेल्वे आहे.
रस्तामार्गाने :-शहर रस्ता मार्गाने प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले असून चेन्नई,बंगुलुरू,मदुराई,कन्याकुमारी,तिरुचिरापल्ली इत्यादी शहरातून साध्या व आरामबस मिळतात.चेन्नई वरून पुदुच्चेरी साठी खूप बसेस मिळतात.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Mast information
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🙏
हटवाgood
उत्तर द्याहटवाThanks 🙏
हटवा