बदामीमध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध धर्माच्या परंपरांचं दर्शन घडवणार्या गुंफा आहे. नटराजाची अत्यंत सुंदर मूर्ती, अर्धनारीनटेश्वराचं शिल्प, हरीहर, महिषासूरमर्दिनी, विष्णुचे दशावतार, पद्मपाणी बुद्धाचं शिल्प...डोळ्यांचं पारणं फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुंफा नटलेल्या आहेत. लाल वालुकाश्मामध्ये खोदलेल्या आहेत.
भूतनाथ मंदिर
संध्याकाळी सूर्याची किरणं इथल्या अगस्त्यतीर्थाच्या पाण्यावर पडून या तळ्याला सोनेरी रंगात उजळवून टाकतात. मंदिराचं सुरूवातीचं बांधकाम चालुक्यकालीन असलं तरी मंदिराचं शिखर कदंबकालीन आहे. मागच्या बाजूला प्राचीन जैन गुंफा आहेत. ज्यामध्ये जैन तीर्थंकर पार्श्वनाथांची प्रतिमा आहे.
यल्लमादेवीचं मंदिर
हे मंदिर विष्णूचं होतं. नंतर तिथे पार्वतीचाच अवतार मानल्या जाणार्या यल्लमादेवीची स्थापना करण्यात आली. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. चारही बाजूंनी मंदिरात प्रवेश करु शकता.बदामीमधली दोन शिवालयंही अत्यंत सुंदर आहेत.
गुंफा क्रमांक १
ही गुंफा नटराज स्वरूपातील शिवाच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. १८ हातांची ही मूर्ती १८ नाट्यमुद्रा दर्शविते. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला त्रिदंडधारी शिवद्वारपाल असून, बाजूला हत्ती व बैलाचे शिल्प आहे. आत आल्यावर हरिहराची साडेसात फूट उंचीची मूर्ती दिसते. उजवीकडे, भिंतीच्या दिशेने शिव आणि पार्वतीचे अर्धनारीश्वरी रूपाचे शिल्प आहे. पंख असलेली अप्सरा, तलवारधारी यक्ष अशी अनेक शिल्पे येथे पाहायला मिळतात. सर्व शिल्पे अलंकारांनी सुशोभित केलेली आहेत. येथे पशु-पक्ष्यांची शिल्पे आहेत, तसेच मिथुनशिल्पेही आहेत.
गुंफा क्रमांक २
विष्णूला समर्पित असलेली ही गुंफा सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात खोदण्यात आली. प्रवेशद्वारावर विनाशस्त्र द्वारपाल आहेत. त्यांच्या हातात फुले आहेत. मंदिराच्या आत भागवत पुराणासारख्या हिंदू ग्रंथांमधील कथा दर्शविल्या आहेत. सातव्या शतकातील भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शविणारी ही गुंफा आहे. समुद्रमंथन, कृष्णजन्म आणि कृष्णलीला यात दाखविल्या आहेत. छतावरील आणि दरवाजाच्या वरील शिलाखंडामध्ये लक्ष्मी, स्वस्तिक प्रतीक, उडणारी जोडपी, ब्रह्मा, विष्णू आदींच्या प्रतिमा आहेत. छताला चौरस फ्रेममध्ये एका चक्रावर सोळा मासे दिसून येतात. शेवटच्या भागामध्ये आकाशात विहार करणारे एक जोडपे आणि गरुडावर विष्णु आहे. साधारणतः वेरूळसारखीच शिल्पकला येथे पाहायला मिळते. देव-देवता, त्यांचे अवतार, पौराणिक संदर्भ येथे दिसून येतात.
गुंफा क्रमांक ३
ही गुंफाही श्री विष्णूला समर्पित आहे. या समूहातील ही सर्वांत मोठी गुंफा आहे. या गुंफेत त्रिविक्रम, अनंतसायण, वासुदेव, वराह, हरिहर आणि नरसिंहाच्या विशाल मूर्तींचा आणि राक्षसांच्या मूर्तीचाही समावेश आहे. येथे फ्रेस्को पेंटिंगही दिसून येते; मात्र ही चित्रे थोडी फिकट झाली आहेत. परंतु त्या काळी असलेल्या चित्रकलेचा नमुनाही येथे पाहायला मिळतो. सहाव्या शतकातील संस्कृती, सौंदर्यप्रसाधने आणि कपड्यांचे दृष्टिकोन या गोष्टी गुहेतील शिल्पकलेतून दिसून येतात. अनेक स्तंभांच्या खांबावर, खांबांच्या चौकटीत स्त्री व पुरुष प्रेम मिथुनशिल्पे आहेत. शिलालेखावर ही गुंफा पौर्णिमेच्या दिवशी (एक नोव्हेंबर ५७८ रोजी) पूर्ण झाल्याचे दिसून येते
गुंफा क्रमांक ४
ही गुंफा जैन धर्मातील श्रेष्ठ तीर्थंकरांना समर्पित आहे. गुंफा क्रमांक तीनच्या पुढेच पूर्वेस ही गुंफा आहे. साधारण सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ही गुंफा तयार केली गेली असावी. त्यात अकराव्या व बाराव्या शतकातही सुधारणा झाल्या असाव्यात. महावीरांना यक्ष आणि अप्सरा चवऱ्या ढाळत आहेत, असेही शिल्प आहे. तसेच जैन तीर्थंकरांच्या २४ प्रतिमाही येथे आहेत. ही जैन गुंफा महाराष्ट्रामधील वेरूळ येथील जैन गुंफेप्रमाणेच दिसते. मस्तकावर पाच फणे असलेल्या पार्श्वनाथाची, तसेच सिंहावर आरूढ झालेली महावीराची मूर्तीही येथे आहे.
अन्य गुंफा : या गुहांच्या व्यतिरिक्त छोट्या गुंफाही येथे आहेत. त्या साधारणतः सातव्या व आठव्या शतकातील असून, यात बौद्ध गुंफांचाही समावेश आहे.
राहायची सोय:-बदामीमध्ये हॉटेल्सचे मर्यादित पर्यायच मिळू शकतात. होम स्टेचे काही पर्याय आहेत.
केव्हा जावे:मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते .पाऊस इकडे फार पडत नाही .
रेल्वे मार्ग: एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हंपी आहे .
काही उपयुक्त रेल्वे :
(१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस .(२) मिरज हुबळी एक्सप्रेस रोज(३)हुबळी ते मुंबईसाठीचालुक्य ए ११००६ /११०२२ ,शरावती एक्स ११०३६ ,शिवाय १७३१७ /०६५११ आहेत .
रस्त्याने: सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बेळगाव, येथून बस सेवा उपलब्ध आहेत. हवा ,सूर्यफूल ,मका ,ज्वारी ,बाजरी ,गहू ,मिरची ,चणे यांची हिरवी शेते आपली सोबत करतात . आनंददायकच होणार .स्वच्छ आणि मॉलसारख्या इमारती असलेल्या डेपोतून चकाचक बसेस नियमित सुटतात .
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Interesting information
उत्तर द्याहटवाThank you so much 🙏☺️
हटवाek number
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏☺️
हटवा