मध्यप्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यामध्ये असलेला सांची येथील बौद्ध विहार महान स्तूप म्हणून प्रसिद्ध आहे. सांची हे शहर भोपाळ पासून उत्तर-पूर्व दिशेला ४६ किलोमीटर अंतरावर आहे आली.
सांची हे शहर बेतवा या नदीच्या किनारी वसलेले आहे. हे शहर आपल्या सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे जागतिक वारसा स्थळ म्हणून सांची येथील स्तूप 15 ऑक्टोबर 1982 साली घोषित करण्यात आले आहेत.या स्तुपांची निर्मिती सम्राट अशोक यांनी तिसऱ्या शतकामध्ये केली.हा स्तूप प्रेम,शांती, विश्वास आणि साहसाचे प्रतिक आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध यांचे अवशेष ठेवण्यात आले आहेत
सांचीचा महान स्तूप भारतातील सर्वात प्राचीन वास्तूंपैकी एक मानला जातो. याची निर्मिती तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी केली. या स्तूपाचा मध्यबिंदू अर्धगोलाकार विटांच्या बांधकामांनी करण्यात आलेला आहे.भारताचे प्रतीक चिन्ह याच ठिकाणच्या स्तंभावरून निश्चित करण्यात आले आहे. पूर्वी सांची हे एक व्यापारी केंद्र होते देश-विदेशातील व्यापारी आपल्या मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी सांची याठिकाणी येत.
श्रीलंकेतील बौद्ध काळातील महावामसा च्या अनुसार सांची व सम्राट अशोक यांचे नाते फार पूर्वीपासून होते.ज्यावेळी सम्राट अशोक साम्राज्याचे उत्तराधिकारी होते तेंव्हा या शहराचे कामकाज पाहण्यासाठी नियमितपणे या शहराला भेट देत असत.सम्राट अशोक यांनी सांची पासून जवळच असलेल्या विदिशा येथील एका सावकाराच्या देवी नावाच्या मुलीशी लग्न केले.कालांतराने त्यांना मुलगा महेंद्र व संघमित्रा ही अपत्ये झाली.
सम्राट अशोक हे आपल्या पराक्रमासाठी व युद्ध कौशल्यासाठी ओळखले जातात.त्यांनी आपल्या जीवनात अनेक युद्धे केली व जिंकली.मात्र कलिंग येथील युद्धात झालेल्या अपरिमित नरसंहाराने त्यांचे हृदय परिवर्तन झाले व त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंका येथे पाठवले.
सांची च्या स्तुपाची रचना | Architecture of Sanchi Stupa
सांची च्या स्तुपाची उंची जवळजवळ १६.४ मीटर असून याचा व्यास ३६.५ मीटर आहे.लांबून पाहिले असता हा स्तूप अर्धगोल आकाराचा जरी दिसत असला तरी याची भव्यता,बांधणी व नाजूक नक्षीकाम यांचे दर्शन जवळ आल्यानंतर होते.या स्तुपाचा केंदीय गोलार्ध विटांपासून बनवण्यात आला असून यामध्ये गौतम बुद्ध यांचे अवशेष आहेत.या स्तुपाचा वरील भाग दगडी छत्री व रेलिंग मुळे एखाद्या कमानदार छत्री सारखा दिसतो.
सांची च्या स्तुपाबद्दल काही रंजक माहिती | Interesting facts about Sanchi stupa.
१) सांची स्तुपाच्या मध्यवर्ती भागात एक चबुतरा असून या भागात पर्यटकांना प्रवेश निषिद्ध आहे,कारण यामध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे पवित्र अवशेष ठेवले आहेत.
२)या स्तूपाच्या तीन गोलाकार छत्र्या बौद्ध धर्मातील त्रिनेत्रांची आठवण करून देतात.
३)सम्राट अशोक यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मरणार्थ सांची स्तुपाची निर्मिती केली होती.
४)या स्तुपाची उंची ५४ फुट आहे.
५)सांची स्तूप फार प्राचीन मानला जातो.बौद्ध धर्मात सांची स्तूप पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते.
६)उंच अशा टेकडीवर निर्माण केलेल्या या स्तूपा भोवती चारी बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
७)या स्तूपाच्या चारी बाजूला वालुकाश्म दगडात तयार केलेले प्रवेशद्वार आहेत,ज्यांच्या पट्टीदार कमानीवर गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग व जातक कथांचे शिल्पकाम केलेले दिसून येते.प्राचीन भारताच्या संस्कृतीची ओळख या शिल्पकामातून होते.मनुष्या व्यतिरिक्त वनस्पती व प्राणी यांच्यातील जिवंत प्रसंग हे या शिल्पकलेचे वैशिष्ठ्य आहे.
८) सहजता,सौंदर्य व महानता ही सांची च्या स्तुपाची ओळख आहे.सांची चा स्तूप जरी गौतम बुद्धांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आला असला तरी या स्तुपामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत नाही.कारण त्यावेळी गौतम बुद्धांची मूर्ती तयार करून देवता म्हणून पूजण्याची पद्धत रूढ नव्हती.
९) भारताचे राष्ट्रीय चिन्ह सांची येथूनच घेण्यात आले आहे.
१०) सांची स्तूप जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असून दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक या प्रसिद्ध स्थळाला भेट देण्यासाठी येतात.
पाहण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणे:-
१) अशोक स्तंभ सांची
अशोक स्तंभाची निर्मिती तिसऱ्या शतकामध्ये केली गेली परंतु खूप जुना असूनही हा स्तंभ नवीन असल्याचा भास होतो याची मजबूती आजही कायम आहे या स्तंभाची शैली सारनाथ येथील स्तंभ वाशी जुळते तसेच या स्तंभाची रचना ग्रिको बौद्ध शैली शी साधर्म्य सांगते.
२) द ग्रेट बाउल सांची
ग्रेट बाऊल दगडावर तयार करण्यात आलेला खूप मोठा खंड आहे. ज्याचा उपयोग बौद्ध भिक्षू साठी भोजन किंवा अन्य साहित्य वितरण करण्यासाठी केला जात असे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा व आजही नवा दिसणारा हा बाऊल सांची येथील पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
३)सांची प्रवेशद्वार
इसवी सन 35 मध्ये तयार करण्यात आलेले सांची येथील चारही प्रवेशद्वार आपल्या विलक्षण शिल्पशैली साठी प्रसिद्ध आहेत. या चारही दरवाजांवर गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना चित्रित केले आहेत तसेच जातक कथांमधील काही प्रसंग ही इथे पाहायला मिळतात. या खांबांची नक्षी व शिल्पकाम अत्यंत सुंदर असून कित्येक वर्षानंतरही सुस्थितीत आहे.
४) गुप्त मंदिर सांची
सांची येथील गुप्त मंदिर उत्तर भारतातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक मानले जाते.या मंदिराची सुंदरता आणि शिल्पकला पाहण्यासारखी आहे. मौर्य काळातील अनेक घटना येथे चित्रित केल्या आहेत, तसेच पाने फुले व वेली यांची सुंदर नक्षी या मंदिराच्या प्रवेशद्वारावर व भिंतीवर केलेली आहे.
प्रवेश फी| Sanchi stupa entry fee
सांची या पवित्र तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाला भारतातील पर्यटकांबरोबरच युरोपीय, अमेरिकन व सार्क देशातील (बांगलादेश नेपाळ भूतान श्रीलंका पाकिस्तान मालदीव अफगाणिस्तान थायलंड म्यानमार) पर्यटक भेट देत असतात या सर्व पर्यटकांसाठी व भारतातील पर्यटकांसाठी आकारण्यात येणारे शुल्क पुढील प्रमाणे
- भारतीय पर्यटक ३० रुपये प्रत्येकी
- सार्क देशातील नागरिक तीस रुपये प्रत्येकी
- इतर विदेशी नागरिक पाचशे रुपये प्रत्येकी
- 0 ते 15 वयोगटातील मुले व मुली निशुल्क
सांची स्तूप पर्यटनासाठी सर्वात चांगला कालखंड | Best time to visit Sanchi stupa
सांची स्तूप पर्यटनासाठी सर्वात चांगला कालावधी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान मानला जातो कारण या कालावधीमध्ये तापमान अनुकूल असते व कोणत्याही प्रकारची गैरसोय या काळात होत नाही.
मार्चनंतर सांची येथील तापमान वाढत जाते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सांची पर्यटन टाळावे.
पावसाळ्यातील कालावधीही सांची पर्यटनासाठी अनुकूल मानला जातो या काळात योग्य ती खबरदारी घेऊन सांची पर्यटन करता येऊ शकते.
सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच पर्यंत सांची स्तूप येथील पर्यटन चालू असते.
येथील स्थानिक खाद्यपदार्थ |
पर्यटनाबरोबरच खाद्यपदार्थांचे हीच शौकीन असाल तर मध्यप्रदेश राज्यातील सांची हे आदर्श पर्यटन स्थळ असेल, कारण सांची ला आल्यानंतर मध्यप्रदेशच्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतो तिथे दालच्या, बिर्याणी, कबाब, कोरमा, रोगण जोष, जिलेबी, पोहे तसेच लस्सी आणि उसाचा रस असे खाद्यपदार्थ व पेये सहज उपलब्ध होतात. त्याच बरोबर या ठिकाणी उत्तर भारतीय खाद्यपदार्थ, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ, चायनीज आणि कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थही सहज उपलब्ध होतात. सांची ला आलेले पर्यटक इथल्या स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य देतात.
कसे जाल:-
विमान सेवा:-
सांची पासून 46 किलोमीटर अंतरावर भोपाळ शहरामध्ये राजा भोज विमानतळ सर्वात जवळचा विमानतळ असून भोपाळ विमानतळावरून सांची ला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी सहज मिळतात.
महाराष्ट्रातून मुंबई, नागपुर, पुणे तसेच देशातील दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोची या शहरातून भोपाळ ला जाण्यासाठी नियमित विमानसेवा उपलब्ध असते.
रेल्वे सेवा:-
सांची येथे एक लहानसे रेल्वे स्थानक असून या या स्थानकावरून कमी रेल्वे धावतात. मोठे व भरपूर रेल्वेची संख्या असणारे रेल्वे स्टेशन भोपाळ किंवा हबीब गंज या ठिकाणी आहे भोपाळ किंवा हबीबगंज येथून सांची साठी बसेस टॅक्सी सहज मिळतात.
बस सेवा:-
मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्याअसंख्य बसेस सांची साठी उपलब्ध असतात भोपाळ, विदिषा, रायसेन, बरेली, होशंगाबाद, सागर,इंदोर, दमोह, गुणा इत्यादी शहरातून सांची साठी दररोज बसेस सुटतात.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
nice
उत्तर द्याहटवाThank you so much 🙏🙏☺️
हटवा