google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : रामेश्वरम | Rameshwaram

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

रामेश्वरम | Rameshwaram

भारताच्या मुख्य भूमीपासून काही अंतर समुद्रात असलेले रामेश्वरम बेट हे पंबन बेट म्हणूनही ओळखले जाते.


चारधाम मधील दक्षिण धाम व बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या इथे येणाऱ्यांना आध्यात्मिक वातावरण व मन:शांतीचा अनुभव मिळतो.



रामनाथस्वामी मंदिर


भारतातील सर्वात पवित्र मंदिरापैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर रामेश्वरम मधील प्रमुख ठिकाण आहे.रामनाथस्वामी मंदिराचे पौराणिक महत्व खूप मोठे आहे,याचा संबंध रामायणाशी आहे.




रावण वधानंतर ब्रम्हहत्येच्या पापक्षालनार्थ प्रभू श्रीरामांनी अगस्ती ऋषींच्या सांगण्यावरून शिवलिंगाची स्थापना केली,हेच ते रामेश्वरम अर्थात रामनाथस्वामी मंदिर.




बेटाच्या पूर्व बाजूला असलेल्या या मंदिराच्या परिसरात अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत,ही सर्व मंदिरे द्राविडी वास्तुशिल्प शैलीतील आहेत.



ग्रॅनाईट व वालुकाश्मात बांधलेले मुख्य मंदिर आकार व भव्यता या बाबत अद्वितीय असेच आहे.मंदिराच्या चारी दिशांना असलेली उंच गोपुरे लक्षवेधी ठरतात.


मंदिराच्या आत २२ कुंडे आहेत,ज्यातील पाण्याने स्नान केल्याने पाप मुक्ती होते,असे मानतात.



ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचे निवासस्थान.


रामेश्वरम हे भारताचे माजी राष्ट्रपती महान वैज्ञानिक ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचे दुमजली घर रामेश्वरम मध्ये मुख्य मंदिरापासून जवळ आहे.कलाम यांचे नातेवाईक खालील मजल्यावर राहत असून वरील दोन मजल्यांचे संग्रहालयामध्ये रुपांतर केले आहे.



धनुषकोडी



रामेश्वरम पासून ९.५ कि.मी.दक्षिण दिशेला असलेले धनुषकोडी शहर श्रीलंकेपासून २४ कि.मी.अंतरावर असलेले भारताचे सर्वात जवळचे शहर आहे.




२३ डिसेंबर १९६४ रोजी रात्रीच्या वेळी चक्रीवादळामुळे तयार झालेल्या  सुमारे २५ मी.उंचीच्या सुनामी लाटांनी धनुष कोडी गाव व प्रवाश्यांनी भरलेली रेल्वे यांना गिळंकृत केले.



जवळजवळ १८०० लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक बेपत्ता झाले.आजही त्याठिकाणी अजस्त्र लाटांमुळे  मुळे उध्वस्त झालेली घरे,चर्च,मंदिर,रेल्वे स्टेशन,शाळा,लोहमार्ग यांचे अवशेष पाहायला मिळतात.



कलाम मेमोरियल


डॉ.कलाम यांच्या स्मृती सदैव जागृत राहाव्यात यासाठी केंद्र शासनाने रामेश्वरम येथे उभारलेले कलाम मेमोरियल उभारले आहे

स्वतः चे सर्वस्व देशाला अर्पण करणाऱ्या डॉ.कलाम यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा चित्र,शिल्प,वस्तू,ध्वनी च्या स्वरुपात मांडलेला आहे.

 


मंदिर पूजा वेळा:-


  • सकाळी पाच वाजत मंदिर उघडते.यानंतर  पल्लीयाराई दीप आराधना(Palliyarai Deepa Arathana)  पूजा होते.

  • सकाळी पाच वाजुन दहा मिनिटांनी स्पादिगलिंगा दीप आराधना (Spadigalinga Deepa Arathana) होते.

  • सकळी पाच वाजुन पंचेचाळीस मिनिटांनी थिरुवनन्थाल दीप आराधना(Thiruvananthal Deepa Arathana) होते.

  • सकळी सात वाजता विला पूजा(Vila Pooja) होते. 

  • सकाळी दहा वाजता कालासन्थी पूजा(Kalasanthi Pooja) होते.

  • दुपारी बारा वाजता ऊचीकला पूजा(Uchikala Pooja) होते.

  • संध्याकाळी सयारात्चा पूजा(Sayaratcha Pooja) होते.

  • रात्री साडे आठ वाजता अर्थजामा पूजा(Arthajama Pooja) होते.

  • रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पल्लीयाराई पूजा(Palliyarai Pooja) होते.



प्रमुख कार्यक्रम/ उत्सव:-


  • रामेश्वरम मंदिर मध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये महाशिवरात्रि खुप मोठ्या आनंदाने साजरी केली जाते.१०दिवस हा उत्सव साजरा केला जातो. 


  • मे-जून महिन्यात वसंतोत्सवम (Vasanthotsavam) उत्सव साजरा केला जातो.१०दिवस चालतो वैशाख महिना सुरू झाला की संपतो. 


  • थिरुक्कल्याणम(Thirukkalyanam) नामक उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो जो 17 दिवस सुरू असतो. हा उत्सव पाहण्यासाठी जगभरातून खुप मोठ्या संख्येने पर्यटक येतात. 



पाहण्यासारखी इतर प्रसिद्ध ठिकाणे:-




  • इंदिरा गांधी सेतु (Indira Gandhi Setu)

  • अदम्स ब्रिज (Adam's Bridge)

  • पामबन ब्रिज (Pamban Bridge)

  • अग्निथीर्थम  (Agnitheertham)

  • अरियामन बीच (Ariyaman beach)



कुठे राहाल:-


रामेश्वरम हे एक धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने कमीत कमी खर्चात राहण्यासाठी धर्मशाळा व भक्तनिवास मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच मध्यम बजेट व जास्त बजेट असणारी हॉटेल्स मुख्य मंदिरापासून हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहेत.



कधी जाल:-


ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी रामेश्वरम पर्यटना साठी उत्तम मानला जातो.



कसे जाल:-


विमान सेवा:-


सर्वात जवळचा विमानतळ मदुराई आहे.भारतातील प्रमुख शहरातून मदुराई साठी नियमित विमानसेवा उपलब्ध असते.



रेल्वे सेवा:-


रेल्वेने रामेश्वरम जाणे हे अविस्मरणीय समुद्रामध्ये तयार केलेल्या दोन किलोमीटर लांबीच्या पंबन समुद्र सेतू वरून ज्यावेळी रेल्वे जाते.त्यावेळी दोन्ही बाजूला अथांग सागर पाहून अंगावर रोमांच उभे राहतात.


रामेश्वरम ला दिवसा पोहोचणार्या रेल्वेने प्रवास करण्याचा सल्ला मी तुम्हाला देईन,कारण दिवसा पंबन पुलावरील रेल्वे प्रवास खुप रोमांचक अनुभव असतो.


तिरुवनंतपुरम,कोची,चेन्नई,बंगलुरू,पाँडिचेरी, मदुराई, कोइंबतूर, त्रिची, चेन्नई, तंजावर,कन्याकुमारी या मुख्य शहरातून रामेश्वर शहराशी जोडलेल आहे.तसेच भारतातील इतर अनेक शहरांशी लोहमार्गाने जोडले गेले आहे.



रस्ता सेवा:-


तिरुवनंतपुरम,कोची,चेन्नई,बंगलुरू,पाँडिचेरी, मदुराई, कोइंबतूर, त्रिची, चेन्नई, तंजावर

कन्याकुमारी या मुख्य शहरातून रामेश्वर साठी खाजगी व राज्य परिवहन मंडळाच्या बस मिळतात.



हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...