google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : हैदराबाद | Hyderabad

माझी ब्लॉग सूची

शनिवार, २ एप्रिल, २०२२

हैदराबाद | Hyderabad

हैदराबाद हे शहर तेलंगण राज्याची राजधानी असून मुसी नदीच्या तीरावर वसलेले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हैदराबाद हे देशातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.


हैदराबाद हे शहर तेलंगण राज्याची राजधानी असून मुसी नदीच्या तीरावर वसलेले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हैदराबाद हे देशातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. येथे औषधनिर्माण, जैवविज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांनी आपले जाळे विणले आहे. विशेष आर्थिक क्षेत्र व हायटेक सिटीच्या निर्मितीनंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली कार्यालये हैदराबादला सुरू केली. या शहरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे जगप्रसिद्ध आहेत.


गोलकोंडा किल्ला 

गोलकोंडा किल्ल्याची निर्मिती काकतीया राजवटीत झाली. त्यानंतर बहमनी साम्राज्यातही काही काळ हा किल्ला होता. कुतूबशाही साम्राज्याची राजधानी म्हणून गोलकोंडा किल्ला ओळखला जातो. ध्वनी परावर्तन हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य असून टाळी वाजवल्याचा आवाज एक कि.मी. अंतरावरही ऐकू येतो. 


भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. प्राचीन काळी हिरे-जडजवाहीर यांचे खरेदी-विक्री केंद्र म्हणून गोलकोंडा किल्ला ओळखला जाई. कोलूर ही हिऱ्यांची खाण याच परिसरात असून जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा याच खाणीत सापडला व गोलकोंडा किल्ल्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आला होता.


फलकनुमा पॅलेस

उंच ठिकाणी असल्यामुळे परिसराचे अत्यंत सुंदर दृश्य या ठिकाणहून पाहू शकतो,फलकनुमा याचा अर्थ होतो,आकाशाचा आरसा.याची निर्मिती नवाब वकार उल उमर यांनी केली.ते निजामाचे वजीर होते.


इटालियन पद्धतीने बांधकाम केलेली पॅलेसची वास्तू अत्यंत सुबक व आकर्षक आहे.३२ एकर जागेत या पॅलेस ची उभारणी करण्यात आली असून चारमिनार पासून ५ कि.मी. अंतरावर आहे.या ठिकाणी दररोज सायंकाळी लाईट आणि साउंड शो सादर केला जातो,ज्यामध्ये गोवळकोंडा किल्ल्याचा इतिहास दाखवला जातो.


सालारजंग म्युझियम 


हैदराबाद शहरातील मुसा नदीच्या तीरावर दार-उल-शीफामध्ये हे संग्रहालय आहे. 


भारतातील प्रमुख तीन संग्रहालयांपैकी एक संग्रहालय म्हणून सालारजंग संग्रहालय ओळखले जाते. तसेच एका व्यक्तीने जमवलेल्या वस्तूंचे जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणूनही याचा नाव लौकिक आहे.

प्रवेश शुल्क

सर्वसामान्यांसाठी 10 रु

परदेशी नागरिकांसाठी रु.150

ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना 50% सवलत दिली जाते.

गणवेशातील संरक्षण कर्मचार्‍यांना, संघटित शेतकरी पक्ष आणि 12 वर्षांखालील मुलांना देखील 50% सवलत दिली जाते.

'बाल सप्ताह' (नोव्हेंबर 14-20) 12 वर्षांपर्यंतच्या शाळेतील मुलांसाठी शिक्षकांसह मोफत प्रवेश

'म्युझियम वीक' (8-14 जानेवारी) रोजी जनतेला प्रवेश तिकिटांमध्ये सवलत देण्यात आली आहे.

फोटोग्राफी: मोबाईल फोटोग्राफीसाठी 20 रु


कुतुबशाही मकबरा 

हे हैदराबादमधील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. कुतुबशाही मकबरा हैदराबादच्या संस्थापक राजघराण्यातील शासकांच्या अंतिम विश्रामस्थानाचे प्रतिनिधित्व करते.


पर्शियन, हिंदू आणि पठाण स्थापत्य रचनांमध्ये सर्वात प्रामाणिक, कुतुबशाही मकबरा राज्यकर्त्यांनी स्वतः बांधला होता. या थडग्या सात कुतुबशाही राजांना समर्पित आहेत, ज्यांनी 170 वर्षांहून अधिक काळ गोलकोंड्यावर राज्य केले

वेळ: सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6

प्रवेश शुल्क: कोणतेही शुल्क नाही

फोटोग्राफी: परवानगी आहे, 20 रुपये प्रति कॅमेरा.30.


बिर्ला सायन्स म्युझियम 

हे जगभरातील सर्वोत्कृष्ट दर्जाच्या विज्ञान संस्थांपैकी एक आहे, हे भारतातील सर्वात व्यस्त ठिकाणांपैकी एक आहे. 


हे विश्वातील अनेक रहस्ये उलगडणाऱ्या नक्षत्रांसह विज्ञान संपूर्ण अन्वेषण देते. येथील ‘डायनॉसॉरियम’ नावाचे नैसर्गिक इतिहासाचे दालन पाहण्यासारखे आहे. अनेक सुंदर भित्तिचित्रे आहेत जी भारतीय राज्यांची सुंदर भित्तिचित्रे प्रदर्शित करतात.

वेळ: सकाळी 10:30 ते रात्री 8, आठवड्याचे सर्व दिवस

प्रवेश शुल्क:

संग्रहालयासाठी 50 रु

तारांगणासाठी 50 रु

छायाचित्रण: परवानगी आहे


नेहरू झुलॉजिकल पार्क 


हैदराबादमधील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या स्थळांमध्ये नेहरू झुलॉजिकल पार्कचा समावेश होतो. 


300 एकर पेक्षा जास्त जागेत पसरलेल्या या पार्कमध्ये एक हजारपेक्षा पेक्षा जास्त वन्यजीव संरक्षित करून ठेवलेले आहेत. यामध्ये सिंह, वाघ, अस्वल, जिराफ, चिंपांझी, बिबट्या, मगरी, विषारी व बिनविषारी सापांचे असंख्य प्रकार, पक्ष्यांचे प्रकार पाहायला मिळतात. छोट्या आगगाडीतून या पार्कची भटकंतीही करता येते.

वेळ:

एप्रिल-जून: सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30,

जुलै - मार्च: सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5

दर सोमवारी बंद


बिर्ला मंदिर 


हुसेनसागर लेकच्या बाजूलाच उंच टेकडीवर बिर्ला मंदिर आहे. पांढऱ्याशुभ्र संगमरवरात तयार केलेले हे मंदिर दाक्षिणात्य बांधणीत असून, अत्यंत सुंदर दिसते. 


संगमरवरावर केलेले नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. या मंदिरात भगवान वेंकटेश्वराची मूर्ती असून ती हुबेहूब तिरुपती बालाजीच्या मूर्तीसारखी आहे. या मंदिराच्या परिसरातून हुसेनसागर लेक व हैदराबाद शहराचे मनोहारी दृश्‍य पाहायला मिळते.


हुसैन सागर

हैद्राबाद व सिकंदराबाद या जुळ्या शहरांच्या दरम्यान असलेले हुसेनसागर लेक हे आशिया खंडातील सर्वात मोठे मानवनिर्मित लेक (तलाव)आहे.याची निर्मिती सन १५६२ मध्ये इब्राहीम कुली कुतुबशाह ने करून घेतली.या तलावाच्या मध्यभागी गौतम बुद्धांचा १६ मीटर उंचीचा पुतळा आहे.


या तलावात नौकानयनाची सोय असून सायंकाळच्या वेळी तलावात केलेले बोटिंग अविस्मरणीय ठरते.या लेकच्या परिसरात एन टी आर गार्डन,संजीवा पार्क,लुम्बिनी पार्क या प्रसिध्द बागा आहेत.पर्यटकांसाठी हुसेनसागर लेक हे भटकंतीसाठी व निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

वेळा: 1 pm - 9 pm, आठवड्याचे सर्व दिवस

प्रवेश शुल्क: रु.10 (नौकाविहार)

छायाचित्रण: परवानगी आहे


उस्मान सागर तलाव 

हैदराबादसून फक्त २२ किमी अंतरावर असलेल्या हा तलाव ४६ स्क्वेअर किमी जागेवर पसरलेला आहे. या तलावाचे नाव उस्मान सागर हे हैदराबादचे निजाम यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. 


हैदराबादच्या जवळ असलेल्या सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी ही एक जागा आहे. फॅमिली पिकनीकसाठी ही जागा परफेक्ट डेस्टिनेशन आहेच, त्यासोबतच येथे सुर्यास्त पाहण्याचा वेगळाच आनंद आहे. 


सांघी मंदिर 

तेलंगानाच्या सर्वात लोकप्रीय तीर्थस्थळांपैकी एक असणारे हे मंदीर देखील हैदराबादपासून ३० किमी अंतरावर आहे. 


सांघी मंदीर पंधरा फूट लांबीचे असून चोल चालुक्य स्थापत्य शैलीत बांधण्यात आलेले आहे. सांघी मंदिर परिसरात असलेल्या इतर वेगवेगळ्या मंदिरांना देखील भेट देऊ शकता. 


चिलुकुर बालाजी मंदिर 


उस्मानसागरच्या तटावर वसलेल्या छोट्याशा गावात तब्बल पाचशे वर्ष जूने चिलुकुर बालाजी मंदिर आहे, हे ठिकाण हैदराबादच्या जवळच असलेलं सर्वात प्रेक्षणीय ठिकाण आहे. अशी मान्यता आहे की येथे बालीजी भक्तांची प्रत्येक मनोकामना पुर्ण होते आणि जे कोणी तिरुपतीला जाऊन दर्शन घेऊ शकणार नाहीत त्या सगळ्यांच्या इच्छा या ठिकाणी पुर्ण होतात. हे मंदिर हैदराबादपासून फक्त २८ किमी दूर आहे. 


नागार्जुनसागर

हे नागार्जुनसागर धरण म्हणूनही ओळखले जाते – भारतातील पहिल्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक. धरणाच्या आजूबाजूला नागार्जुनसागर हे जगातील तिसरे मोठे मानवनिर्मित सरोवर आहे. 


आंध्र प्रदेशातील एक प्रमुख बौद्ध स्थान, नागार्जुनसागर हे नदी खोऱ्यातील संस्कृतींचे जन्मस्थान देखील आहे. येथील शांततापूर्ण वातावरणाने प्रेरित होऊन बौद्धांनी या भूमीला विद्येचे उत्तम केंद्र बनवले. चार प्रमुख विहारांपैकी एक विहार येथे स्थापन झाला. 


हैदराबादपासून नागार्जुनसागर हे अंतर १६५ किलोमीटर आहे. ऑक्टोबर ते मार्च या काळात या समुद्राला भेट देता येते. जर एक दिवस वेळ असेल तर  संपूर्ण कुटुंबासह या महासागराला भेट देऊ शकता.


श्रीशैलम


जगातील सर्वात पवित्र शिव मंदिरांपैकी एक, सपाट टेकडीवर वसलेले आहे. कुर्नूलमधील नल्लमल्ला पर्वतरांगांच्या घनदाट जंगलात वसलेले हे मंदिर पुराणातील व्यास ऋषींच्या अवतरणातही दिसते.


मंदिराच्या उजवीकडे कृष्णा नदी वाहते, जी भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये, या मंदिरातील आखाडे आणि अभिषेकांना हिंदूंमध्ये सर्वोच्च पूजनीय स्थान आहे. मुख्य गर्भगृहाव्यतिरिक्त, श्रीशैलमच्या आसपासचा परिसर अनेक आकर्षणांचे केंद्र आहे. या मंदिराच्या धार्मिक दर्शनाला खूप महत्त्व आहे.

अंतर: 213 किमी


रामोजी फिल्म सिटी 


हैदराबाद शहरापासून तब्बल ४१ किमी अंतरावर वसलेली रामोजी फिल्म सिटी हे पर्यटकांसाठी आकर्षनाचे केंद्र आहे. भारतात सर्वात मोठी असलेली हि फिल्म सिटी तब्बल २५०० एकर क्षेत्रात पसरलेली आहे. चित्रपट निर्माता रामोजी राव हे रामोजी फिल्म सिटीचे मालक आहेत. अनेक प्रसिध्द चित्रपटांचे शुटिंग या फिल्मसिटीत झाले आहे. येथे प्रवेशासाटी  ९००-१००० रुपये प्रवेश फी द्यावी लागेल. 


हैद्राबाद-विजयवाडा मार्गावर ही फिल्म सिटी असून इथे पोचण्यासाठी २० मिनिटे लागतात.अनेक दक्षिण भारतीय,हिंदी,मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे.इथे चित्रपटाच्या शुटींग साठी तयार केलेले नकली विमानतळ,रेल्वेस्टेशन,बस,स्टेशन,हॉस्पिटल,शाळा,रस्ते,इमारती,झोपडपट्टी,तुरुंग इत्यादी गोष्टी पाहणे वेगळाच अनुभव देते. 


या फिल्म सिटी चे पर्यटन घडवण्यासाठी खास बसेस ची सोय असते,ज्यामध्ये गाईड आपल्याला प्रत्येक स्थळाची माहिती देतो.संपूर्ण फिल्म सिटी पाहण्यासाठी अख्खा दिवस कमी पडतो.

वेळ: आठवड्याचे सर्व दिवस.

शुल्क: प्रौढ व्यक्ती(विना भोजन) ८०० रु.

     लहान मुल(३ ते १२ वर्ष) : ७०० रु.

     प्रौढ व्यक्ती( भोजनासह) रामोजी स्टार  :१७९९ रु.

    लहान मुल(३ ते १२ वर्ष) ( भोजनासह) रामोजी स्टार :१४९९ रु.


भोंगीर किल्ला


 हैदराबादपासून तब्बल ५० किमी अंतरावर असलेला हा किल्ला ऐतिहासिक ठेवा आहे. हा किल्ला चालुक्य प्रशासकांनी बांधला होता.


या अनोख्या अंड्याच्या आकाराचा हा किल्ला ट्रेकिंगसाठी चांगलाच प्रसिध्द आहे. हैदराबादच्या जवळपास सर्वाधीक पाहिल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.


मक्का मशीद 


 हैद्राबाद चा ६ वा कुतुबशाह सुलतान महमद कुतुबशाह ने ४०० वर्षापूर्वी या मशिदीची निर्मिती केली.जवळजवळ ८००० मजूर या साठी वापरले गेले.तीनमजली रचना असलेली ही मशीद एका अखंड शिलाखंडातून कोरून तयार केलेली आहे.


स्नो वर्ल्ड  


हैद्राबाद मध्ये कुटुंबासह मौजमजा करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे स्नो वर्ल्ड होय,विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार वातावरणात बर्फामध्ये खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो.या स्नो वर्ल्ड मधील तापमान उणे ५ डिग्री इतके असते.बर्फात खेळवायचे खेळाचे विविध प्रकार इथे आहेत.


वेळ: आठवड्याचे सर्व दिवस.एक-एक तासाची वेळ मर्यादा

शुल्क: प्रौढ व्यक्ती: ४५० रु.

     लहान मुल : २५० रु.

     विध्यार्थी (इ.१० पर्यंत) :२५० रु.( ओळखपत्र आवश्यक)

     विद्यार्थी (कॉलेज ) : ३५० रु. ( ओळखपत्र आवश्यक)


प्रसिद्ध पदार्थ:-

हैद्राबाद हे आपल्या अनोख्या खाद्यसंस्कृती साठी जगप्रसिद्ध आहे. खाद्यपदार्थात,मुघल,पर्शियन,इराणी,अरबी,तुर्किश,तेलुगु संस्कृतीचा स्वाद चाखायला मिळेल.

हैद्राबाद पर्यटन करण्यासाठी आलेला पर्यटक हैद्राबादी बिर्याणी,हैद्राबादी हलीम व इराणी चहा चा आस्वाद घेतल्याशिवाय परत जात नाही.हे पदार्थ सर्व हॉटेल्स मध्ये मिळतात पण खास स्थानिक स्वाद हा रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या छोट्या हॉटेल मध्ये नक्की घ्यावा.


कधी जाल:-

ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी हैद्राबाद पर्यटनासाठी अत्यंत सुखद असून या काळात हैद्राबाद चे वातावरण आल्हाददायी असते.तापमान १४ डिग्री ते २९ डिग्री च्या दरम्यान असल्याने लहान-मोठ्यांसाठी अनुकूल असते.

कसे जाल:-

विमान सेवा:-

हैद्राबाद हे भारतातील प्रमुख शहर असल्याने देश-विदेशातील प्रमुख शहरांशी हैद्राबाद हे हवाई मार्गाने जोडले गेले आहे.हैद्राबाद चा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून २० कि.मी.अंतरावर असून इथून देशातील व विदेशातील शहरांसाठी दररोज विमाने ये-जा करतात.मुंबई पुणे,नागपूर वरून हैद्राबाद साठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे.


रेल्वे सेवा:-

हैद्राबाद मध्ये तीन मुख्य रेल्वे स्थानके आहेत.हैद्राबाद रेल्वेस्टेशन,सिकंदराबाद रेल्वेस्टेशन व काचीगुडा रेल्वेस्टेशन. मुंबई,दिल्ली,कोलकाता,चेन्नई,पुणे,नागपूर,बेंगळूरु,इत्यादी शहरासाठी दररोज रेल्वे सुटतात.

मुंबई व पुण्यावरून हैद्राबाद साठी जाणाऱ्या सिकंदराबाद दुरांतो,पुणे-सिकंदराबाद शताब्दी,हुसेनसागर,हमसफर,हैद्राबाद,कोणार्क,विशाखापट्टणम,काकिनाडा या एक्स्प्रेस गाड्या प्रसिध्द आहेत.


रस्ता सेवा:-

विशाल बस टर्मिनलमुळे, शहर शेजारच्या औरंगाबाद, बंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, तिरुपती आणि पणजी सारख्या शहरांशी चांगले जोडलेले आहे. 

महाराष्ट्रातून हैद्राबाद साठी मुबलक प्रमाणात राज्य परिवहन मंडळाच्या व खासगी वोल्वो उपलब्ध असतात.

मुंबई,पुणे,औरंगाबाद,सातारा,कोल्हापूर, सांगली,सोलापूर,नागपूर या शहरातून हैद्राबाद साठी साध्या व वातानुकुलीत शिवशाही बस हैद्राबाद साठी दररोज सेवा देत असतात.

बस टर्मिनलचे व्यवस्थापन आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) द्वारे केले जाते.स्लीपर, डिलक्स, सुपर डिलक्स, वातानुकूलित आणि व्होल्वो बसमधून निवडू शकता ज्या राज्य आणि खाजगी दोन्ही कंपन्यांद्वारे चालवल्या जातात.


सेल्फ ड्राईव्ह:-

हैदराबादमध्ये चांगले रस्ते आहेत आणि ते राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाणपुलांशी चांगले जोडलेले आहे. हैदराबाद, नागपूर, पुणे (NH9 मार्गे), मुंबई (एक्सप्रेसवे मार्गे), वारंगल आणि बंगलोर (NH7 मार्गे).


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...