google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : मेघालय | Meghalaya

माझी ब्लॉग सूची

सोमवार, १४ मार्च, २०२२

मेघालय | Meghalaya

संस्कृत भाषेतील मेघालय या शब्दाचा अर्थ “ढगांचे घर” असा होतो आणि नावाप्रमाणेच मेघालय मध्ये आपल्याला आसपास ढग तरंगताना पाहायला मिळतात.

मेघालयतील सुंदर धबधबे, उंच पर्वत शिखरे, गवताळ कुरणे व सदाहरित जंगले पाहिल्यानंतर पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो.


मेघालय मध्ये प्रामुख्याने उष्णकटिबंधीय वने आढळतात. ज्यामध्ये पक्षी सस्तन प्राणी.कीटक व सरपटणारे असंख्य जीव आढळतात.


पर्यटनाच्या बाबतीत मेघालय हे पूर्व भारतातील प्रमुख राज्य असल्याने वर्षभर पर्यटकांची गर्दी या राज्यात पाहायला मिळते.


मेघालय मधील प्रमुख पर्यटनस्थळे:-

चेरापुंजी

शहर मेघालयातील चेरापुंजी हे शहर पर्यटनाच्या बाबतीत देश-विदेशात प्रसिद्ध असून एकेकाळी जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. 


मेघालयातील चेरापुंजी हे शहर एक अद्भुत पर्यटन स्थळ असून या ठिकाणी कोसळणारे धबधबे, जगप्रसिद्ध गुहा व निसर्ग सौंदर्याचा आविष्कार पाहायला मिळतो.सतत कोसळणाऱ्या जलधारा व धुंद धुके पर्यटन पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात. इथल्या स्वच्छ व तजेलदार हवेत घालवलेला वेळ मनाला शांती मिळवून देतो.


 या ठिकाणी अनेक धबधबे व नैसर्गिक गुहा असून यांचे पर्यटन करणे हा एक विलक्षण अनुभव ठरतो. चेरापुंजी चे जुने नाव सोहरा असे होते व हे शहर ब्रिटिश काळामध्ये व्यापारासाठी ओळखले जात होते. 


मौसिनराम

वर्षा सहलीचा अनुभव घ्यायचा असेल तर मेघालयातील मौसिनराम हे योग्य ठिकाण राहील कारण जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून मौसिनराम ओळखले जाते.


 चेरापुंजी व मौसिनराम ही दोन्ही गावे शेजारी शेजारीच आहेत. मौसिनराम मधील ‘मौ’ याचा अर्थ दगड असा होतो. या गावाचा आकार शिवलींगा प्रमाणे असून प्राचीन परंपरा व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी पर्यटक आवर्जून मौसिनराम ला भेट देतात.


तुरा 

हे शहर मेघालयाच्या वेस्ट गारो हिल्स मध्ये असून एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते कारण या शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर नोकरेक नॅशनल पार्क असून या राष्ट्रीय उद्यानात असंख्य प्रकारचे वन्यजीव आढळतात. 


पर्यावरण प्रेमी व वन्यजीव प्रेमी मेघालयातील तूरा या शहराला आवर्जून भेट देतात. डोंगर रांगामध्ये वसलेले हे शहर निसर्गसौंदर्याने युक्त असून इथली शांतता मनाला एक वेगळेच समाधान देते.


डावकी


मेघालय राज्याच्या दक्षिणेला असलेले व बांगलादेशच्या सीमेवरील डावकी हे पर्यटन स्थळ पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण इथे असलेली उमंगोट नदी व या नदीचे नितळ असे पाणी. 


या नितळ निळ्या पाण्यामध्ये नावेतून सफर करणे हा एक विलक्षण अनुभव असतो. पाच -दहा फूट खोलीवरील नदीचा तळ अत्यंत स्पष्टपणे पाहता येतो. डावकी हे भारत आणि बांगलादेश यांच्यामधील प्रमुख व्यापार केंद्र म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी आपण बांगलादेश चा भूभाग जवळून पाहू शकतो.


उमियम तलाव

शिलॉंग च्या उत्तरेस 12 किलोमीटर अंतरावर असलेला हा तलाव मानवनिर्मित तलाव असून शिलॉंग शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. 


या तलावांमध्ये नौकानयन करणे व उद्यानामध्ये भ्रमंती करणे पर्यटकांना आवडते.हा तलाव शिलॉंग मधील पर्यटकांसाठी पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो.


डबल डेकर ब्रिज

चेरापूंजी पासून 20 किलोमीटर अंतरावरील नॉनग्रीएत हे छोटेसे गाव हल्ली खूप चर्चेत आहे कारण या गावाजवळच झाडांच्या मुळांपासून तयार करण्यात आलेला डबल डेकर ब्रिज अर्थात दुमजली ऑल पाहण्यासाठी पर्यटक भेट देतात. 


पाण्याच्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या मुळ्या एकमेकांमध्ये गुंफून त्यांच्यापासून तयार करण्यात आलेला हा पूल मानवाने तयार केलेला एक विलक्षण अविष्कार म्हणावा लागेल. असे अनेक एकमजली व दुमजली पूल नॉनग्रीएत या गावाच्या परिसरात पाहायला मिळतात. यावरून या परिसरातील लोकांची कल्पकता दिसून येते. या पुलापर्यंत जाण्यासाठी पायी दोन ते तीन तास ट्रेक करावा लागतो.  


मावलिनामग 


गाव हे मेघालयातील प्रमुख आकर्षण स्थळ म्हणून ओळखले जाते अत्यंत लहान असणारे गाव गेल्या काही वर्षापासून देशाच्या व जगाचा नकाशा मध्ये आपली ओळख दाखवून आहे कारण 2003 मध्ये या गावाने आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून पुरस्कार प्राप्त केला आहे. 


100 च्या आसपास घरी असणाऱ्या या गावाचा साक्षरता दर शंभर टक्के इतका आहे. या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा सून सुपारी उत्पादन इथे घेतले जाते.भारतातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून देखील ओळखले जाते या गावाची स्वच्छता पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक या गावाला हजेरी लावतात कोणत्याही प्रकारचा कचरा व टाकाऊ घटक इथे पहायला मिळणार नाही 


मौसी माई


चेरापूंजी पासून सहा किलोमीटर अंतरावर असणारी मौसमआई ही गुहा अत्यंत रहस्यमय व रोमांचकारी अनुभव देणारी गुहा आहे. चून खडकापासून तयार झालेली ही एक नैसर्गिक गुहा असून या गुहेमध्ये खडकांचे विविध रूपे पाहता येतात व भुलभुलय्या चा अनुभव घेता येतो.


एकशे पन्नास मीटर लांबी असणारी गुहा हातून आकाराने खूप मोठी असून पर्यटन विभागाने या गुहेमध्ये प्रकाशाची व मार्गीका ची सोय केली आहे या गुहेमध्ये फिरणे हाय विलक्षण अनुभव असतो. 


नोहीलीकाई धबधबा


मेघालय पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक धबधबा आवर्जून पाहतात कारण हा धबधबा जगातील चौथा सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो या धबधब्याची उंची 335 मीटर इतकी असून वर्षभर हा धबधबा पाण्याने ओसंडून वाहत असतो.


इलेफंट फॉल्स

शिलॉंग शहराच्या पूर्वेला 12 किलोमीटर अंतरावर असणारा इलेफंट फॉल्स अर्थात हत्ती धबधबा मेघालयातील प्रसिद्ध धबधबा आहे. 


इंग्रज कालखंडामध्ये इथे असणाऱ्या दगडाच्या हत्ती सारख्या दिसणाऱ्या आकारावरून इंग्रजांनी या धबधब्याला एलिफंट फॉल्स असे नाव दिले.नितळ निळे थंडगार पाणी व सभोवतालची हिरवीगार वनराई पर्यटकांचे मन मोहन घेते.


लेडी हैदरी पार्क


शिलॉंग शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले लेडी हैदरी पार्क हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात शांत व एकांतात काहीवेळ घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे या प्रांताच्या तत्कालीन गव्हर्नरांच्या पत्नी अर्थात प्रथम महिला लेडी हेद्री या एक निसर्गप्रेमी होत्या. त्यांना हे उद्यान समर्पित केलेले आहे. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळणी असून चालण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे.या पार्क मध्ये एक प्राणी संग्रहालय असून त्यामध्ये 73 प्रकारचे पक्षी व शंभर प्रकारचे सरपटणारे जीव पाहता येतात.


डॉन बॉस्को संग्रहालय


शिलॉंग शहरातील डॉन बॉस्को संग्रहालय मेघालयातील प्रसिध्द वस्तू संग्रहालय असून उत्तर-पूर्व भारताबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या वस्तू संग्रहालयात पाहायला मिळते.यामध्ये पारंपारिक व प्राचीन काळातील लोकांचे पोशाख,भांडी,घरगुती साहित्य व शस्त्रे इत्यादी पाहायला मिळतात.


शिलॉंग पिक


शिलॉंग शहरापासून १० कि.मी.अंतरावर असणारी शिलॉंग पिक ही टेकडी शिलॉंग मधील प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे.


समुद्रसपाटीपासून १९६६ मीटर उंचीवर असलेल्या या टेकडीवरून शिलॉंग शहर व आसपास चे विलोभनीय दृश्य पाहता येते.


कधी जावे:-

मेघालय हे उत्तर-पूर्वेकडील राज्य असल्याने या राज्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी हा ऑक्टोबर ते मे असा आहे.या काळात पावसाचे प्रमाण कमी असते.व वातावरण आल्हाददायी असते. वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर जून ते सप्टेबर हा काळ योग्य ठरेल.मेघालयातील गुहा पाहण्यासाठी मार्च ते मे हा कालखंड उत्तम ठरेल.


प्रसिध्द खाद्यपदार्थ:

मेघालयात प्रामुख्याने गारो,खासी व जैंतिया या जमातीचे लोक राहतात,व प्रत्येक जमातीचे खाद्यपदार्थ व ते बनवण्याची पद्धत यामध्ये विविधता असते.तरीही सर्व जमातींच्या आहारात प्रामुख्याने भात,विविध प्रकारच्या पालेभाज्या,मासे व मांस हे घटक असतात.मेघालयामध्ये अन्य पर्वतीय प्रदेशा प्रमाणे मांसाहाराचे प्रमाण जास्त आढळून येते व मांसाहारात चिकन व पोर्क चा वापर जास्त प्रमाणात होतो.मेघालयाच्या भटकंती वेळी आवर्जून खाल्लेच पाहिजेत असे काही पदार्थ पुढील प्रमाणे जादोह,नाखीम बित्ची,दोखलीहा,पुमालोई,बांबू शूट्स,मोमो इत्यादी.


कसे जाल:

उत्तर-पूर्व भारताचे प्रवेशद्वार म्हणून गुवाहाटी या शहरास ओळखले जाते.व गुवाहाटी वरून मेघालयची राजधानी शिलॉंग ११० कि.मी.अंतरावर आहे.

विमान सेवा:

शिलॉंग चा उमरोई विमानतळ शहरापासून ३० कि.मी.अंतरावर असून मर्यादित प्रमाणात हवाई वाहतुकीसाठी उपलब्ध आहे.सध्या फक्त कोलकाता व दिल्ली इथून नियमित विमानसेवा शिलॉंग साठी सुरु आहे.पण शिलॉंग पासून ११० कि.मी.अंतरावर असणारा गुवाहाटी विमानतळ मुंबई,पुणे नागपूर सह देशातील प्रमुख शहरांशी जोडला गेला असून आपण सहजपणे गुवाहाटी ला विमानाने जाऊ शकतो.गुवाहाटी विमानतळावरून शिलॉंग साठी कॅब व बसेस सहज मिळतात.


रेल्वे सेवा:-

मेघालय मध्ये प्रमुख रेल्वे स्थानक नाही. गुवाहाटी रेल्वेस्टेशन वर उतरून बसने अथवा मोटारीने शिलॉंग ला जाऊ शकतो.


रस्ता सेवा:-

रस्ता मार्गाने मेघालय ला कसे जावे:रस्तामार्गाचे विस्तृत जाळे पसरले असून विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बस,मोटार अथवा दुचाकीने प्रवास करणे सहज शक्य होते.

गुवाहाटी वरून शिलॉंग साठी बसेस व पब्लिक सुमो मोटारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात व दोन ते तीन तासात आपण शिलॉंग ला पोहोचू शकतो.शिलॉंग वरून चेरापुंजी,तुरा अथवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पब्लिक सुमो मिळतात.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...