मुघल सम्राटांसाठी प्रयाग हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. सम्राट अकबराने या शहराचे नांव १५७५ साली इलाहाबाद असे केले. इलाहाबाद याचा अर्थ महत्त्वाचे ठाणे. त्याने येथे सुंदर किल्लाही बांधला. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात या शहराने फार महत्त्वाची भूमिका बजावली. हे शहर महत्त्वाचे राष्ट्रीय स्थानच बनले होते. अनेक विचारवंत, कवी, नेते, लेखक या शहरात वास्तव्यास होते. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान याच शहरात होते आज तेथे संग्रहालय आहे. ब्रिटीश काळातही या शहराचे लष्करीदृष्ट्या असलेले महत्त्व
प्रयाग राज
हिंदू धर्मानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टि कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ येथे केला होता. गंगा, यमुना व लुप्त सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमामुळे हे शहर हिंदूंचे एक् महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, यमुना आणि गुप्त रूपातील सरस्वती यांचा संगम येथेच झाला आहे आणि त्यामुळे ते पवित्र तीर्थस्थळ आहे. वेदात या शहराचे उल्लेख आहेत तसेच रामायण महाभारतातही आहेत. वर्षभर सतत कोणत्या ना कोणत्या तरी यात्रा येथे सुरू असतात. हजारो पर्यटक वर्षभर या स्थळाला भेट देत असतात. वर्षातून होणारा माघमेळा आणि बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा ही साधूसंतांसाठी जशी मोठी पर्वणी असते तशीच भाविकांसाठीही असते.
देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेला अमृतकुंभ आणि तो नेत असताना चार ठिकाणी पडलेले अमृताचे चार थेंब जेथे जेथे पडले तेथे तेथे कुंभमेळा भरविला जातो. हरद्वार, नाशिक, प्रयाग म्हणजेच अलाहाबाद आणि उज्जैन या ठिकाणी हे थेंब पडले असा समज आहे. दसर्या च्या वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर रामलिला साजरी होते आणि रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पर्यटक आवर्जून येतात. त्याचबरोबर या काळात दुर्गापूजेचा उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी वेणीदान करण्याची प्रथा आहे. म्हणजे सुवासिनी आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी नावेने जाऊन आपल्या वेणीची बट तेथे कापतात आणि ती प्रवाहात विसर्जित केली जाते. वेणी घालताना तीन पेड असतात पण प्रत्यक्षात वेणी दुपेडी दिसते.
झनाना पॅलेस
अलाहाबाद फोर्ट आणि दोन नद्यांच्या किनार्यातवरचा झनाना पॅलेस पाहण्यासारखा. याच ठीकाणी अक्षय वटवृक्ष आहे.
हिंदू धर्मियांनी पवित्र मानलेला हा वृक्ष मुघल सम्राटांनी अनेकवेळा तोडला. त्याची नामोनिशाणी मिटावी यासाठी जेथे हा वृक्ष होता तेथे दगडी फरसबंदी करण्यात आली. मात्र तरीही पुन्हा त्याच जागी हा वटवृक्ष आला आणि आजही तो त्याच जागी आहे.
अशोक स्तंभ,
जनाना पॅलेसच्या प्रवेश जागेजवळ असलेला ३५ फूट उंचीचा अशोक स्तंभ, गुप्त युग मधील एक महत्वपूर्ण अवशेष, इलाहाबाद स्तंभ मौर्य सम्राट अशोक द्वारा स्थापित अनेक स्तंभपैकी एक आहे. वलुकशम दगडापासून निर्मित ही संरचना ई स पू 4 आणि 17 वे शतकतील समुद्रगुप्त आणि जहांगीर युगातील शिलालेख आहेत. इलाहाबाद किल्ला मूळ जागेपासून अशोक स्तंभ स्थानांतरित केला गेला होता. जी आता भारतीय सेना वापरते. इलाहाबाद स्तंभ भेट देण्यासाठी सेनेची परवानगी घ्यावी लागते.
खुसरो बाग
शहाजहानचा मोठा भाऊ खुस्त्रो याने बांधलेली बाग,लुकरगंज मध्ये असणारी खुसरो बाग इलाहाबाद मधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. खुसरो बाग संरचना मध्ये मुगल वास्तुकला पाहू शकता. खुसरो बाग तीन शानदार ढंगात डिजाइन केली गेली आहे. वालुका दगडातील मकबरे आहेत. जे शाह बेगम, खुसरो मिरजा, निथार बेगम सहित मुगल राजघरान्याना श्रद्धांजलि अर्पण करतात. ही बाग पेरू आणि गुलाब साठी एक विस्तृत सुंदर बाग आहे.
स्वराजभवन
स्वराज भवन, जे आज एक प्रसिद्ध इलाहाबाद पर्यटन स्थल आहे. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने मुख्यालय मध्ये बदलले होते.मोतीलाल नेहरू ना परिवाराला राहण्यासाठी हवेली खरेदी करावी लागली.यालाच आनंद भवन देखील म्हटले जाते. आज हे एक ऐतिहासिक गृह संग्रहालय आहे ज्यामध्ये जवाहर तारामंडल सुद्धा आहे.
प्लॅनेटोरियम
या प्लेनेटेरियम मध्ये खगोलीय आणि वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी केला जातो. येथे प्रतिदिन पाच शो चालतात. सोमवार आणि सरकारी सुट्टी दिवशी हे प्लेनेटेरियम बंद असते.
संग्रहालय
इलाहाबाद संग्रहालय हे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधील राष्ट्रीय स्तरीय संग्रहालय आहे. हे आपल्या समृद्ध संग्रह आणि कलेच्या अद्वितीय वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे, आणि सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे वित्तपुरवठा केला जातो.
इलाहाबाद किल्ला
इलाहाबाद मधील प्रयागराज या संगम घाटावर सम्राट अकबर ने या भव्य किल्ल्याची बांधणी केली होती. एक विशिष्ट बनावट, बांधणी आणि शिल्पकारिता साठी ओळखले जाते. नक्षीदार आणि विशायलकाय भिंती वर यमुना नदीच्या लहरी आदळतात. याच्या आत पातालपुरी मध्ये एकूण 44 देवी देवताच्यां मूर्ति स्थापित आहेत. जिथे लोक आज पण पूजा पाठ करतात.
सेंट्स कैथेड्रल चर्च
ऑल सेंट्स कैथेड्रल इलाहाबाद मधील एमजी मार्ग वरील एक शानदार चर्च आहे. हे चर्च पर्यटक आणि तीर्थयात्री मध्ये खूप लोकप्रिय आहे. "चर्च ऑफ स्टोन" म्हणून ही ओळखले जाते. ऑल सेंट्स कैथेड्रल ची स्थापना 1871 मध्ये लेडी मुइर एलिजाबेथ हंटली वेमिस ने केली होती.
हनुमान मंदिर
अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हनुमान मंदिर पाहण्याची संधी होय. हे एक अद्वितीय असे मंदिर आहे, जे वर्षभरातील बहुतांश काळ गंगा नदीच्या पाण्यात बुडालेले असते. अशी हिंदू मान्यता आहे की हनुमानाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी गंगा नदीने पाण्याची पातळी वाढवली आणि त्यामुळे मंदिर पाण्यामध्ये बुडालेले असते. परंतु कुंभमेळ्यादरम्यान मंदिर पाण्याबाहेर येते. या अद्वितीय मंदिरामुळे हनुमानाच्या बसलेल्या स्थितीमधील मूर्तीचे दर्शन घेऊ शकता. (जी 20 फूट उंच आहे)
आवर्जून करा
हिवाळ्याच्या दिवसांत येथे मिळणारे पेरू आवर्जून खावेत अशा अवीट चवीचे असतात. त्याचबरोबर रसगुल्ले, मुघलाई पद्धतीचे पदार्थ, समोसे, लस्सी, रबडी आणि अनेक प्रकारची बर्फी लाजवाब. इतक्या खादडीनंतर अलाहाबादी पान खायलाच हवे.
कसे जाल:-
अलाहाबाद येथे जाण्यासाठी रस्तामार्ग तसेच रेल्वे सोयीच्या आहेत. मुंबईहून एकच विमानही जाते. अन्यथा दिल्लीमार्गे अथवा कलकत्याहूनही जाणे सोयीचे आहे.
कधी जाल:- वर्ष भरात कधीही भेट देऊ शकता.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा