मथुरा येथे बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माची वाढ झाली . मथुरा हे "तिन्ही धर्मांसाठी भक्ती प्रतीके निर्माण करणारे पहिले कलात्मक केंद्र होते.किमान गुप्त कालपर्यंत धार्मिक कलात्मक अभिव्यक्तीचे प्रख्यात केंद्र होते., आणि संपूर्ण उपखंडात प्रभावशाली होते.
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये मथुरा भगवान श्री कृष्ण यांना समर्पित आहे. मथुरा शहर जवळून पवित्र यमुना नदी वाहते.मथुरा शहर भिक्षु आणि अनेक मठ निवासस्थान म्हणून ओळखले जाते. 25 विशाल घाटांची भूमि असून ही एक पवित्र जागा आहे.
मथुरा मधील प्रमुख धार्मिक स्थळे:
कृष्ण जन्मभूमी
श्रीकृष्ण हिंदू धर्मातील देव आहेत. कृष्णाला विष्णूचा 8 वा अवतार मानले जाते. त्याला कन्हैया, श्याम, गोपाल, केशव, द्वारकेश किंवा द्वारकाधीश, वासुदेव इत्यादी नावांनीही ओळखले जाते. त्यांची जन्म भूमी मथुरा.
कृष्णाचे बालपण मथुरेजवळच्या गोकुळात गेले. मथुरा हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या कनिष्क राजवंशांनी स्थापन केलेले शहर आहे आणि आज ते धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर हे भारतीय संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य निर्मिती आणि विकासात मथुरेचे मोलाचे योगदान आहे. आजही या शहराचे नाव महाकवी सूरदास, संगीताचे आचार्य स्वामी हरिदास, स्वामी दयानंद यांचे गुरु स्वामी विरजानंद, कवी रसखान इत्यादी महान व्यक्तींशी संबंधित आहे.
कुसुम सरोवर
मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थान आहे.ब्रज भूमी (व्रजमंडल) प्रदेशात आहे आणि हिंदू धर्मानुसार ,भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपणाचे दिवस येथे घालवले.
हे शहर आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच44) यमुना नदीच्या तीरावर कृष्णाचे जन्मस्थान ,मथुरापासून सुमारे ११-१२ कि.मी. अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेत आहे.या शहरात राधा आणि कृष्ण यांची पूजा करण्यासाठी समर्पित अनेक मंदिरे आहेत.एक शहर असून कृष्णाचे बाललीला स्थळ असल्याचे मानले जाते.
द्वारकाधीश मंदिर
भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर असून देशातील श्रीकृष्णाच्या प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येतात.
मथुरेचा राजा द्वारकाधीश यांचे मंदिर सकाळी सात वाजता उघडते आणि सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत बंद होते. तसेच सायंकाळी चार ते साडेसात या वेळेत शेवटचे दर्शन होते. हे मथुरा आणि संपूर्ण भारतातील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. मथुरेत गेल्यावर या मंदिराचे नक्की दर्शन घ्यावे.
कंस किला
कंस किल्ला यमुना नदी किनारी आहे. आज का किल्ला उध्वस्त स्थितित असून कृष्णाचे मामा कंस याचे घर होते.हिन्दू आणि इस्लाम दोन्ही ही वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
राधा कुण्ड
गोवर्धन पासून 5 किलोमीटर अंतरावर स्थित हे कुंड असून श्रदधाळूंसाठी खूप महत्वाचे आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमहिन्यात येथे वार्षिक उत्सव असतो.लोक या कुंडात स्नान करून पाप मुक्त होतात अशी आख्यायिका सांगितली जाते.
गोवर्धन हिल
उत्तर प्रदेश राज्यातील श्रीकृष्णचरित्रप्रसिद्ध पर्वत. हा मथूरेच्या पश्चिमेस २३ किमी. नैर्ऋत्य ईशान्य ८ किमी. पसरलेला असून याची दंडवती परिक्रमा १९ किमी.ची आहे.
हा वालुकाश्माचा असून सपाट गाळमैदानात एकदम सु. ३० मी.वर आलेला दिसतो. याच्या चढाच्या मध्यावर गोवर्धन हे ९,५६८ (१९७१) लोकवस्तीचे नगर आहे.
श्रीकृष्णाने याला आपल्या करंगळीवर उचलून धरून त्याखाली व्रजवासीजन व त्यांची गायीवासरे यांस आश्रय देऊन इंद्राने रागावून पाडलेल्या मुसळधार पावसापासून सात अहोरात्र त्यांचे रक्षण केले; अशी पुराणातील कथा आहे. याच्यावरील कोवळे गवत व पाने इत्यादींवर गायी पुष्ट होतात म्हणून त्याला गोवर्धन हे नाव पडले.
मथुरा संगीत
ब्रजच्या प्राचीन संगीतकारांची अस्सल माहिती 16 व्या शतकातील भक्तांकडून मिळते. या काळात अनेक संगीतकार वैष्णव संत झाले. संगीत शिरोमणी स्वामी हरिदास जी, त्यांचे गुरु आशुधीर जी आणि त्यांचे शिष्य तानसेन इत्यादींचे नाव सर्वश्रुत आहे. बैजूबावराच्या गुरूला श्री हरिदास जी असेही म्हणतात, परंतु बैजू बावरा कवी अष्टछाप कवी गोविंद स्वामी जी कडून संगीताचा अभ्यास करीत.
निम्बार्क संप्रदायाचे श्री भट्ट या काळात भक्त, कवी आणि संगीतकार झाले. अष्टछाप, सूरदास, नंदादास, परमानंददास जी इत्यादी नामवंत गीतकार कवी असे कीर्तनकार, कवी आणि गायक होते, ज्यांचे कीर्तन बल्लभाकुलच्या मंदिरात गायले जातात. स्वामी हरिदास जी ब्रज संगीताच्या ध्रुपद-धामर गायनाची आणि रास-नृत्य परंपरेचा चालवली.
आराम घाट
मथुरा मधील सर्वात लोकप्रिय विश्राम घाट. येथे भगवान कृष्ण नी मामा कंसचा वध केल्यानंतर विश्राम केला होता. विश्राम घाट आणि जवळच प्रमुख मंदिर आणि इतर प्रेक्षणीय स्थळे आहेत. सकाळी आणि संध्याकाळी होणारी आरती खूप प्रसिद्ध आहे.
रंगभूमि
रंगभूमि या जागेचे खूप महत्व आह. या जागेवरती कुस्ती क्षेत्र होते. जिथे कृष्ण आणि कंस यांच्यात कुस्ती झाली होती.मथुरा बौध्द धर्माची सुद्धा एक महत्वपूर्ण जागा होती.पण काळाच्या ओघात बुद्ध स्तूप आणि मठाचे रुपांतर हिंदू मंदिरे आणि मठात झाले.
बिर्ला मंदिर
मथुराचे बिरला मंदिरही खूप प्रसिद्ध आहे. श्रीकृष्ण भगवान, सीताराम आणि लक्ष्मीनारायण मंदिरात पाचमुखी शंख आणि सुदर्शन चक्र धारण केलेले दिसतात. मंदिराच्या भिंतींवर चित्रे आणि प्रवचनांची रचना भाविकांना भुरळ पाडते. तसेच मथुरेचे निधिवन हे असे ठिकाण आहे, की आजही कान्हा येथे रास खेळतो असे मानले जाते. कान्हाच्या आगमनासाठी येथील मंदिरात विशेष तयारी करण्यात येते. निधीवनाच्या आजूबाजूला बांधलेल्या घरांमध्ये, निधीवनच्या दिशेने एकही खिडकी उघडत नाही, जी उघडते ती संध्याकाळची आरती झाल्यानंतरच बंद होते.
केशव देव मंदिर
श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाजवळ बांधलेले प्राचीन केशवदेव मंदिर जगाच्या पटलावर अनेक अर्थाने प्रसिद्ध आहे. औरंगजेबाच्या काळात हे मंदिर उद्ध्वस्त करून इदगाह बनवण्यात आल्याचे सांगितले जाते. पुढे हे मंदिर ब्रिटीशांच्या काळात बनारसच्या राजाने बांधले, असे सांगितले जाते.
प्रेम मंदिर
हे मंदिर सकाळी 5.30 वाजता उघडते आणि रात्री 8.30 वाजता बंद होत. मंदिर प्रवेशसाठी कोणतीही फी नाही.संपूर्णमंदिर पाहण्यासाठी कमीतकमी दोन तास लागतात.खूप सुंदर असे हे मंदिर मथुरा भेटीत एकदा तरी अवश्य पाहायला हवे.
मथुरा संग्रहालय
सरकारी संग्रहालय, मथुरा , ज्याला सामान्यतः मथुरा संग्रहालय म्हणून संबोधले जाते, हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा शहरातील एक पुरातत्व संग्रहालय आहे . संग्रहालयाची स्थापना मथुरा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर एफएस ग्रोझ यांनी १८७४ मध्ये केली होती. सुरुवातीला हे पुरातत्व संग्रहालय कर्झन म्युझियम, नंतर पुरातत्व संग्रहालय, मथुरा म्हणून ओळखले जात होते आणि शेवटी सरकारी संग्रहालय, मथुरा असे बदलले गेले
इतर प्रेक्षणीय स्थळे :-
सांखा गोवर्धन
इस्कोन मंदिर
रामानरती, महाबन
श्री नंद भवन चौरासी आधारस्तंभ, जुना गोकुळ, महाबन
वैष्णो माता मंदिर
कसे जाल:-
रेल्वे :- सर्व महत्वाचे रेल्वे स्टेशन मथुरा जंक्शन ला जोडलेले आहे.
रस्ता:- सर्व मोठ्या शहराशी बस द्वारे जोडलेले आहे.
विमान :- मथुरा पासून 46 किलोमीटर अंतरावर आगरा तर 136 किलोमीटर इंदिरा गाँधी अंतराष्ट्रीय एयरपोर्ट नई दिल्ली आहे.
कधी जाल:- वर्षभरात कधी ही भेट देऊ शकता.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा