स्वर्णीम ट्रॅव्हल गर्ल मध्ये आपल स्वागत..
आज आपण या लेखामध्ये उत्तराखंड पर्यटनची अधिक माहिती घेणार आहोत.
देवभूमी”(Land of the Gods) म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे भारतातील एक सुंदर राज्य आहे. देहराडून ही उत्तराखंड ची राजधानी आहे.९ नोव्हेंबर २००० साली उत्तर प्रदेश या राज्याचे विभाजन करून या नवीन राज्याची निर्मिती केली. ज्याचे पूर्वी उत्तरांचल असे नाव होते तदनंतर ते उत्तराखंड या नावाने ओळखले जाऊ लागले. उत्तराखंड हे राज्य हिमालयातील सुंदर व निसर्गरम्य राज्य म्हणून ओळखले जाते. येथील लोकांची पहाडी सांस्कृतिक व पाहुणचाराची भावना देशभर प्रसिद्ध आहे या राज्यातील बर्फाच्छादित पर्वत, दर्या,गवताळ प्रदेश व हिरवीगार गवताळ मैदाने निसर्गसौंदर्याचा अनुभव पर्यटकांना देतात
पर्यटकांची पसंती:-
उत्तराखंड हे राज्य भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रे असलेले राज्य आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा व यमुना या नद्यांचा उगम उत्तराखंड राज्यात होतो. तसेच चारधाम व पवित्र तीर्थक्षेत्रे जसे की केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री आणि बद्रीनाथ ही तीर्थक्षेत्रे उत्तर उत्तराखंड राज्यात आहेत.त्यामुळे भाविक व निसर्गप्रेमी यांच्यामध्ये उत्तराखंड राज्य अधिक लोकप्रिय आहे.
उत्तराखंड मधील थंड हवेची ठिकाणे:-
हिमालया मध्ये वसलेले उत्तराखंड हे राज्य अनेक थंड हवेच्या ठिकाणांची युक्त असून देशातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे उत्तराखंड या राज्यात आहेत. जसे की, अलमोडा, कौसानी, भीमताल, मसूरी.नैनीताल, धनोल्टी,राणीखेत इत्यादी थंड हवेची ठिकाणे उन्हाळ्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या सर्व हिल स्टेशनचे रस्ते पर्यटकांनी गजबजलेले असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
प्रमुख पर्यटन:-
नैनिताल
उत्तराखंड राज्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.नैनिताल तलावाच्या नावावरून ओळखले जाणारे
नैनीताल हे उत्तराखंड राज्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.नैनिताल तलावाच्या नावावरून ओळखले जाणारे नैनीताल हे कुमाऊ पर्वतरांगांच्या दरम्यान दरम्यान वसलेले एक सुंदर टुमदार पर्यटन स्थळ आहे. इथल्या निसर्गसौंदर्याची नैनीताल तलावाची भुरळ पर्यटकांना पडल्याशिवाय राहात नाही. देशविदेशातून आलेले पर्यटक नैनीताल या पर्यटनस्थळाला भेट देतात. निसर्ग सौंदर्याबरोबरच शांत वातावरणासाठी व साहसी खेळांसाठी नैनीताल ओळखले जाते.इथल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी कमीत कमी दोन दिवसांचा कालावधी लागतो.
हे कुमाऊ पर्वतरांगांच्या दरम्यान दरम्यान वसलेले एक सुंदर टुमदार पर्यटन स्थळ आहे. इथल्या निसर्गसौंदर्याची नैनिताल तलावाची भुरळ पर्यटकांना पडल्याशिवाय राहात नाही. देशविदेशातून आलेले पर्यटक नैनिताल या पर्यटनस्थळाला भेट देतात. निसर्ग सौंदर्याबरोबरच शांत वातावरणासाठी व साहसी खेळांसाठी नैनिताल ओळखले जाते.इथल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी कमीत कमी दोन दिवसांचा कालावधी लागतो.
मसूरी
गडवाल हिमालयामध्ये हिमालयाच्या तळाला वसलेले मसूरी हे पर्यटन स्थळ “क्वीन ऑफ द हिल्स” या नावानेही ओळखले जाते. मसूरी या पर्यटन स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची सात हजार फूट इतकी असून वर्षभर इतके वातावरण शांत आणि आल्हाददायी असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मसूरी चे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी व इथल्या शांत वातावरणात सुट्टी घालवण्यासाठी असंख्य पर्यटक मसूरी या स्थळाला भेट देतात.
तीर्थक्षेत्र बद्रीनाथ
नर आणि नारायण पर्वतांच्या मध्ये वसलेले बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये बद्रीनाथ या क्षेत्राला खूप महत्त्व आहे. बद्रीनाथ धाम भगवान विष्णू ला समर्पित असलेले एक तीर्थस्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक बद्रीनाथ येथे येऊन भगवान विष्णूचे दर्शन करतात. या तीर्थक्षेत्राचा उल्लेख वेगवेगळ्या वेदांमध्ये ही केलेला आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले बद्रीनाथ हे भगवान शिवाची संबंधित तीर्थक्षेत्र असून उत्तराखंड मधील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
जिम कॉर्बेट नेशनल पार्क.
हिमालयाच्या पायथ्याला बसलेले जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड मधील जैवविविधतेचे प्रतीक मानले जाते. भारतातील जुन्या राष्ट्रीय उद्यानामध्ये जिम कॉर्बेट नेशनल पार्क ची गणना होते. या अभयारण्याची स्थापना सन 1936 मध्ये हेली नॅशनल पार्क या नावाने केली गेली होती. रॉयल बंगाल टायगर या दुर्मिळ होत चाललेल्या वाघाच्या प्रजातींचे निवासस्थान म्हणून जिम कॉर्बेट नेशनल पार्क ओळखले जाते. राम गंगा नदीच्या तीरावर असलेले हे अभयारण्य जवळजवळ 580 प्रकारच्या पक्षांचे 50 हून अधिक प्रकारच्या झाडांची व 75 हून अधिक वन्यप्राण्यांचे 25 हून अधिक सरीसृप प्रजातींचे निवासस्थान असून याचा परिसर पाचशेपेक्षा अधिक वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे.
ऋषिकेश पर्यटन स्थळ उत्तराखंड
उत्तराखंड राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश हे स्थळ गंगा आणि चंद्रभागा यांच्या पवित्र संगमावर वसलेले असून भारतातील अनेक प्राचीन व भव्य मंदिरांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या तीर्थक्षेत्रावर अनेक लोकप्रिय कॅफे योगाश्रम आणि साहसी खेळांची केंद्रे आहेत. ऋषिकेश हे स्थळ अध्यात्मिक आणि लाईफ पम्पिंग यांचा अनोखा संगम मानले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये ऋषिकेश हे स्थळ तीर्थ क्षेत्राबरोबरच भारतातील साहसी खेळांचे केंद्र म्हणूनही विकसित झालेले आहे. या ठिकाणी व्हाईट वॉटर राफ्टिंग, फ्लाईंग फोक्स, बंजी जंपिंग,झिप लाइनिंग असे अनेक साहसी खेळ प्रकार उपलब्ध आहेत.
तीर्थक्षेत्र हरिद्वार
भारतातील सर्वात पवित्र शहरांमध्ये समाविष्ट असलेले हरिद्वार हे उत्तराखंड राज्यातील तीर्थक्षेत्र गडवाल क्षेत्रातिल गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेले एक प्राचीन शहर आहे. हरिद्वार हे शहर आश्रम, मंदिरे, गल्ल्या यांनी युक्त असून लाखोच्या संख्येने लोक पवित्र गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी हरिद्वार या तीर्थक्षेत्री येतात. दर बारा वर्षातून एकदा हरिद्वार येथे जगप्रसिद्ध कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते या कुंभमेळा मध्ये सहभागी होण्यासाठी व याचा आनंद घेण्यासाठी भारतभरातून पर्यटक व भाविक हरिद्वारला येतात. हरिद्वार बरोबरच भारतातील प्रयागराज नाशिक आणि उज्जैन येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते
यमुनोत्री धाम
यमुना नदी चा उगम यमुनोत्री या स्थळी होतो. छोटे चारधाम मध्ये यमुनोत्री धाम असून समुद्रसपाटीपासून यांची उंची 3293 मीटर इतकी आहे. यमुनोत्री धाम गडवाल हिमालयामध्ये येते. हिंदू पुराण कथांमधील उल्लेखानुसार यमाची बहीण या रूपात यमुनेला मृत्यूची देवता म्हणून हे ओळखले जाते. असे मानले जाते की, यमुना नदी मध्ये स्नान केल्याने जीवनाचे अंतिम सत्य जो की मृत्यू म्हणून ओळखला जातो ती वेळ कोणत्याही दुःखा शिवाय पूर्ण होते.
गंगोत्री धाम.
उत्तराखंडमधील प्रेक्षणीय व पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाणारे गंगोत्री उत्तर काशी मधील एक तीर्थक्षेत्र आहे. हजारो भाविक गंगोत्री चे दर्शन करण्यासाठी येतात. पौराणिक कथांनुसार राजा भगीरथाने तपस्या केल्यानंतर देवी गंगाने पूर्वजांच्या पापांना घेण्यासाठी स्वतः एका नदीचे रूप घेतले व प्रवाहित होऊन उत्तराखंड मधून भूमीवर प्रवेश केला. या नदीच्या उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वेग कमी करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जपानमध्ये या नदीचे पाणी शोषून घेतले. गंगा नदीच्या पवित्र उगम स्थळाला भागीरथी या नावानेही ओळखले जाते.
केदारनाथ मंदिर
केदारनाथ हे उत्तराखंड मधील प्रमुख तीर्थक्षेत्र असून प्राचीन शिव मंदिर केदारनाथ साठी ओळखले जाते. हिमालय पर्वत रांगांमध्ये वसलेले केदारनाथ हे आपल्या अतुलनीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चोराबारी ग्लेशियर व बर्फाच्छादित पर्वतशिखरांनी वेढलेले केदारनाथ भारतामधील पवित्र तीर्थक्षेत्रांत पैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथाचे दर्शन करण्यासाठी उत्तराखंड राज्यांमध्ये येतात.
पुढील भागात उर्वरित पर्यटन स्थळांची अधिक माहिती पाहु...
उत्तराखंड संबधीत पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
very good
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवा