1.लाल किल्ला
हा ऐतिहासिक किल्ला दिल्लीच्या ऐतिहासिक जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला किंवा लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला बराच जुना असूनही हा किल्ला पाचव्या मोगल शासक शाहजहांने आपली राजधानी म्हणून निवडला होता. या किल्ल्याला “लाल किल्ला” असे म्हणतात कारण त्याच्या भिंती लालसर झाल्या आहेत.
या ऐतिहासिक किल्ल्याची 2007 साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती. भारताची राजधानी दिल्लीत लाल किल्ला हा देशाच्या अभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. मोगल काळात बांधलेल्या या ऐतिहासिक वास्तूचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश असून तो भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. जगातील कानाकोपऱ्यातून लोक लाल किल्ल्याचे सौंदर्य, भव्यता आणि मोहक बघायला येतात आणि तिथल्या शाही वास्तुकलाची आणि अनन्य वास्तुकलाची प्रशंसा करतात.
2. इंडिया गेट
देशाची राजधानी दिल्ली म्हटले कि नजरेसमोर प्रथम राजपथ आणि त्यावर दिमाखाने उभे असलेले इंडिया गेट येते. केवळ देशातीलच नव्हे तर विदेशी पर्यटकांना सुद्धा या स्थळाला भेट देण्याची उत्सुकता असते. १२ फेब्रुवारी १९३१ साली पूर्ण झालेले हे स्थळ भारताची विरासत आहेया गेटच्या अगदी जवळ काळ्या संगमरवर दगडात बांधलेले एक मंदिर असून तेथे एलआयएएफ सेल्फ लोडिंग रायफल आणि त्यावर सैनिकाचे हेल्मेट आहे. याला अमरज्योती जवान स्मारक म्हणतात. ७१ च्या पाकिस्तान युद्धात बांग्लादेशाच्या बाजूने लढताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधलेल्या या स्मारकाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी ७२ ला केले होते.
3. कुतुब मिनार
कुतुब मिनार चे निरीक्षण केले तर कुतुब-उद-दिन ऐबक ते तुघलक यांच्या काळातील वास्तुकलेतील फरक दिसून येतो.कुतुब मिनार ची निर्मिती लाल रंगाच्या वालुकाश्म दगडात केली असून त्यावर कुराणातील आयते आणि फुलांचे नक्षीकाम केलेले दिसून येते.
कुतुब मिनार च्या निर्मिती मागील उद्देश कुव्वत-उल-इस्लाम मशिदीचे आजन देणे तसेच निरीक्षण व सुरक्षा करणे यासाठी होता असे म्हटले जाते.तसेच असेही म्हणतात की,इस्लाम च्या दिल्ली वरील विजयाचे प्रतिक म्हणून कुतुब मिनार बांधला गेला
भेट देण्याची वेळ:-
दिल्ली मधील कुतुब मिनार पाहण्यासाठी पर्यटक वर्षभरात कधीही जाऊ शकतात.कुतुबमिनार पाहण्याची वेळ सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० अशी आहे.
कुतुब मिनार पर्यंत जाण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन “कुतुबमिनार मेट्रो स्टेशन” हे आहे.महरौली ला जाणाऱ्या सर्व बसेस कुतुब मिनार जवळून जातात.कारण महरौली बस स्थानक कुतुबमिनार मशिदी जवळ आहे.
4.अक्षरधाम मंदिर
अक्षरधाम मंदिर अर्थात स्वामीनारायण मंदिर दिल्ली मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे.यमुना नदीच्या तटावर असलेले हे मंदिर ६ नोव्हेंबर २००५ मध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी खुले करण्यात आले.हिंदू धर्म आणि भारताची प्राचीन संस्कृतीचे दर्शन हे मंदिर घडवते.त्याच बरोबर अध्यात्मिक वातावरण आणि समृद्ध वास्तुकलेचे दर्शन हे मंदिर घडवते.
जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या मंदिराची नोंद आहे.हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित असून स्वामीनारायण यांच्या मूर्ती बरोबरच २०,००० महान संत महात्म्यांच्या मुर्तीही इथे आहेत.या मंदिराच्या निर्मितीसाठी नक्षीदार संगमरवर आणि वालुकाश्म खडकाचा वापर केला आहे.
अक्षरधाम मंदिराची प्रवेश वेळ : Akshardham temple Delhi timing.
*अक्षरधाम मंदिर दर सोमवारी बंद असते*
अक्षरधाम मंदिरामध्ये प्रवेश करण्याची वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी.६.३०
अक्षरधाम मंदिर प्रदर्शन वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी.५.३०
अक्षरधाम मंदिर संगीत कारंजे वेळ : सायंकाळी ७.३०
अक्षरधाम मंदिर प्रवेश शुल्क:
प्रौढ : १७० रू.
जेष्ठ नागरिक:१२५ रू.
४ वर्ष ते २१ वर्ष मुले व मुली :१०० रू.
४ वर्षाच्या आतील बालके : मोफत
अक्षरधाम मंदिर संगीत कारंजे शुल्क:
प्रौढ : ८० रू.
जेष्ठ नागरिक:८० रू.
४ वर्ष ते २१ वर्ष मुले व मुली :५० रू.
४ वर्षाच्या आतील बालके : मोफत
कृपया लक्ष द्या: मंदिराच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी करण्यास तसेच मोबाईल,कॅमेरा,रेडीओ तसेच अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणे नेण्यास बंदी आहे.खाण्याची कोणतीही वस्तू सोबत नेता येणार नाही.
मेट्रो:- ब्लू लाईन मेट्रोने अक्षरधाम मंदिरापर्यंत पोहोचू शकता.ब्लू लाईन मेट्रो नोएडा च्या दिशेने जाते व या मार्गावर अक्षरधाम मंदिर मेट्रो स्थानक आहे.मेट्रो स्टेशन वरून रिक्षाने किंवा चालत काही मिनिटांत अक्षरधाम मंदिरापाशी पोहोचता येते.
बस:- काश्मिरी गेट ISBT,सराय काले खान ISBT(हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन जवळ) तसेच आनंद विहार ISBT या स्थानकातून अक्षरधाम मंदिरासाठी बसेस सुटतात.
5. हुमायूनची कबर
ही मुघल बादशहा हुमायूँ याचे थडगे आहे. यावर इराणी वास्तुकलेची छाप आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात ह्या कबरीचा समावेश होतो.
6. छतरपुर मंदिर
दक्षिणी दिल्ली मध्ये हे मंदिर आहे. शिव-पार्वती, राधा-कृष्ण, हनुमान, लक्ष्मी अशा अनेक देवांची भक्ती जागृत करते.जर आपण धार्मिक असाल तर इथे तुमची भक्ती करू शकता. मुख्यतः हे मंदिर देवी कात्यायनी कोष्ठक आहे. 70 एकर जमिनीवर ही भव्य वास्तू उभी आहे.
7. इस्कॉन मंदिर
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसन्स (इस्कॉन) ही एक जागतिक संस्था आहे जी १९९६ मध्ये न्यूयॉर्क शहरातील स्थापना केली गेली. गौडिया वैष्णव परंपरेचे पालन करणारा हा एक पंथ आहे. ते राधा आणि कृष्णाचे शिष्य आहेत. भारतात देखील अनेक इस्कॉन मंदिरे आहेत. जन्माष्टमीच्या वेळी म्हणजेच कृष्णाच्या जन्माच्या उत्सवाच्या वेळी या ठिकाणी अद्भुत वातावरण पाहायला मिळते.
8. लोटस टेम्पल
अभियांत्रिकचा अजोड नमुना म्हणून म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. 1986 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे. तेव्हापासून याची देश विदेशात ख्याती आहे. दिल्लीच्या कालकाजी येथेल हे मंदिर आपल्या अनोख्या आकारामुळे कायम आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. दिल्लीची सफर करण्यासाठी आलेल्यांसाठी हे मंदिर महत्त्वाचे पर्यटन स्थळ ठरत आले आहे.
*मंदिराची अनोखी वास्तूकला*
1 - या मंदिराच्या डिझाइनपासून संपूर्ण मंदिर तयार होण्याला 10 वर्षांचा काळावधी लागला आहे.
2 - मंदिराचे आर्किटेक्ट मुळचे इराणचे मात्र कॅनडामध्ये स्थायिक झालेले आर्किटेक्ट फरिबोज सहबा आहेत.
3 - या मंदिराच्या निर्मीतीसाठी हजारो हात काम करत होते. त्यात 800 पेक्षा जास्त इंजिनिअर, तंत्रज्ञ, कामगार आणि कलाकारांचा समावेश होता.
4 - हे मंदिर बाहेरून अर्धोन्मलित कमल पुष्पासारखे दिसते. यात संगमरवराच्या 27 पाकळ्या आहेत.
5 - या 27 पाकळ्या तीन रांगांमध्ये आहेत. पहिल्या दोन रांगा या मंदिराच्या मध्य भागाकडे झुकलेल्या आहेत. तर तिसर्या रांगेतली पाकळ्या या बाहेरच्या बाजून झुकलेल्या आहेत.
6 - तिसर्या रांगेतील पाकळ्या या मंदिराच्या सेंट्रल हॉलच्या दरवाजाच्या कॅनोपीचे काम करतात.
7 - या मंदिराच्या सेंट्रल हॉलला 9 दरवाजे असून त्यात एकाचवेळी 2500 लोक ये-जा करु शकतात.
8 - मंदिराच्या बाहेर झुकलेल्या पाकळ्यांसोबत 9 छोटी-छोटी तळी आहेत. त्यामुळे 40 मीटर उंच हे मंदिर लांबून पाहिले असता तलावामध्ये कमळाचे फूल उमलल्या सारखे भासते.
लोट्स टेम्पलची ख्याती देश-विदेशात
1986 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या मंदिराच्या अनोख्या शैलीमुळे हे देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या मंदिराला आतापर्यंत सात कोटी लोकांनी भेट दिली आहे.
भारतामध्ये कमळाला असलेल्या महत्त्वामुळे त्याचा आकार
हे मंदिर बहाई समाजाचे आहे. या मंदिरात येण्यासाठी मात्र, कोणत्याही धर्माच्या लोकांना बंदी नाही. आर्किटेक्ट फरिबोज यांना जेव्हा मंदिराचे काम देण्यात आले तेव्हा त्यांनी भारतात कमळ पुष्पाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन मंदिराला त्याचा आकार देण्याचे निश्चित केले. कमळ हे प्रेम, शांती आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते.
9. जामा मशिद
दिल्लीच्या मुख्य ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. ही भारताततील सर्वात मोठी मशिद आहे. या मशिदमध्ये एकावेळी 25 हजार लोक नमाज अदा करू शकतात. मशिदीची निर्मिती 1650 पासून 1656 च्या दरम्यान झाली आहे.
दिल्ली संबधीत पर्यटन माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा....share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
very nice
उत्तर द्याहटवाThank you 🙏☺️
हटवा